दुबई : पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आयसीसी ट्वेण्टी २० विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, २००७ साली पहिले विजेतेपद पटकावणारा भारतीय संघ ब गटात असून इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि इतर दोन पात्र संघ असतील.
अ गटात पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज, न्यूझीलंड आणि दोन पात्र संघ असतील. भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिका संघाशी होईल, तर यजमान ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमधील सामन्याने विश्वचषक स्पर्धेच्या सुपर १२ फेरीला सुरुवात होईल.

ही स्पर्धा १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२० दरम्यान होईल. उपांत्य फेरीचे सामने ११ आणि १२ नोव्हेंबरला तर अंतिम सामना १५ नोव्हेंबरला मेलबर्न स्टेडियमवर खेळला जाईल.
पहिल्या फेरीत अ गटातील श्रीलंकेसह तीन पात्र संघ, तर ब गटात बांगलादेश आणि तीन पात्र संघ असतील. या फेरीचे सामने १८ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबरदरम्यान होईल.
भारतीय संघाने २००७ साली, तर पाकिस्तानने २००९ साली ट्वेण्टी २० विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. आयसीसी ट्वेण्टी २० विश्वक्रमवारीत पाकिस्तान संघ सर्वोच्च तर भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर आहे.
- शेतकऱ्यांसाठी गोड बातमी! या तारखेला मिळणार Pm किसानचा पुढील हफ्ता
- आठव्या वेतन आयोगात महागाई भत्ता मूळ पगारात जोडला जाणार का ? केंद्र सरकारने स्पष्टचं सांगितलं
- पुण्यातील ‘या’ मेट्रो मार्गाच्या आराखड्यात मोठा बदल, नवीन स्टेशनं पण ऍड केले जाणार
- राज्यात तयार होणार मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा 85 किलोमीटर लांबीचा नवा रेल्वेमार्ग !
- मोठी बातमी ! महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा, ‘या’ शहरात तयार होणार नवीन रेल्वेस्थानक













