अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2022 :- चालू आयपीएल हंगामात इशान किशन हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. 2 कोटींच्या मूळ किंमतीत लिलावात उतरलेल्या मुंबई इंडियन्सने15.25 कोटी रुपये खर्च करून पुन्हा एकदा संघात स्थान मिळवले आहे.
यासह, तो आयपीएल लिलाव 2022मधील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. ईशान किशनच्या बोलीच्या दरम्यान पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबादने मुंबईला कमालीची टक्कर दिली.

मात्र मुंबईने ठरवलेच होते की, ईशानला आपल्या संघातच स्थान द्यायचे. त्यामुळे ईशानसाठी मुंबई इंडियन्स संघाने तब्बल 15.25 कोटींची बोली लावली.
पंजाब आणि हैदराबाद संघांना नमवून मुंबईने ईशानला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. इशान किशन 2018पासून मुंबई इंडियन्सकडून खेळतोय. इशान किशन विकेटकिपिंगचे कौशल्य असलेला डावखुरा फलंदाज आहे.
मुंबई इंडियन्सने पहिल्यांदाच एखाद्या खेळाडूचा संघात समावेश करण्यासाठी लिलावात 10 कोटींहून अधिक रुपये खर्च केले आहेत.
दरम्यान, 2015 साली युवराज सिंहसाठी दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 16 कोटी रुपये मोजले होते. युवी नंतर ईशान हा सर्वाधिक महाग खेळाडू ठरला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम