Zodiac Sign : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, मार्च 2025 हा महिना काही राशीच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण की या महिन्यात अनेक राशीच्या लोकांचा वाईट काळ संपणार आहे. लवकरच राशीचक्रातील काही राशीच्या लोकांना जबरदस्त यश मिळणार आहे.
खरेतर, या महिन्याच्या अखेरीस ग्रहांच्या मोठ्या हालचाली होत असून याचा परिणाम राशी चक्रातील सर्वच्या सर्व राशींवर होणार आहे. ग्रहांच्या हालचालीमुळे बाराच्या बारा राशी प्रभावीत होणार आहेत मात्र यापैकी तीन राशी अधिक प्रभावीत होतील आणि या राशीच्या लोकांना मनपसंत यश मिळणार आहे.

ज्योतिष शास्त्र असं सांगतय की, 29 मार्च रोजी शनी ग्रह मीन राशीत प्रवेश करणार असून, तिथे आधीच सूर्य, शुक्र, बुध आणि राहू स्थित आहेत. या ग्रहांच्या एकत्र येण्याने एक विशेष त्रिग्रही राजयोग निर्माण होईल, ज्याचा प्रभाव काही राशींना अधिक शुभ ठरेल.
वृषभ : या राजयोगाचा वृषभ राशीच्या लोकांना फायदा होणार आहे आणि यांचा वाईट काळ आता भूतकाळात जमा होणार आहे. या काळात वृषभ राशीच्या लोकांना अनेक फायदे मिळू शकतात.
29 मार्च 2025 नंतर हे लोक ज्याला हात लावतील ते सोनं होईल अशी स्थिती तयार होणार आहे, कारण या लोकांच्या गेल्या अनेक दिवसांपासून च्या अनेक प्रलंबित इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.
नोकरी आणि व्यवसायात सुद्धा अनुकूलता राहील, आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि समाजात आदर वाढेल. समाजात मान सन्मान तर वाढणारच आहे शिवाय आपल्या कुटुंबातील संबंध सुधारतील, तसेच आरोग्यही चांगले राहील.
कुंभ राशी : या राशीच्या लोकासाठी हा काळ विशेष शुभ ठरणार आहे. आत्तापर्यंत ज्या अडचणी होत्या त्या आता दूर होतील. आर्थिक संकटांपासून मुक्ती मिळेल आणि करिअरमध्ये सकारात्मक बदल घडतील.
मेहनतीच्या जोरावर या राशीच्या लोकांना मोठे यश मिळण्याची संधी आहे. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग वाढेल आणि त्यांच्या नेतृत्वगुणांना नवे बळ मिळेल. 29 मार्चनंतर या राशीच्या लोकांचे खऱ्या अर्थाने अच्छे दिन सुरू होणार आहेत.
मिथुन राशी : मिथुन राशीच्या लोकांचा वाईट काळ आता अवघ्या काही दिवसांचा आहे. 29 मार्चनंतर या राशीच्या लोकांना देखील कुंभ आणि वृषभ राशीच्या लोकांप्रमाणे चांगले लाभ मिळणार आहेत. या राशीच्या लोकांसाठी सुद्धा हा त्रिग्रही योग अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतो.
कामाच्या ठिकाणी कौतुकाची संधी मिळेल, व्यवसायिक क्षेत्रात मोठ्या संधी उघडतील आणि मानसिक तसेच शारीरिक आरोग्य सुधारेल. वडिलोपार्जित संपत्तीत वाढ होण्याची शक्यता असून, गुंतवणुकीतून मोठा लाभ मिळू शकतो. शिक्षण उद्योग आणि नोकरी अशा तीनही क्षेत्रांमधील लोकांना या काळात चांगला लाभ मिळेल.