Ind Vs SA T20 Series Live : भारत-दक्षिण आफ्रिका T20 सीरीज लाईव्ह कुठं पाहणार ? वाचा डिटेल्स

Published on -

India Vs South Africa T20 Series Live : नुकत्याच काही दिवसांपूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात T-20 द्विपक्षीय मालिका झाली आहे. या चार सामन्याच्या मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाचा 3-1 असा दारुण पराभव केला आहे. एकदिवसीय विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम लढत झाली होती.

ही अंतिम लढत ऑस्ट्रेलियाने जिंकली आणि वर्ल्ड चॅम्पियन बनलेत. यानंतर लगेचच ऑस्ट्रेलिया आणि भारतात T-20 ची लढत रंगली. यामध्ये मात्र भारताने ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव केला आणि विश्वचषकातील अंतिम सामन्याचा वचपा काढला.

दरम्यान भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-२०, एकदिवसीय आणि कसोटीची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेचे आयोजन दक्षिण आफ्रिका करत आहे. यासाठी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत पोहोचला आहे. त्या ठिकाणी भारतीय संघाने जोरदार तयारी देखील सुरू केली आहे.

येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या टी-20 विश्वचषकापूर्वी ही मालिका आयोजित झाली असल्याने ही मालिका महत्त्वाची समजली जात आहे. यामुळे या मालिकेत विजयी पताका फडकवण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन टी-२०, तीन एकदिवसीय आणि एक कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे.

सर्वातआधी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी ट्वेंटी मालिका सुरु होणार आहे. पहिला T-20 सामना हा उद्या अर्थातच 10 डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे खेळवला जाणार आहे. पण भारत विरुद्ध आफ्रिका टी ट्वेंटी मालिका जिओ सिनेमा आणि Sports 18 या चैनल वर पाहता येणार नाही.

यामुळे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका T-20 मालिका लाईव्ह कुठं पाहता येणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान आता आपण या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे होणार याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

येथे पाहता येणार सामना
उद्यापासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी ट्वेंटी सिरीज ला सुरुवात होणार आहे. उद्या दहा डिसेंबरला T-20 सिरीज चा पहिला सामना होईल. सुरुवातीला हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री साडेनऊ वाजता सुरू होईल असे सांगितले जात होते.

मात्र आता वेळ बदलला असून सामना साडेसात वाजता सुरू होणार आहे. पण हा सामना जिओ सिनेमा वर लाईव्ह पाहता येणार नाही. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका T-20 सामने डिस्नी प्लस हॉटस्टारवर पाहता येणार आहेत. तसेच जर तुम्हाला टीव्हीवर सामना पाहायचा असेल, तर तुम्ही स्टार स्पोर्ट्सवर या सामन्याचा आनंद घेऊ शकणार आहात.

कसं असेल टी ट्वेंटी सामन्यांचे वेळापत्रक

पहिला T-20 सामना : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी ट्वेंटी सामना हा उद्या अर्थातच 10 डिसेंबर 2023 रोजी खेळवला जाणार आहे.
दुसरा T-20 सामना : दुसरा t20 सामना 12 डिसेंबर 2023 रोजी खेळवला जाणार आहे.
तिसरा T-20 सामना : या मालिकेतील शेवटचा सामना अर्थातच तिसरा t20 सामना 14 डिसेंबर 2023 रोजी खेळवला जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News