Zodiac Sign : आज श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांचा मोठा जनसागर एकवटला आहे. आज देवशयनी म्हणजे आषाढी एकादशी आणि या आषाढी एकादशीला दरवर्षी पंढरपुरात वारकऱ्यांची मोठी गर्दी होते आणि यंदाही मोठ्या संख्येने वारकरी बा विठोबाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झाले आहेत.
दरम्यान यंदाचा हा आषाढी सोहळा काही राशीच्या लोकांसाठी महत्त्वाचा ठरणार असे पंचांगातून समोर येत आहे. कारण की आज अर्थातच आषाढी एकादशीच्या दिवशी काही ग्रहांचा शुभ संयोग होताना दिसतोय. याव्यतिरिक्त आज ग्रहांचा राजा सूर्य सुद्धा आपली चाल बदलणार आहे.

आज ग्रहांचा राजा सूर्य नक्षत्र परिवर्तन करणार अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान आषाढी एकादशीच्या दिवशी होणाऱ्या सूर्यग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाचा राशीचक्रातील काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल पाहायला मिळणार आहे.
सूर्यग्रह कोणत्या नक्षत्रात प्रवेश करणार?
सहा जुलै 2025 रोजी अर्थातच देव शयनी एकादशीच्या दिवशी सूर्यग्रह एका नव्या नक्षत्रात प्रवेश करणार आहे. आज ग्रहांचा राजा पुनर्वसू नक्षेत्रात प्रवेश करेल अशी माहिती पंचांगातून समोर आली आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा सूर्यग्रहाचे नक्षत्र परिवर्तन होते तेव्हा याचा मानवी जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक असा प्रभाव पाहायला मिळतो.
आज सूर्य ग्रहाचे पुनर्वसु नक्षेत्रात गोचर होत असल्याने याचा देखील राशीचक्रातील काही राशीच्या लोकांवर सकारात्मक परिणाम पाहायला मिळणार आहे. दरम्यान आता आपण ग्रहांच्या राजाच्या या नक्षत्र परिवर्तनाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार? याबाबतची माहिती पाहणार आहोत.
या राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश
सिंह : या राशीच्या लोकांचा आज आषाढी एकादशीच्या दिवशी खऱ्या अर्थाने भाग्योदय होणार आहे. हा काळ या लोकांसाठी अधिक अनुकूल राहील आणि या लोकांवर माता लक्ष्मीची विशेष कृपा राहणार आहे. यांना आकस्मिक धनलाभ होण्याची शक्यता आहे. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील.
यामुळे या लोकांचा आत्मविश्वास सुद्धा वाढणार आहे. पंचांगानुसार हा काळ असा आहे जिथे या लोकांना भौतिक सुखांची प्राप्ती होईल. या काळात नवीन वस्तू खरेदी केल्या जातील. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल असे संकेत मिळत आहेत. आर्थिक दृष्ट्या हा काळ चांगला राहणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना या काळात प्रमोशनची भेट मिळू शकते.
तूळ : सिंह राशीच्या लोकांप्रमाणेच तुळ राशीच्या लोकांसाठी देखील आषाढी एकादशी लकी ठरणार आहे. या दिवशी सूर्य ग्रहाचे होणारे नक्षत्र गोचर तुळ राशीच्या लोकांसाठी अधिक अनुकूल राहील. हा असा काळ राहणार आहे जिथे तुळ राशीच्या लोकांना व्यक्तीगत आणि व्यावसायिक दोन्ही पातळ्यांवर यश मिळेल.
या लोकांचा सेल्फ कॉन्फिडन्स या काळात वाढेल. आयुष्यातील अनेक अडचणी, अडथळे दूर होतील. कुटुंबात देखील अगदीच प्रसन्न वातावरण राहील. खऱ्या अर्थाने या लोकांचा वाईट काळ आता संपेल असं आपण म्हणू शकतो.
धनु : सिह आणि तूळ या दोन्ही राशीच्या लोकांप्रमाणेच धनु राशीच्या जातकांसाठी सुद्धा आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर झालेले सूर्यग्रहाचे हे नक्षत्र परिवर्तन अधिक फलदायी ठरणार आहे. अगदीच एकादशीच्या दिवशी सूर्यग्रहाचे नक्षत्र परिवर्तन झाल्याने या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल, तसेच नवीन उत्पन्न स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे.
या काळात हे लोक नवीन वाहन किंवा जमिनीची खरेदी करतील असे संकेत मिळत आहेत. या लोकांना गुंतवणुकीतून चांगला नफा मिळणार आहे. व्यवसाय करणाऱ्यांना सुद्धा या काळात चांगला लाभ मिळेल विशेषता जे लोक आयात-निर्यात व्यवसाय करतात त्यांना या काळात मोठा लाभ मिळणार आहे. मुलांकडून सुखद बातम्या ऐकायला मिळू शकतात असे संकेत मिळत आहेत.