Ind Vs Aus Test 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान सुरू असणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना तिसऱ्या दिवशीच पहिल्या सत्रात संपला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा 9 विकेट्सनी पराभव केला आहे.
सामन्याच्या पहिल्या दिवसापासून खेळपट्टीवर मोठा वाद निर्माण झाला आहे. आतापर्यंत अनेक दिग्गजांनी खेळपट्टीवर टीका केली आहे. मात्र आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) खेळपट्टीबाबत मोठी शिक्षा दिली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो ICC ने इंदूरच्या खेळपट्टीला ‘खराब’ रेटिंग दिले आहे. हे रेटिंग आयसीसीच्या खेळपट्टी आणि आऊटफिल्ड मॉनिटरिंग प्रक्रियेअंतर्गत देण्यात आले आहे. यासोबतच मॅच रेफरीच्या अहवालानंतर इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमला तीन डिमेरिट पॉइंट्सही देण्यात आले आहेत.
मॅच रेफरी यांनी आयसीसीला अहवाल पाठवला
आयसीसीचे मॅच रेफरी ख्रिस ब्रॉड यांनीही दोन्ही संघांचे अधिकारी आणि कर्णधारांशी सामन्याबाबत चर्चा केली होती. तसेच या सर्व प्रकारानंतर एक अहवाल तयार करून तो आयसीसीकडे पाठवण्यात आला. याबाबतचा अहवाल बीसीसीआयलाही पाठवण्यात आला आहे. आता कारवाई विरोधात अपील करण्यासाठी बीसीसीआयकडे 14 दिवसांचा अवधी आहे. ख्रिस ब्रॉड म्हणाला, ‘ती खेळपट्टी खूप कोरडी होती. यावर फलंदाज आणि गोलंदाज यांच्यात संतुलन राहिले नाही. येथे सुरुवातीपासूनच फिरकीपटूंना मदत मिळाली. संपूर्ण सामन्यात असमान उसळी पाहायला मिळाली.
कर्णधार रोहितकडून भारतीय खेळपट्ट्यांचे समर्थन
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. सध्या भारतीय संघ मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांचा निकाल तीन दिवसांत आला. आता चौथा आणि शेवटचा सामना 9 मार्चपासून अहमदाबादमध्ये होणार आहे. मात्र यादरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्मानेही भारतीय खेळपट्ट्यांचे समर्थन केले आहे. तो सामन्यानंतर म्हणाला की, चांगली गोष्ट म्हणजे सामन्यांचे निकाल समोर येत आहेत. खेळपट्टीचा दोष नसून फलंदाजांना अशा खेळपट्ट्यांवर धावा काढण्याचा मार्ग शोधावा लागतो.
हे पण वाचा :- Honda New Bike : स्प्लेंडरचा होणार खेळ खल्लास ! बाजारात एन्ट्री करणार होंडाची ‘ही’ स्वस्त बाइक ; किंमत असणार फक्त ..