Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहातील ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करतात. दरम्यान जेव्हा केव्हा ग्रहांचे राशी परिवर्तन होते तेव्हा राज योगाचे सुद्धा निर्मिती होत असते. काही राजयोग हे राशीचक्रातील काही राशीच्या लोकांसाठी फायद्याचे ठरतात तर काही लोकांना यापासून नुकसानही सहन करावे लागते.
दरम्यान, मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ग्रहांच्या चालीमुळे गजकेसरी राजयोग होणार आहे. वास्तविक, या आठवड्यात, चंद्र आणि गुरु एकमेकांकडून मध्यभागी असलेल्या घरात विराजमान होणार आहेत. यामुळे गजकेरी राज योग तयार होणार आहे. दरम्यान याच राज योगाच्या प्रभावामुळे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात राशीचक्रातील काही राशीच्या लोकांचे नशीब कलाटणी घेणार आहे.

या संबंधित राशीच्या लोकांचे वाईट दिवस आता संपणार आहेत आणि अच्छे दिन सुरू होणार आहेत. आता आपण या राज योगाचा प्रभाव कोणत्या राशीच्या लोकांवर दिसून येईल आणि त्यांना नेमका काय लाभ मिळणार याची माहिती पाहूयात.
मकर : 24 मार्च 2025 पासून या राशीच्या लोकांचे अच्छे दिन सुरू होतील. वाईट काळ भूतकाळात जमा होईल आणि चहूबाजूकडून या लोकांना आनंद वार्ता ऐकायला मिळतील. पैशांच्या बाबतीत सुद्धा हा काळ या लोकांसाठी विशेष अनुकूल राहणार आहे. आर्थिक दृष्ट्या आणि करिअरसाठी हा काळ विशेष फायद्याचा राहील.
या लोकांनी जर आळस दाखवला नाही तर सर्वच क्षेत्रात या लोकांना चांगले यश मिळणार आहे. या राशीच्या लोकांना महिला मित्राकडून या काळात चांगले सहकार्य मिळणार आहे. समाजात या लोकांचा मानसन्मान आणखी वाढणार आहे.
कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल आणि या लोकांना आपल्या पालकांकडून शंभर टक्के समर्थन मिळणार आहे. या आठवड्यात काही लोकांची मैत्री प्रेमात रूपांतरित होईल असे दिसते. लव लाइफ च्या बाबतीत हा काळ अनुकूल राहणार आहे. मात्र विवाहित लोकांनी आपल्या जोडीदाराच्या आरोग्याची यावेळी काळजी घ्यायला हवी.
मेष : मकर प्रमाणेच मेष राशीच्या लोकांना सुद्धा या काळात चांगला लाभ मिळणार आहे. या लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी तसेच व्यावसायिक लोकांसाठी हा काळ मोठा अनुकूल राहील. व्यवसायातून चांगला आर्थिक लाभ होऊ शकतो तर नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन आणि पगार वाढीसाठी मोठी भेट मिळू शकते.
नवी नोकरी शोधत असाल तर या काळात ते सुद्धा शक्य होणार आहे. बेरोजगार लोकांना या काळात चांगली मनपसंत नोकरी लागू शकते. या आठवड्यात हे लोक काही बुद्धिमान लोकांना भेटतील आणि यामुळे यांच्या आयुष्याला एक नवीन प्रस्पेक्टिव्ह मिळणार आहे. यांच्या आयुष्यात बुद्धिमान लोकांच्या आगमनाने मोठा सकारात्मक बदल दिसेल.
हे लोक आपल्या करिअरमध्ये काहीतरी मोठी गोष्ट या काळात साध्य करतील. परंतु या काळात खर्चावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे नाहीतर मानसिक टेन्शन वाढू शकते. तुमच्या जोडीदारासमवेत तुमचे काही मतभेद झालेले असतील तर ते या काळात दूर होऊ शकतात.
सिंह : मेष राशी प्रमाणे सिंह राशीच्या लोकांना सुद्धा या काळात चांगला लाभ होणार आहे. या लोकांचा वाईट काळ सुद्धा आता संपेल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा विशेष अनुकूल राहणार आहे. या काळात या लोकांना प्रमोशन मिळू शकतं आणि साहजिकच यामुळे पगार सुद्धा वाढण्याची शक्यता आहे.
नोकरी करणाऱ्या लोकांचे आपल्या वरिष्ठासमवेत असणारे संबंध आणखी दृढ होणार आहेत. या काळात या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहील. वैवाहिक जीवनात आनंद असेल कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नवीन इन्कम सोर्स सापडतील त्यामुळे आर्थिक स्थिती आणखी चांगली होईल.
परंतु या आठवड्यात तुमच्या कुटुंबातील वयस्कर लोकांच्या तब्येतीत बिघाड होण्याची भिती आहे. त्यामुळे कुटुंबात कोणी ज्येष्ठ नागरिक असेल तर त्यांच्या आरोग्याची तुम्ही विशेष काळजी घ्या. दरम्यान जे लोक राजकारणात आहेत त्यांना मात्र या काळात काहीतरी मोठी गुड न्यूज मिळू शकते. राजकारणी लोकांना काहीतरी नवीन जबाबदारी मिळण्याचे संकेत मिळत आहेत.
तुळा : तुला राशीच्या लोकांसाठी सुद्धा हा काळ फारच अनुकूल राहणार आहे. आतापर्यंत जे वाईट झालं असेल ते घडलं पण आता यापुढे या लोकांच्या आयुष्यात चांगले सकारात्मक बदल आपल्याला पाहायला मिळतील. नोकरी तसेच व्यवसायाशी संबंधित आनंदाची बातमी या लोकांच्या कानावर पडेल. इनकम मध्ये वाढ होणार आहे.
खर्च नियंत्रणात ठेवले तर बँक बॅलन्स सुद्धा वाढणार आहे. या काळात मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. परंतु हे लोक भौतिक सुख सुविधांसाठी या आठवड्यात मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची शक्यता आहे. हे लोक काहीतरी नवीन वस्तू खरेदी करतील आणि ज्यामुळे यांना मोठे समाधान मिळणार आहे.
वृश्चिक : वृश्चिक राशीचे जे लोक नोकरी करतात त्यांना या आठवड्यात गुड न्यूज मिळणार आहे. नोकरीत प्रमोशन किंवा पगार वाढ मिळू शकते. नवीन नोकरी लागू शकते. व्यवसायासाठी सुद्धा हा काळ अनुकूल असेल. व्यवसायिक लोकांना दूरवरचे प्रवास करावे लागू शकतात पण या प्रवासातून देखील या लोकांना काहीतरी मोठी गोष्ट साध्य होण्याची शक्यता आहे.
दूरवरच्या प्रवासातून चांगली मोठी ऑर्डर मिळू शकते आणि यामुळे व्यवसायिकांच्या ऑर्डर बुक फुल होतील आणि पैशांची इनकमिंग सुद्धा वाढणार आहे. या काळात नव्या मित्राच्या मदतीने हे लोक आपले महत्त्वाचे काम पूर्ण करतील. या लोकांचा वाईट काळ सुद्धा आता भूतकाळात जमा होईल. हा आठवडा या लोकांसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे.