शेतकऱ्यांना मिळणार दोन हजार, तर लाडक्या बहिणींना मिळणार आणखी पंधराशे रुपये ! 5 फेब्रुवारीआधी सरकार मोठा निर्णय घेणार ? कारण….

Published on -

Zp Election News : आज 15 जानेवारी रोजी राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान पूर्ण झाले आणि उद्या याचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान येत्या 5 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेसाठी मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काल मकर संक्रांतीच्या दिवशी राज्यातील लाडक्या बहिणीच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये जमा करण्यात आले आहेत. दरम्यान, आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने पुन्हा एकदा फडणवीस सरकार असाच मोठा निर्णय घेण्याची तयारी करत असल्याचे वृत्त समोर आले आहे. 

झेडपीची निवडणूक 5 फेब्रुवारीला 

मिळालेल्या माहितीनुसार पाच तारखेला होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या मतदानाच्या आधी राज्यातील लाडक्या बहिणींना आणि शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळू शकतो. लाडक्या बहिणींना पुढील हफ्त्याचे म्हणजे जानेवारीचे पैसे जिल्हा परिषदेच्या मतदानाच्या आधीच मिळणार हे जवळपास फिक्स आहे.

तसेच शेतकऱ्यांना देखील याच कालावधीत एक महत्त्वाच्या योजनेचे 2 हजार रुपये वितरित होऊ शकतात. लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळणार आहे, तर शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा आठवा हप्ता वितरित होण्याची शक्यता आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील लाखो लाडक्या बहिणींना आणि शेतकऱ्यांना मिळणार लाभ !

ZP च्या मतदाना आधी राज्यातील लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळणार आहे. एकट्या सोलापूर जिल्ह्यातील साडेनऊ लाख लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा लाभ दिला जाणार आहे.

तसेच पीएम किसानच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी योजनेचा पुढील आठवा हप्ता देखील याच कालावधीत वितरित होणार आहे. नमोचा आठवा हप्ता 5 फेब्रुवारी च्या आत जमा होईल.

राज्यातील जवळपास 91 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. एकट्या सोलापूर जिल्ह्यातील सव्वा पाच लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा आठवा हप्ता मिळणार आहे. 

निधी मागणीचा प्रस्ताव सादर 

राज्यातील 91 लाख 97 हजार शेतकरी पीएम किसानचे लाभार्थी आहेत. एवढेच शेतकरी हे नमो शेतकरीचे पण लाभार्थी आहेत. दरम्यान नमो शेतकरीच्या लाभार्थ्यांना हप्ता वितरित करण्यासाठी कृषी विभागाने वित्त विभागाकडे 1930 कोटी रुपयांची मागणी केली असून याबाबतचा प्रस्ताव नुकताच सादर झाला आहे.

दरम्यान लवकरच वित्त विभागाकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळेल अशी आशा आहे. दरम्यान, वित्त विभागाकडून मंजुरी मिळाल्यानंतर लगेचच कृषी विभागाकडून राज्यातील नमो शेतकरी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना आठव्या हफ्त्याचे दोन हजार रुपये वितरित केले जाणार आहेत.

कृषी विभागाच्या उपसंचालकांनी स्वतः विभागाकडून वित्त विभागाकडे निधी बाबत मागणी करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. यामुळे आता 5 फेब्रुवारी 2026 आधी राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी चा आठवा हप्ता मिळणार हे फिक्स झाले आहे. त्याचवेळी लाडक्या बहिणींना देखील जानेवारी महिन्याचा हफ्ता 5 फेब्रुवारी आधीच मिळणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News