ICC ODI WC 2023: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी ! वर्ल्ड कपमध्ये ‘या’ दिवशी भिडणार भारत-पाकिस्तान; जाणून घ्या अपडेट्स

Ahmednagarlive24 office
Published:

ICC ODI WC 2023:  क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. तुम्हाला हे माहिती असेलच कि  ICC ODI WC 2023 यावेळी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणार आहे यासाठी बीसीसीआय कडून जवळपास तयारी देखील पूर्ण झाली आहे.

यातच आता क्रिकबझच्या वृत्तानुसार एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार 5 ऑक्टोबरला इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने विश्वचषकाची सुरुवात होणार आहे आणि अंतिम सामना 19 नोव्हेंबरला होणार आहे.

भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध

2023 च्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा संघही सहभागी होणार आहे. 15 ऑक्टोबर (रविवार) रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी या स्पर्धेचा उद्घाटन आणि अंतिम सामनाही नरेंद्र मोदी स्टेडियमवर होण्याची शक्यता आहे.

भारतीय संघ आपला पहिला सामना पाच वेळचा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. पाकिस्तानने विश्वचषक स्पर्धेसाठी भारत दौऱ्यावर येण्यास होकार दिल्याची पुष्टीही क्रिकबझने केली आहे पण पाकिस्तान संघ अहमदाबादमध्ये ग्रुप मॅच खेळू इच्छित नसल्याचे वृत्त आहे. तात्पुरत्या वेळापत्रकानुसार, 1992 चा विश्वचषक विजेता संघ पाकिस्तान आपले सामने अहमदाबाद, हैदराबाद, चेन्नई आणि बेंगळुरू येथे खेळेल.

मोहाली-नागपूरमध्ये सामने होणार नाहीत

अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू आणि हैदराबाद व्यतिरिक्त कोलकाता, दिल्ली, इंदूर, धर्मशाला, गुवाहाटी, राजकोट, रायपूर आणि मुंबई येथे विश्वचषक सामने आयोजित करण्याची संधी मिळणार आहे.

तर मोहाली आणि नागपूरला यजमान शहरांच्या यादीतून वगळण्यात आले आहे. 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे आयोजन करणाऱ्या वानखेडे स्टेडियमला यावेळी उपांत्य फेरीच्या सामन्याचे आयोजन करण्याची संधी मिळू शकते.

आतापर्यंत आठ संघ पात्र 

यावेळी विश्वचषक स्पर्धेत एकूण 10 संघांमध्ये 48 सामने होणार आहेत. भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका या मेगा स्पर्धेसाठी आधीच पात्र ठरले आहेत आणि उर्वरित दोन संघांचा निर्णय जून-जुलै महिन्यात झिम्बाब्वे येथे होणाऱ्या पात्रता स्पर्धेद्वारे केला जाईल.

पात्रता स्पर्धांमध्ये वेस्ट इंडिज, श्रीलंका, नेदरलँड, आयर्लंड, नेपाळ, ओमान, स्कॉटलंड, संयुक्त अरब अमिराती आणि यजमान झिम्बाब्वे यांचा समावेश आहे. 2019 विश्वचषकाप्रमाणे यावेळीही सामने राऊंड-रॉबिन स्वरूपात खेळवले जातील, जिथे प्रत्येक संघ दुसर्‍याविरुद्ध एकदा खेळेल. म्हणजेच ग्रुप स्टेज संपल्यानंतर सर्व संघ 9-9 सामने खेळले असतील. गटातील अव्वल चार संघ उपांत्य फेरीत आमनेसामने येतील.

विश्वचषक 2023 चे महत्त्वाचे अपडेट:

1. सलामीचा सामना: 5 ऑक्टोबर, न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड, अहमदाबाद

2. भारताचा पहिला सामना: ऑस्ट्रेलियाविरुद्ध

3. भारत-पाकिस्तान सामना: 15 ऑक्टोबर, अहमदाबाद

4. अंतिम सामना: 19 नोव्हेंबर, अहमदाबाद

हे पण वाचा :- Daridra Yoga : दरिद्र योगामुळे , ‘या’ राशींवर पुढील ‘इतके’ दिवस राहणार मंगळाची कृपा , होणार धनलाभ

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe