Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रात नवग्रहातील 9 ग्रह, 12 राशी आणि 27 नक्षत्रांना फारच महत्त्व दाखवण्यात आले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्र असे सांगते की एका ठराविक कालावधीनंतर नवग्रहातील नवग्रह राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात.
नवग्रहातील राशी आणि नक्षत्र परिवर्तनामुळे राशीचक्रातील सर्वच राशीच्या लोकांवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव सुद्धा पडत असतो. दरम्यान आज 29 एप्रिल 2025 पासून राशी चक्रातील काही राशीच्या लोकांचा वाईट काळ आता

कायमचा संपणार आहे आणि त्यांच्या आयुष्यातील सुवर्णकाळ खऱ्या अर्थाने आजपासून सुरू होणार असे संकेत मिळत आहेत. खरंतर शनी ग्रहाने काल 28 एप्रिल 2025 रोजी नक्षत्र परिवर्तन केले असून याचा प्रभाव म्हणून राशीचक्रातील तीन राशीच्या लोकांच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल आपल्याला दिसणार आहे,
या राशीच्या लोकांच्या अनेक इच्छा आता आगामी काळात आपल्याला पूर्ण होताना दिसतील. एवढेच नाही तर आज चंद्र ग्रहाचे राशी परिवर्तन सुद्धा होणार आहे. आज तो वृषभ राशीमध्ये गोचर करणार असून याचा सुद्धा प्रभाव काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणणार आहे. दरम्यान आता आपण शनी ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाचा आणि चंद्रग्रहाच्या राशी परिवर्तनाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार याचा आढावा घेणार आहोत.
मीन : या राशीच्या लोकांचा वाईट काळ आता संपणार आहे. या लोकांच्या जीवनात आता मोठे सकारात्मक बदल होणार आहेत. या लोकांना गुंतवणुकीशी संबंधित लाभ होण्याची शक्यता आहे. तसेच नातेसंबंध आणखी दृढ होतील असे बोलले जात आहे.
या काळात जे लोक पार्टनरशिप मध्ये कामे करतात त्यांना फायदा होईल. पार्टनरशिप मध्ये धंदा करणाऱ्यांना सुद्धा या काळात चांगला नफा मिळू शकतो. या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. कला आणि संगीत या क्षेत्रांमध्ये हे लोक चांगली प्रगती करताना दिसतील.
तूळ : मीन राशीप्रमाणे तुळा राशीच्या लोकांचाही वाईट काळ आता संपणार आहे. या लोकांना आता त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल असे आपण म्हणू शकतो. मेहनती नंतर मिळणारे यश हे फारच कौतुकास्पद आणि आनंद देणार असत
म्हणून हे लोक या काळात मोठे समाधानी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना या काळात चांगल्या लाभ होणार असून या लोकांची आर्थिक स्थिती देखील सुधारणार आहे.
एकीकडे संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे धार्मिक कार्यांमध्ये या लोकांची अधिक रुची आपल्याला पाहायला मिळू शकते. फक्त व्यवसाय करणाऱ्यांना या काळात फायदा होईल असे नाही तर जे लोक नोकरी करतात त्यांना सुद्धा अनेक गोष्टी साध्य करता येणे शक्य होणार आहे.
वृषभ : तुळा आणि मीन राशि प्रमाणेच वृषभ राशीच्या लोकांचा ही वाईट काळ आता इतिहासात जमा होणार असे ज्योतिषशास्त्राच्या तज्ञांकडून सांगितले जात आहे. या लोकांचा सुवर्णकाळ आजपासून सुरू होईल अस आपण म्हणू शकतो. या लोकांना नोकरीमध्ये आणि व्यवसायामध्ये चांगले लाभ मिळणार आहेत.
नोकरी करणाऱ्या लोकांना या काळात प्रमोशन आणि पगार वाढ अशी भेट मिळू शकते. घरात आनंदाचे वातावरण राहणार आहे. या काळात या राशीच्या लोकांचे उत्पन्न सुद्धा वाढणार आहे. म्हणून खऱ्या अर्थाने या लोकांचा वाईट काळ आता संपेल असं आपण म्हणू शकतो.