‘या’ भारतीय खेळाडूचे अपघाती निधन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :- भारताचे आंतरराष्ट्रीय तिरंदाज, प्रशिक्षक जयंतीलाल ननोमा यांचे कार अघातात निधन झाले. त्यांच्या अकस्मात जाण्याने भारतीय क्रीडा क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.

रविवारी रात्री ननोमा हे एका सहाय्यक शिक्षकाबरोबर बांसपाडाहीन डंगरपूर येथे परतत होते. यावेळी सागरवाडा रोड येथे एका पुलाजवळ गाडीवरून चालकाचा ताबा सुटला आणि अपघात घडला.

या अपघातात ननोमा यांना जबर दुखापत झाली होती. ननोमा यांच्या डोक्याला मार बसला होता आणि मोठ्या प्रमाणात रक्तही वाया गेले होते.

उदयपूरला ननोमा यांना नेत असताना रस्त्यामध्येच त्यांचे निधन झाले. ननोमा यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताटला सुवर्णपदके जिंकवून दिली होती.

त्याचबरोबर ननोमा यांनी २०१३, २०१५ आणि २०१८ साली भारतीय तिरंदाजांना प्रशिक्षणही दिले होते. सध्याच्या घडीला राजस्थानमध्ये क्रीडा जिल्हाधिकारी म्हणून ते कार्यरत होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment