Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रात बारा राशी, नवग्रह आणि 27 नक्षत्रांना फार महत्त्व आहे. ज्योतिष शास्त्राचा सांगतो की एका ठराविक कालावधीनंतर नवग्रहातील ग्रह राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. दरम्यान जेव्हा केव्हा नवग्रहातील ग्रहांचे राशी आणि नक्षत्र परिवर्तन होते तेव्हा याचा राशीचक्रातील सर्वच राशीच्या लोकांवर सकारात्मक आणि नकारात्मक असा प्रभाव पाहायला मिळतो.
याशिवाय नवग्रहातील ग्रह वक्री, मार्गी आणि उदित अवस्थेत देखील प्रवेश करत असतात. नवग्रहातील बुध ग्रह सुद्धा इतर ग्रहांप्रमाणेच राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतो. महत्त्वाचे म्हणजे बुध ग्रहाचे राशी गोचर फक्त पंधरा दिवसात होते.

म्हणजेच प्रत्येक पंधरा दिवसांनी बुध ग्रह राशी बदलत असतो. दरम्यान वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार लवकरच बुध ग्रह मार्गी अवस्थेत प्रवेश करणार आहे. सध्या बुध मीन राशीत वक्री चाल चालत आहे. मात्र आज 6 एप्रिल रोजी बुध याच राशीत मार्गी होणार आहे.
याचाच परिणाम म्हणून राशीचक्रातील तीन राशीच्या लोकांच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल पाहायला मिळणार आहे. आता आपण राशीचक्रातील कोणत्या राशीच्या लोकांच्या आयुष्यात बुध ग्रहाच्या या चालीचा सकारात्मक प्रभाव पाहायला मिळू शकतो याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.
या राशीच्या लोकांना मिळणार आर्थिक फायदा
तूळा : आजपासून या राशीच्या लोकांचे सोन्याचे दिवस सुरू होणार आहे. सध्याचा काळ या राशीच्या लोकांसाठी फारच अनुकूल राहणार आहे. या काळात या लोकांची अनेक अडकलेली कामे मार्गी लागतील, आकस्मिक धनलाभ होण्याची शक्यता देखील आहे. या काळात कौटुंबिक साथही मिळेल.
मनातील चिंता दूर होऊन दूरचे प्रवास करावे लागतील. महत्त्वाचे म्हणजे हे दूरवरचे प्रवास या लोकांसाठी काहीतरी मोठी आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. नोकरीत पगारवाढ, अडकलेले पैसे मिळणे आणि प्रेमसंबंधात समाधान मिळणे अशा अनेक शुभ घडामोडी या काळात होतील.
सिंह : या राशीसाठीही बुधाची स्थिती अनुकूल राहणार आहे. व्यापारात वाढ, सरकारी नोकरीसाठी यश, नवी नोकरी किंवा पगारवाढ यांसारख्या संधी मिळतील.
कामाचे कौतुक, मान-सन्मानात वाढ, कुटुंबासोबत प्रवास, आर्थिक लाभ आणि जमीन खरेदीसारखे निर्णय या काळात फायदेशीर ठरतील. मुलांकडूनही चांगली आनंद वार्ता मिळू शकते. या राशीच्या लोकांचा वाईट काळ आता समाप्त होणार आहे.
वृषभ : सिंह आणि तुळा राशि प्रमाणेच या राशीच्या व्यक्तींसाठीही हा काळ अत्यंत फलदायी राहील. आर्थिक समस्यांपासून सुटका होईल, आरोग्य सुधारेल आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.
मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल, विद्यार्थ्यांना हवे तसे यश लाभेल आणि भौतिक सुखातही वाढ होईल. अडकलेली कामे पूर्ण होऊन मानसिक समाधान लाभेल. मात्र मेहनतीला शॉर्टकट राहणार नाही. मेहनत घेतली तरच अपेक्षित यश मिळणार आहे.