216 रुपयांचा स्टॉक 400 रुपयांवर जाणार! झोमॅटोच्या स्टॉकबाबत तज्ञांनी दिले मोठे संकेत

बीएसई सेन्सेक्स 199.76 अंकांनी घसरून 75,939.21 वर पोहोचला, तर निफ्टी 102.15 अंकांनी घसरून 22,929.25 वर बंद झाला. या घसरणीचा परिणाम झोमॅटो लिमिटेडच्या शेअरवरही दिसून आला. या स्टॉकच्या किमती पुन्हा एकदा कमी झाल्या आहेत.

Published on -

Zomato Share Price : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चढ-उतार सुरू आहे, शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून तिमाही निकाल जाहीर केले जात आहेत आणि यामुळे काही स्टॉक्समध्ये सुधारणा होत आहे तर काही स्टॉकच्या किमती घसरत आहेत. दरम्यान, शुक्रवारी शेअर बाजारात पुन्हा एकदा मोठ्या घसरणीची नोंद झाली.

बीएसई सेन्सेक्स 199.76 अंकांनी घसरून 75,939.21 वर पोहोचला, तर निफ्टी 102.15 अंकांनी घसरून 22,929.25 वर बंद झाला. या घसरणीचा परिणाम झोमॅटो लिमिटेडच्या शेअरवरही दिसून आला. या स्टॉकच्या किमती पुन्हा एकदा कमी झाल्या आहेत.

झोमॅटो शेअरची सध्याची स्थिती कशी आहे?

शुक्रवारी झोमॅटो शेअर 216.44 रुपयांवर ट्रेड करत होता, जो 0.66% नी घसरला. ट्रेडिंगची सुरुवात 218.54 रुपयांवर झाली होती, तर दिवसातील उच्चांक 219.72 रुपये आणि नीचांकी स्तर 213.44 रुपये होता.

झोमॅटोचा 52 आठवड्याचा उच्चांक 304.70 होता, तर नीचांकी स्तर 144.30 रुपये राहिला. झोमॅटो लिमिटेडचे एकूण मार्केट कॅप 2,08,438 कोटी रुपये आहे. सध्या कंपनीवर 1,159 कोटी रुपयांचे कर्ज आहे. 

शेअरचा परतावा आणि गुंतवणूकदारांची रणनीती

गेल्या 5 दिवसांत झोमॅटो शेअर 6.36% नी घसरला आहे, तर मागील 1 महिन्यात 11.26% नी घट झाली आहे. मात्र, 1 वर्षाच्या कालावधीत शेअर 39.77% नी वाढला असून, दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी 71.78% परतावा दिला आहे.

Zomato साठी टार्गेट प्राईस 

 29 पैकी 17 लोकांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे म्हणजेच बाय रेटिंग दिली आहे तर सात लोकांनी स्ट्रॉंग बाय रेटिंग दिली आहे. या स्टॉकसाठी सरासरी टार्गेट प्राईस 286.66 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

काही स्टॉक मार्केट विश्लेषकांनी हा स्टॉक चारशे रुपयांपर्यंत जाऊ शकतो असाही अंदाज वर्तवला आहे. सध्याच्या 216.44 रुपयांच्या किमतीच्या तुलनेत हे अंदाज सकारात्मक आहेत.

गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा निर्णय

शेअर बाजारातील सध्याच्या अस्थिरतेमुळे अल्पकालीन गुंतवणूकदार सावधगिरी बाळगू शकतात, तर दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी झोमॅटो शेअर आकर्षक ठरू शकतो. भविष्यातील संभाव्य वाढ लक्षात घेता, तज्ञ गुंतवणूकदारांना योग्य वेळी निर्णय घेण्याचा सल्ला देत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!