Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहातील 9 ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतं असतात. 9 ग्रह, 12 राशी आणि 27 नक्षत्रांमध्ये फिरतात आणि या घटनेचा मानवी जीवनावर थेट प्रभाव पडत असतो. दरम्यान, आता गुरु ग्रहाचे नक्षत्र पद परिवर्तन होणार आहे.
त्यामुळे राशीचक्रातील काही राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे. या लोकांचा वाईट काळ संपून आता चांगल्या दिवसाला सुरुवात होईल. खरेतर, गुरु ग्रहाला देवतांचा गुरु म्हणून ओळखल जात. हा ग्रह प्रत्येक बारा महिन्यांनी राशी परिवर्तन करत असतो.

राशी परिवर्तनासोबतच गुरु ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन सुद्धा होते आणि आज गुरु ग्रहाचे नक्षत्र पद परिवर्तन होणार असल्याची माहिती ज्योतिष तज्ञांनी दिली आहे. आज 30 मे 2025 रोजी गुरु ग्रह यांनी नक्षत्राचे चरण परिवर्तन केले आहे.
गुरु ग्रह मुर्गशिरा नक्षत्रात विराजमान आहे. आतापर्यंत गुरु ग्रह या नक्षत्रातील तिसऱ्या चरणात होता, मात्र आता गुरुग्रहाने चौथ्या चरणात प्रवेश केला आहे. यामुळे आज 30 मे 2025 पासून राशीचक्रातील काही राशीच्या लोकांचा भाग्योदय होणार आहे.
या राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश
धनु : आज पासून पुढील काही दिवस या राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ असेल. आगामी काळात या राशीच्या लोकांना पैसे कमावण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतील. या लोकांची कामाच्या ठिकाणी अधिक प्रशंसा होणार आहे.
सरकारी नोकरीत कार्यरत असणाऱ्या लोकांना प्रमोशनची भेट मिळू शकते. करिअरच्या बाबतीत तसेच व्यवसायाच्या बाबतीत हा काय फायद्याचा राहणार आहे. विद्यार्थ्यांना सुद्धा या काळात चांगले यश मिळेल. या काळात आर्थिक स्थिती देखील उत्तम राहणार आहे.
कर्क : धनु राशीच्या लोकांप्रमाणेच कर्क राशीच्या जातकांचाही वाईट काळ आता संपणार आहे. या काळात नोकरदार मंडळीला प्रमोशनची भेट मिळू शकते. खाजगी असो किंवा सरकारी दोन्ही नोकरीमध्ये प्रमोशनचे चान्सेस तयार होत आहेत.
या काळात खऱ्या अर्थाने तुमच्या कठोर मेहनतीचे तुम्हाला योग्य फळ मिळणार आहे. व्यवसायातून सुद्धा या लोकांना फारच चांगला लाभ मिळणार आहे. व्यवसायातून हे लोक चांगला पैसा कमावतांना दिसतील. सोबतच समाजात या लोकांची प्रतिष्ठा आणखी वाढणार आहे.
मेष : कर्क आणि धनु राशीच्या लोकांप्रमाणेच मेष राशीच्या जातकांचाही सुवर्णकाळ आजपासून सुरू होऊ शकतो असे बोलले जात आहे. या राशीच्या लोकांना लवकरच नव्या नोकरीची भेट मिळणार आहे. जे लोक बेरोजगार असतील किंवा नोकरीच्या शोधात असतील अशा लोकांसाठी या काळात चांगल्या पॅकेजची नवीन नोकरी मिळू शकते.
मल्टिनॅशनल कंपनीत नोकरीचे योग जुळून येत आहेत. नोकरीमध्ये आणि बिजनेस मध्ये या लोकांना चांगला लाभ मिळणार आहे. व्यवसायातून सुद्धा हे लोक भरपूर पैसा कमावणार आहेत. या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. हा काळ वाहन खरेदीसाठी अनुकूल असून नवीन वाहन खरेदीचे योग जुळून येत आहेत.