India News:आशिया कपमध्ये भारताने कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला. या रोमहर्षक विजयानंतर देशभर जल्लोष झाला.
सर्वक्ष तिरंगा फडकवून आनंद साजरा केला जात होता. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा आणि बीसीसीआयचे सचिव असणाऱ्या जय शहा यांनी हातात तिरंगा घ्यायला नकार दिल्याचा एका व्हिडिओ समोर आला आहे.
त्यावरून त्यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा मोहीम राबविली असताना ही घटना समोर आली आहे.
भारताच्या विजयानंतर दुबईच्या स्टेडियममध्ये जल्लोष सुरु झाला. याच जल्लोषावेळचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सीसीआयचे सचिव जय शहा यांच्या शेजारी असणाऱ्या व्यक्तीने शहा यांच्या हातात तिरंगा देण्याचा प्रयत्न केला, मात्र जय शहा यांनी तो घ्यायला नकार दिल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
भारताने कट्टर प्रतिस्पर्ध्याविरोधात विजय मिळवला. त्याचा जल्लोष करताना तिरंगा हातात घ्यायचे टाळल्याने जय शहा यांच्यावर टीका केली जात आहे.
बीसीसीआयचा सचिव असलेल्या जय शहाने भारतीय राष्ट्रध्वज हातात घेण्यास आजच्या सामन्यात नकार दिला. आणि याचे वडील देशातील लोकांना देशभक्ती शिकवतात. अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.