IND vs WI 2023 : वेस्ट इंडिजला जाण्याआधीच ह्या 3 भारतीय खेळाडूंची कारकीर्द संपली ! BCCI विसरले नाव, आता निवृत्ती शिवाय नाही पर्याय…

Ahmednagarlive24
Published:

IND vs WI 2023 Letest News : जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताचं दारुण पराभव झाल्या नंतर बीसीसीआयने काही कठोर निर्णय घेतले आहेत. मात्र, कर्णधार रोहितला त्याच्या पदावर कायम ठेवून त्याला दुसरा निर्णय देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मात्र रोहितशिवाय असे तीन खेळाडू आहेत, ज्यांचे पुनरागमन आता शक्य नाही. BCCI सुद्धा त्यांचे नाव विसरले असून ह्या खेळाडूंना आता निवृत्ती शिवाय पर्याय शिल्लक राहिलेले नाहीत.आज ह्या बातमीतुन पाहुयात हे तीन खेळाडू

उमेश यादव
जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्मा यांच्यापेक्षा उमेश यादवची सरासरी कसोटी क्रिकेटमध्ये चांगली आहे. उमेश यादवने कसोटी फॉर्मेटमध्ये 57 कसोटी सामन्यांमध्ये 170 बळी घेतले आहेत.

उमेश यादवला नुकत्याच झालेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळाले, पण आता तो वेस्ट इंडिज दौऱ्यासह अनेक आगामी दौऱ्यांमधून बाहेर पडला आहे. उमेश यादवचे पुनरागमन खूपच कठीण दिसत आहे.

इशांत शर्मा
इशांत शर्माने 2021 मध्ये झालेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले, जिथे त्याला फक्त तीन विकेट घेता आल्या. इशांतच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 105 कसोटी सामन्यांमध्ये 311 बळी आहेत.

इशांतने शेवटची कसोटी 2021 साली न्यूझीलंडविरुद्ध डिसेंबर 2021 मध्ये खेळली होती. आयपीएलच्या या मोसमात इशांतने चांगली कामगिरी करून संघात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला.

केदार जाधव
या यादीत तिसरे नाव आहे अष्टपैलू केदार जाधवचे. केदार जाधवने २०२० मध्ये शेवटचा वनडे खेळला. केदार जाधवही आयपीएलमध्ये न विकला गेला होता. केदार जाधवने आतापर्यंत खेळलेल्या 73 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1389 धावा केल्या आहेत.

यादरम्यान त्याने २ शतके झळकावली. गोलंदाजी करताना त्याच्या नावावर 27 विकेट्सही आहेत. केदार जाधव वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर सहज पुनरागमन करू शकेल, अशी आशा काही क्रिकेट तज्ज्ञांना होती, पण बीसीसीआय आता या खेळाडूला विसरण्याचा प्रयत्न करत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe