Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, नवग्रहातील ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. ज्योतिष शास्त्रात 12 राशीं, 9 ग्रह आणि 27 नक्षत्रांना सर्वाधिक महत्त्व आहे. ग्रहांच्या चाली मानवी जीवनावर थेट प्रभाव टाकतात.
यामुळे जेव्हा केव्हा ग्रह एका राशीतून दुसरा राशीत जातो तेव्हा याचा मानवी जीवनावर मोठा सकारात्मक आणि नकारात्मक असा प्रभाव पाहायला मिळतो. दरम्यान येत्या तीन दिवसांनी म्हणजेच 28 मे 2025 रोजी चंद्र ग्रहाचे राशी परिवर्तन होणार आहे.

चंद्र ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे राशीचक्रातील काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल आपल्याला अनुभवायला मिळतील.
या संबंधित राशीच्या लोकांचा वाईट काळ संपेल आणि चंद्राच्या गोचर नंतर सुवर्णकाळ सुरू होणार आहे. आता आपण चंद्राचे गोचर झाल्यानंतर कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार याचा आढावा घेणार आहोत.
चंद्र ग्रह कोणत्या राशीत जाणार?
सध्या चंद्र ग्रह वृषभ राशीत विराजमान आहे. मात्र लवकरच चंद्राचे राशी परिवर्तन होणार आहे. ज्योतिष तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, 28 मे 2025 रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास चंद्र ग्रह वृषभ राशीला अलविदा सांगणार आहे आणि मिथुन राशीत प्रवेश करेल. याचाच परिणाम म्हणून राशी चक्रातील तीन महत्त्वाचे राशीच्या लोकांचा भाग्योदय होणार आहे.
या राशीच्या लोकांना होणार फायदा
कुंभ : या राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक राहणार आहे. या राशीच्या लोकांचा वाईट काळ आता समाप्त होणार आहे 28 मे नंतर या राशीच्या लोकांना आर्थिक क्षेत्रात मोठी प्रगती साधता येईल.
या लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल असे बोलले जात आहे. या काळात हे लोक नोकरीमध्ये बदल करू शकतात आणि असे केल्याने यांना चांगली संधी मिळणार आहे.
नोकरी करणाऱ्या लोकांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. शिक्षणाच्या क्षेत्रातही चांगले यश मिळणार आहे, उच्च शिक्षणासाठी हा काळ अनुकूल राहील असे म्हटले जात आहे.
सिंह : सिंह राशीच्या जातकांनाही कुंभ राशीच्या लोकांप्रमाणेच चांगले यश मिळणार आहे. या लोकांना प्रत्येकच क्षेत्रात यश मिळू शकते. या काळात आर्थिक अडचणी दूर होणार आहेत. या काळात अविवाहितांसाठी विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात असे संकेत मिळत आहेत.
या काळात मुलांच्या प्रगतीचे संकेत सुद्धा मिळत आहेत. आगामी काळात शिक्षण व व्यवसायात या काळात चांगले फायदे मिळू शकतात. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
मिथुन : कुंभ आणि सिंह राशीच्या लोकांप्रमाणेच मिथुन राशीच्या लोकांनाही आगामी काळात चांगले यश मिळणार आहे. या राशीसाठी आगामी काळ विशेष अनुकूल राहणार आहे.
या लोकांना आपल्या वैयक्तिक जीवनात आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील अशी शक्यता आहे. या राशीच्या लोकांचा वाईट काळ समाप्त होईल असे म्हटले जात आहे. या लोकांना शिक्षण व व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात चांगले यश मिळू शकते आणि समाजातील मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीतही हा काळ फारच चांगला राहील.