India Vs Pakistan : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना हा कायमच रोमांचक ठरतो. क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या प्रतिस्पर्ध्यांपैकी हे दोन संघ जेव्हा आमनेसामने येतात, तेव्हा जगभरातील करोडो क्रिकेटप्रेमी या सामन्याकडे डोळे लावून बसतात. आता पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये 23 फेब्रुवारी रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (DICS) भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत.
या सामन्याच्या पार्श्वभूमीवर दुबईमध्ये या दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड पाहिल्यास, भारताने पाकिस्तानवर पूर्ण वर्चस्व गाजवले आहे. आत्तापर्यंत दुबईमध्ये खेळलेल्या दोन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला आहे. त्यामुळे भारतीय संघाचा दुबईतील दबदबा पाहता, पाकिस्तानसमोर मोठे आव्हान असेल.

दुबईतील भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यांचा इतिहास
1. पाकिस्तानचा 162 धावांत पराभव (2018 आशिया चषक)
19 सप्टेंबर 2018 रोजी आशिया चषक स्पर्धेच्या गट साखळी सामन्यात दुबईत भारत आणि पाकिस्तान पहिल्यांदा भिडले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानचा डाव अवघ्या 162 धावांत संपुष्टात आला. बाबर आझमने 47 धावा तर शोएब मलिकने 43 धावा केल्या भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि केदार जाधव यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले जसप्रीत बुमराहने 2 बळी, तर कुलदीप यादवने 1 बळी मिळवला भारताने 29 षटकांतच 163 धावांचे लक्ष्य पार केले होते रोहित शर्मा – 52 धावा (39 चेंडूत) शिखर धवन – 46 धावा (54 चेंडूत) अंबाती रायुडू आणि दिनेश कार्तिक यांनी प्रत्येकी 31 धावा करत सहज सामना जिंकला.
2.भारताचा 9 विकेट्सनी दणदणीत विजय (2018 आशिया चषक – सुपर 4)
पहिल्या लढतीनंतर 23 सप्टेंबर 2018 रोजी भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा दुबईत भिडले. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 7 बाद 237 धावा केल्या.
शोएब मलिक – 78 धावा (90 चेंडूत) सरफराज अहमद – 44 धावा भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. भारतानं 39 षटकांत 238 धावांचे लक्ष्य सहज पार केले. रोहित शर्मा – 114 धावा (119 चेंडूत) शिखर धवन – 114 धावा (100 चेंडूत) भारताने 9 विकेट्स राखून मोठा विजय मिळवला आणि दुबईमध्ये पाकिस्तानविरुद्ध सलग दुसरा सामना जिंकला.
दुबईत कोण सरस ?
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या दोन्ही वनडे सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानला पराभूत केले आहे. त्यामुळे दुबईच्या मैदानावर भारतीय संघ मजबूत असल्याचे स्पष्ट होते.
हेड टू हेड (DICS – दुबई): भारत – 2 विजय पाकिस्तान – 0 विजय
भारत विजयाची हॅटट्रिक करणार की पाकिस्तान बदला घेणार?
आत्तापर्यंत दुबईत झालेल्या दोन्ही सामन्यांत भारताने पाकिस्तानला नमवले आहे. त्यामुळे 23 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील सामन्यात भारताला विजयाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. मात्र, पाकिस्तान संघ कधीही पुनरागमन करण्यास सक्षम असतो. त्यामुळे भारताला पाकिस्तान विरुद्ध विजयाची हॅटट्रिक पूर्ण करायची असेल, तर उत्तम फलंदाजी आणि अचूक गोलंदाजी करावी लागेल