‘हा’ 229 रुपयांचा स्टॉक 330 रुपयांवर जाणार ! एक्सपर्ट म्हणतात आत्ताच खरेदी करा

सध्या भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत आहे यामुळे गुंतवणूकदार अस्वस्थ आहेत. मात्र बाजारात असणाऱ्या या मंदीच्या काळात सुद्धा काही स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहेत. तर काही कंपन्यांचे स्टॉक आगामी काळात चांगला परतावा देतील असे म्हटले जात आहे. झोमॅटो देखील असाच एक स्टॉक असून यासाठी तब्बल 330 रुपयांपर्यंतचे टार्गेट प्राईज निश्चित करण्यात आले आहे.

Published on -

Zomato Share Price : भारतीय शेअर बाजारात गेल्या अनेक दिवसानंतर आज पहिल्यांदा तेजी दिसली. मात्र असे असले तरी अजूनही बाजार पूर्णपणे सावरलेला नाही. दरम्यान, आज 25 फेब्रुवारी 2025 रोजी पुढे डिलिव्हरी करणाऱ्या झोमॅटो कंपनीच्या स्टॉक मध्ये तेजी दिसून आली आहे.

आज हा स्टॉक तब्बल तीन टक्क्यांनी वाढलाय, यामुळे हा स्टॉक पुन्हा एकदा फोकस मध्ये आला आहे. खरेतर, आजच्या तेजीसह हा शेअर 52 आठवड्यांचा नीचांकावरून 58 टक्क्यांनी वधारला आहे.

या स्टॉकचा 52 आठवड्याचा नीचांक 144.30 रुपये इतका आहे. 14 मार्च 2024 रोजी हा स्टॉक नीचांक स्तरावर होता मात्र पुढे 5 डिसेंबर 2024 रोजी हा स्टॉक 304.50 रुपयांवर ट्रेड करत होता. खरंतर हा स्टॉक गेल्यावर्षी 125 टक्क्यांनी वाढलाय.

दरम्यान आता या स्टॉकसाठी टॉप ब्रोकरेज कडून सकारात्मक संकेत देण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत आज आपण या स्टॉकची शेअर बाजारातील सध्याची स्थिती आणि यासाठी ब्रोकरेजकडून नेमका काय अंदाज देण्यात आला आहे या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत.

स्टॉकची शेअर बाजारातील सध्याची स्थिती काय आहे

झोमॅटोचा शेअर आज, 25 फेब्रुवारी 2025 रोजी तीन टक्क्यांनी वाढला. हा स्टॉक सध्या 229.30 रुपयांवर ट्रेड करत आहे. मात्र या स्टॉकची प्रेविअस क्लोजिंग प्राईस 222.60 इतकी आहे. म्हणजे काल हा स्टॉक 222.60 रुपयांवर क्लोज झाला.

कंपनीच्या मार्केट याबाबत बोलायचं झालं तर सध्या या कंपनीचे एकूण मार्केट कॅप 3.05 लाख कोटी इतके आहे. हा मल्टीबॅगर शेअर गुंतवणूकदारांच्या पसंतीचा स्टॉक आहे. यामध्ये गेल्या एका वर्षात 40 टक्क्यांची आणि दोन वर्षांत 320 टक्क्यांची वाढ झाली आहे.

टार्गेट प्राईस आताच नोट करा

ब्रोकरेज मोतीलाल ओसवाल यांनी झोमॅटो शेअरसाठी 330 रुपयांची टारगेट प्राईस निश्चित केली आहे. ब्रोकरेज फर्म बर्नस्टाइनने झोमॅटो शेअर्ससाठी ‘Outpeform’ रेटिंग दिलेली आहे. तसेच या शेअर साठी 310 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे.

दुसरीकडे, आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्सचे तांत्रिक संशोधन विश्लेषक जिगर एस पटेल यांनी या स्टॉकसाठी सर्वात कमी टारगेट प्राईस निश्चित केली आहे. या शेअरसाठी त्यांनी 240 रुपयांची टारगेट प्राईस निश्चित केली आहे आणि यासाठी 196 रुपयांचा स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला सुद्धा दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe