Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहातील ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. बुध आणि गुरु ग्रह देखील राशी परिवर्तन करतात. दरम्यान आज अर्थातच 29 मार्च रोजी मीन राशीत बुध आणि गुरू ग्रहांची युती होणार आहे. याचाच परिणाम म्हणून राशीचक्रातील काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल पाहायला मिळणार आहेत.
ग्रहांच्या या शुभ संयोगामुळे काही राशींना भरभराटीचा काळ सुरू होणार असे बोलले जात आहे. दरम्यान आता आपण बुध आणि गुरु ग्रहाच्या युतीचा फायदा नेमका कोणत्या व्यक्तींना होणार आहे याचाच आढावा घेणार आहोत.

ज्योतिष शास्त्रानुसार बुध आणि गुरु ग्रहाच्या कृपेमुळे राशीचक्रातील तीन राशीच्या व्यक्तींना प्रचंड यश, आर्थिक समृद्धी आणि आयुष्यात अनपेक्षित आनंद मिळेल. म्हणजेच या लोकांचा वाईट काळ आता संपणार आहे आणि ज्यांच्या आयुष्यात मोठी पॉझिटिव्हिटी पाहायला मिळणार आहे.
तुळ : या राशीच्या लोकांचा वाईट काळ आज संपेल आणि आजपासून हे लोक एक नवं आयुष्य सुरू करतील. पुढील काळात या लोकांचे आरोग्य उत्तम राहील. धार्मिक कार्यात सहभाग घेतील. यामुळे यांचे मन मोठे प्रसन्न राहणार आहे. कुटुंबात वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण असेल. ज्या लोकांना विदेशात जायचे असेल त्यांचे हे स्वप्न सुद्धा या काळात पूर्ण होणार आहे कारण की परदेशी प्रवासासाठी अनुकूल योग तयार होत आहे.
या लोकांच्या व्यवसायाचा विस्तार होईल. वडिलोपार्जित संपत्तीमधून फायदा होईल. कोर्ट-कचेरीच्या प्रकरणांमध्ये सुद्धा यश मिळणार आहे. करिअरमध्ये देखील या लोकांना चांगला फायदा होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी या लोकांना वरिष्ठांकडून चांगले सहकार्य मिळेल आणि याचाच फायदा यांना होईल.
मिथुन : तुला राशि प्रमाणेच मिथुन राशीच्या लोकांना देखील हा काळ फारच अनुकूल राहणार आहे. या लोकांची करिअरमध्ये चांगली ग्रोथ होणार आहे. या लोकांची अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नोकरीच्या ठिकाणी चांगल्या अपॉर्च्युनिटीज मिळणार आहेत.
व्यवसायात देखील या लोकांना चांगल्या संधी मिळतील, आणि याचाच परिणाम म्हणून या लोकांची आर्थिक स्थिती या काळात फारच उत्तम राहणार आहे. या लोकांचे पैशांची अडचण दूर होईल आणि यामुळे हे लोक फारच समाधानी असतील. परंतु या लोकांनी आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. खर्चावर नियंत्रण ठेवले नाही तर येणारा पैसा हातात राहणार नाही.
वृषभ : मिथुन प्रमाणेच याही राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळणार आहे. हे लोक प्रत्येकच क्षेत्रात यशस्वी होताना दिसतील. शिक्षण असू द्यात, उद्योग असू द्यात किंवा नोकरी असू द्या प्रत्येकच ठिकाणी या लोकांची एक विशेष छाप पडणार आहे. हे लोक या काळात नवीन गाडी खरेदी करू शकतात.
या लोकांच्या आयुष्यातील जुने वाद आता संपतील आणि हे लोक धार्मिक कार्यात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवणार आहेत. या लोकांचा व्यवसाय आता वाढणार आहे. या लोकांनी जे काही वाईट दिवस अनुभवले आहेत ते आता इतिहासात जमा होतील आणि नवीन चांगले क्षण या लोकांच्या आयुष्यात येणार आहेत.