Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र हा नवग्रहातील सर्वात महत्त्वाचा ग्रह आहे. शुक्र ग्रह सौंदर्य ऐश्वर्य प्रेम धनसंपत्ती आणि वैभवाचा कारक मानला जातो. यामुळे जर हा ग्रह कुंडलीत मजबूत असेल तर व्यक्तीला भौतिक सुखाची कमतरता भासू देत नाही. दरम्यान हाच महत्वपूर्ण ग्रह आता नक्षत्र परिवर्तन करणार आहे.
नवग्रहातील इतर ग्रह ज्याप्रमाणे राशी आणि नक्षत्र परिवर्तन करतात त्याचप्रमाणे शुक्र ग्रह देखील वेळोवेळी राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतो आणि जेव्हा केव्हा शुक्राचे राशी किंवा नक्षत्र परिवर्तन होते तेव्हा राशीचक्रातील सर्वच राशीच्या लोकांवर सकारात्मक आणि नकारात्मक असा प्रभाव पाहायला मिळतो.

दरम्यान येत्या चार दिवसांनी म्हणजेच आठ जुलै 2025 रोजी शुक्र ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन होणार आहे. यानंतर मात्र राशीचक्रातील काही राशीच्या लोकांचे नशीब चमकणार आहे.
शुक्र ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन
आठ जुलै रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास शुक्र ग्रह रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. सध्या शुक्र ग्रह कृतिका नक्षत्रात विराजमान आहे आणि आठ जुलै रोजी तो रोहिणी नक्षत्रात जाईल. दरम्यान, शुक्र ग्रह रोहिणी नक्षत्रात गेल्यानंतर राशीचक्रातील काही राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे.
आठ जुलै नंतर काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात भरभराटीचा काळ येणार आहे. दरम्यान आता आपण या नक्षत्र परिवर्तनाचा नेमक्या कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार याचा आढावा घेणार आहोत.
या राशीच्या लोकांना येणार अच्छे दिन
कन्या : या राशीच्या व्यक्तींसाठी आठ जुलै नंतरचा काळ विशेष अनुकूल राहणार आहे. या राशीच्या लोकांचा वाईट काळ आता समाप्त होईल आणि नव्या सुवर्णकाळाला सुरुवात होणार आहे. या काळात कन्या राशीच्या लोकांना मानसिक समाधान, सामाजिक प्रतिष्ठा आणि आर्थिक लाभ मिळू शकतो असे संकेत मिळत आहेत.
हा काळ विद्यार्थ्यांसाठी मोठा अनुकूल राहणार आहे विशेषता जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतायेत त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल असेल. दीर्घकाळ रखडलेली कामं सुद्धा या काळात मार्गी लागतील असे संकेत मिळत आहेत.
सिंह : सिंह राशीच्या लोकांसाठी सुद्धा आठ जुलै नंतरचा काळ विशेष अनुकूल राहील. हा काळ ज्या राशीचे जे लोक नोकरी करणारे असतील त्यांच्यासाठी अधिक अनुकूल राहणार आहे कारण की नोकरीमध्ये प्रमोशनचे चान्सेस दिसत आहे तसेच वेतन वाढ होण्याचे सुद्धा चान्सेस आहेत.
नवीन घर आणि नवीन वाहन खरेदीचे सुद्धा योग तयार होताना दिसतायेत. या काळात बिजनेस मध्ये विशेष वाढ पाहायला मिळू शकते आणि या लोकांना आर्थिक तंगीतून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मेष : कन्या आणि सिंह राशीच्या लोकांप्रमाणेच मेष राशीच्या लोकांचाही वाईट काळ आता समाप्त होणार आहे. या राशीसाठी शुक्राचे रोहिणी नक्षत्रात होणारे गोचर विशेष फलदायी सिद्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या लोकांना हा काळ एवढा अनुकूल राहील की या काळात अडकलेले पैसे सुद्धा परत मिळण्याची शक्यता आहे.
नोकरीमध्ये प्रमोशन होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना काही नवीन संधी मिळू शकतात. जे लोक अविवाहित आहेत त्यांना विवाहाचे नवीन प्रस्ताव येऊ शकतात. या काळात नवीन इन्कम सोर्स सापडतील ज्यामुळे यांचा इन्कम आणखी वाढणार आहे.