नूर सुलतान : उपांत्यपूर्व फेरीत कोलंबियाच्या कार्लोस आर्तुरो मेंडेझचा अटीतटीच्या लढतीत ७-६ असा निसटता विजय मिळवून ज्युनियर विश्वविजेता दीपक पुनियाने विश्व कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या ८६ किलो गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
या विजयासह दीपक पुनियाने पुढील वर्षी टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमधील आपले स्थानही निश्चित केले. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा दीपक पुनिया हा चौथा भारतीय कुस्तीपटू आहे. याआधी विनेश फोगट, रवी दहिया आणि बजरंग पुनिया ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत.

सीनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धेत प्रथमच सहभागी झालेल्या दीपक पुनिया लढत संपायला एक मिनीट शिल्लक असताना ३-६ अशा पिछाडीवर होता. त्या वेळी तेथे उपस्थित असणाऱ्या त्याच्या सहकाऱ्यांना दीपकचे आव्हान संपुष्टात येईल, असेच वाटले.
पण कोणतेही दडपण न घेता दीपक पुनियाने आपले डावपेच आणि ताकद पणाला लावत कोलंबियाच्या मल्लावर बाजी उलटवली आणि विजय मिळवला.
- Apollo Tyres Share Price: अपोलो टायर्स गुंतवणूकदारांना करणार मालामाल? सध्याची ट्रेडिंग पोझिशन काय? रेटिंग अपडेट
- ONGC Share Price: तज्ञ म्हणतात ONGC चा शेअर खरेदी करा! मात्र 1 वर्षात झाली 20.28% घसरण…बघा आजची किंमत
- CDSL Share Price: मल्टीबॅगर स्टॉकमध्ये आज मोठ्या कमाईची संधी! नोट करा तज्ञांची टार्गेट प्राईस
- Vedanta Share Price: वेदांता शेअर आज बुलीश…मोठ्या प्रमाणावर खरेदी! तज्ञ म्हणतात की…
- IFCI Share Price: IFCI शेअर्समध्ये मागच्या आठवड्यापासून तेजी! दिला 5.82% रिटर्न… आज मात्र?