Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहातील ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. तसेच ग्रहांचा अस्त आणि उदय सुद्धा होत असतो. दरम्यान, शनी ग्रहाचे नुकतेच राशी परिवर्तन झाले आहे. शनी ग्रहाचे 29 मार्च 2025 रोजी मीन राशीत परिवर्तन झाले आहे.
शनी ग्रहाच्या या गोचरमुळे राशीचक्रातील अनेक राशीच्या लोकांवर सकारात्मक आणि नकारात्मक असा प्रभाव पाहायला मिळतोय. दरम्यान काल नऊ एप्रिल 2025 रोजी शनी ग्रहाचा मीन राशीमध्ये उदय झालेला आहे. शनी ग्रहाचा मेन राशीमध्ये उदय झाला असल्याने आता याचा राशीचक्रातील अनेक राशीच्या लोकांवर थेट प्रभाव पाहायला मिळणार आहे.

शनी ग्रहाच्या या चालीमुळे राशीचक्रातील काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत. दरम्यान आता आपण शनी ग्रहाच्या या चालीचा नेमका कोण कोणत्या राशीच्या लोकांवर सकारात्मक प्रभाव पाहायला मिळणार या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत.
या राशीच्या लोकांना मिळणार अद्भुत लाभ
वृषभ : या राशीच्या लोकांना आता आपल्या आयुष्यात अनेक मोठमोठे बदल घडताना दिसतील. शनी ग्रहाचा मीन राशीतील उदय या राशीच्या लोकांसाठी फायद्याचा ठरणार असून 10 एप्रिल पासून या लोकांचा वाईट काळ समाप्त होणार आहे.
आर्थिक बाबतीत या लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पैशांच्या बाबतीत हा काळ या लोकांसाठी मोठा फायदा राहणार असून या काळात या लोकांना अडकलेले पैसे सुद्धा परत मिळू शकतात. या राशीच्या ज्या लोकांना पैशांची कमतरता वाटत असेल तर आता ती परिस्थिती पूर्णपणे चेंज होणार आहे.
या लोकांची प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि जीवनात स्थिरता येणार आहे. या राशीच्या लोकांना आपल्या मित्रांकडून आणि नातेवाईकांकडून लवकरच मोठी आनंदाची बातमी मिळू शकते असे योग तयार होताना दिसतील.
कर्क : शनि राशीचा मीन राशीत उदय होणार आहे आणि याचाच प्रभाव म्हणून कर्क राशीच्या लोकांचे अच्छे दिन सुरू होतील असे म्हटले जात आहे. शनी ग्रहाचा मीन राशीच्या उदयामुळे आता कर्क राशीच्या लोकांमध्ये एका नवीन ऊर्जेचा संचार होणार आहे.
यामुळे हे लोक आपल्या आयुष्यात मोठे प्रगती करताना दिसतील. मानसिक दृष्ट्या या लोकांसाठी हा का फारच अनुकूल राहणार आहे कारण की, या लोकांचा मानसिक ताण कमी होणार आहे. हे लोक सर्वच क्षेत्रात चांगली प्रगती करताना दिसतील आणि सर्वच गोष्टी या लोकांच्या अनुकूल होऊ लागणार आहेत.
या राशीच्या लोकांच्या विविध प्रकारच्या अडचणी आता दूर होतील. महत्त्वाचे म्हणजे या काळात या लोकांचे आरोग्य सुद्धा उत्तम राहणार आहे. जे लोक जुन्या आजाराने त्रस्त असतील त्यांना आता या काळात आराम मिळणार आहे. करिअरच्या दृष्टिकोनातूनही या लोकांसाठी हा काळ फारच अनुकूल राहणार आहे.
मकर : वृषभ आणि कर्क राशीच्या लोकांप्रमाणेच आता मकर राशीच्या लोकांचा अडचणींचा काळ सुद्धा लवकरच संपणार आहे. या राशीच्या लोकांचा वाईट काळ आता कायमचा इतिहासात जमा होणार असे दिसते. कारण की शनी ग्रहाचा मीन राशीतील उदय या राशीच्या लोकांसाठी अधिक फायद्याचा ठरणार आहे.
या लोकांना वाटत असलेला मानसिक आणि भावनिक भार आता हलका होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना या काळात चांगले यश मिळताना दिसेल. करिअरमध्ये या लोकांची चांगली ग्रोथ होणार आहे. या लोकांना नोकरीत पदोन्नती मिळू शकते.
या लोकांना कामाच्या ठिकाणी चांगली प्रशंसा मिळणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना सुद्धा या काळात चांगला फायदा होणार आहे. पैशांच्या बाबतीत सुद्धा मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ मोठा अनुकूल राहणार आहे.