Team India: बाबो .. टीम इंडियाच्या या दोन खेळाडूंमध्ये सुरु झालं ‘वॉर’ ! आता ‘त्या’ प्रकरणात आयसीसी घेणार अंतिम निर्णय

Ahmednagarlive24 office
Published:

Team India:  मागच्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच (ICC) ने एक नवीन उपक्रम सुरु केला आहे. यानुसार ICC ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी  प्रत्येक महिन्यात एका खेळाडूची निवड करते. आम्ही तुम्हाला सांगतो यावेळी जानेवारी महिन्यासाठी ‘प्लेअर ऑफ द मंथ’ या पुरस्कारासाठी ICC ने तीन पुरुष खेळाडूंपैकी 2 भारतीय क्रिकेटपटूंची निवड केली आहे.

यामुळे या पुरस्कारासाठी टीम इंडियाच्या दोन खेळाडूंमध्ये जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळत असून सोशल मीडियावर देखील अनेक चर्चांना उधाण आले आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या ICC लवकरच प्लेअर ऑफ द मंथचा पुरस्कार जाहीर करणार आहे.

टीम इंडियाच्या या दोन खेळाडूंमध्ये स्पर्धा

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि सलामीवीर शुभमन गिल यांची ICC पुरूष खेळाडूच्या मंथ पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले आहे. न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवे हा देखील या पुरस्काराच्या शर्यतीतील तिसरा खेळाडू आहे, ज्याने या वर्षी आतापर्यंत वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये तीन शतके आणि दोन अर्धशतके झळकावली आहेत.

शुभमन गिल सर्वात मोठा दावेदार

शुभमन गिलने गेल्या महिन्यात पांढऱ्या चेंडूच्या दोन्ही फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी केली तर जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत सिराजने नवीन चेंडूसह एकदिवसीय सामन्यांमध्ये चांगली गोलंदाजी केली. गिलने मुंबईत श्रीलंकेविरुद्ध पहिला T20 खेळला, ज्यात तो फक्त सात धावा करू शकला, पण तिसऱ्या सामन्यात त्याने 46 धावा केल्या. यानंतर तीन एकदिवसीय सामन्यात 70, 21 आणि 116 धावा केल्या. हैदराबादमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने 149 चेंडूत 208 धावा केल्या, तर दुसऱ्या टोकाकडून कोणताही फलंदाज 28 धावा पार करू शकला नाही.

वनडेमध्ये दुहेरी शतक झळकावणारा सर्वात तरुण क्रिकेटपटू 

एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा शुभमन गिल हा सर्वात तरुण क्रिकेटपटू आहे. यानंतर पुढील दोन डावात 40 आणि नाबाद 112 धावा केल्या. यामुळे त्याने या मालिकेत एकूण 360 धावा केल्या आहे आणि तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या सर्वोच्च धावसंख्येच्या विक्रमाशी बरोबरी केली.

दुसरीकडे, सिराजने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात सात षटकांत 30 धावा देत दोन बळी घेतले. यानंतर त्याने पुढील दोन सामन्यांत अनुक्रमे तीन आणि चार विकेट घेतल्या. हैदराबादमध्ये न्यूझीलंडविरुद्ध त्याने चार बळी घेतले आणि दुसऱ्या सामन्यात सहा षटकांत केवळ दहा धावा देऊन एक बळी घेतला.

हे पण वाचा :- Best SUV In India : टाटा पंचला विसरा ! स्वस्तात घरी आणा ‘ही’ मोठी आणि दमदार एसयूव्ही ; मिळणार ‘इतके’ भन्नाट फीचर्स 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe