Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रात शनी ग्रहाला फार महत्व देण्यात आले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहातील इतर ग्रहांप्रमाणेच शनी ग्रहाचे सुद्धा राशी आणि नक्षत्र परिवर्तन होत असते. शनी ग्रहाचे राशी परिवर्तन फारच संथ गतीने होते. शनी ग्रह एका राशीत तब्बल अडीच वर्ष राहतो.
शनी ग्रह सध्या मीन राशि मध्ये आहे आणि 2027 पर्यंत तो याच राशीमध्ये राहील. विशेष बाब अशी की या काळात शनी ग्रहाची इतर ग्रहांसोबत युती सुद्धा होईल आणि यामुळे काही शुभ आणि अशुभ योग सुद्धा तयार होतील.

दरम्यान उद्या अर्थातच 3 जुलै रोजी शनी ग्रह असाच एक शुभ योग तयार करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार उद्या सायंकाळी शनी आणि सूर्य ग्रह एकमेकांपासून शंभर अंशाचा कोन तयार करतील. यामुळे उद्या शतांक योगाची निर्मिती होणार आहे.
या योगामुळे राशी चक्रातील काही राशीच्या लोकांचे नशीब उजळेल असे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत आज आपण उद्यापासून राशीचक्रातील कोणत्या राशीच्या लोकांचे आयुष्य कलाटणी घेणार आहे याची माहिती या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
या राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश
सिंह : या राशीच्या व्यक्तींचा उद्या खऱ्या अर्थाने भाग्योदय होणार आहे. 3 जुलै 2025 पासून या लोकांचे अच्छे दिन सुरू होणार आहेत. या लोकांसाठी हा काळ आर्थिक दृष्ट्या चांगला संपन्न राहणार आहे.
या काळात या राशीच्या नोकरदार लोकांना प्रमोशनची भेट मिळण्याची शक्यता आहे तसेच सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होणार असे संकेत मिळत आहेत. या काळात मित्र व कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. शिवा या राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन सुद्धा सौहार्दपूर्ण राहील.
मकर : सिंह राशीच्या लोकांप्रमाणेच मकर राशीच्या लोकांचाही वाईट काळ आता समाप्त होणार आहे. हा काळ या राशीच्या व्यवसायकांसाठी मोठी संधी घेऊन येणार आहे.
व्यवसाय करणाऱ्यांना या काळात चांगला लाभ मिळणार आहे शिवाय नोकरीतही पदोन्नती व वेतनवाढ मिळू शकते असे संकेत मिळत आहेत. या लोकांचा समाजातील मानसन्मान आणखी वाढणार आहे. हे लोक कुटुंबासह धार्मिक प्रवासाला जातील असे योग तयार होताना दिसतायेत.
कर्क : सिंह आणि मकर राशीच्या लोकांप्रमाणेच कर्क राशीच्या लोकांसाठी सुद्धा उद्यापासूनचा काळ अनुकूल राहणार आहे. या काळात या लोकांची अनेक प्रलंबित कामे पूर्ण होणार आहेत.
या लोकांचा मानसिक ताण सुद्धा या काळात कमी होईल. या लोकांना नवे रोजगार व व्यावसायिक संधी प्राप्त होतील. वरिष्ठांकडून या लोकांचे विशेष कौतुक केले जाईल. नोकरदार लोकांना बोनस मिळण्याची सुद्धा शक्यता आहे.