WTC Final 2023: भारतीय संघाला मोठा धक्का, ‘हा’ स्टार खेळाडू टेस्ट चॅम्पियनशिपमधून बाहेर

Ahmednagarlive24 office
Published:

WTC Final 2023:  सध्या भारतीय क्रिकेट संघांचे स्टार खेळाडू IPL 2023 मध्ये व्यस्त आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या भारतीय संघाला IPL 2023 नंतर ICC World Test Championship चा अंतिम सामना खेळणार आहे. मात्र WTC Final 2023 च्या फायनलपूर्वी भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार भारतीय संघाचा स्टार खेळाडू केएल राहुल या फायनलमधून बाहेर पडला आहे. त्यांनी स्वतः सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या केएल राहुल आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघाचे नेतृत्व करत होता. स्पर्धेदरम्यानच लखनऊने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध सामना खेळला. या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना राहुलला दुखापत झाली होती. यानंतर तो आयपीएलच्या चालू हंगामातून बाहेर पडला. आता डब्ल्यूटीसी फायनलमध्येही तो खेळू शकणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.

लखनौ संघाला बाहेरून सपोर्ट

केएल राहुलने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात लिहिले आहे की, दुखापतीनंतर वैद्यकीय पथकाने त्याच्यावर थाई शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळेच तो काही आठवडे क्रिकेटपासून दूर राहणार आहे. त्याचे पूर्ण लक्ष  पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतर टीम इंडियात पुनरागमन करण्यावर असेल.

राहुलने आयपीएल मध्येच सोडल्याबद्दल दु:ख व्यक्त केले. तो म्हणाला की, या कठीण काळात संघ सोडणे दु:खदायक आहे, परंतु त्याला आपल्या सहकारी खेळाडूंवर पूर्ण विश्वास आहे की तो मजबूत खेळ दाखवेल. राहुलने सांगितले की, तो बाहेरून लखनऊ संघाचा सपोर्ट करताना दिसणार आहे.

WTC फायनलसाठी टीम इंडियाचा संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

हे पण वाचा :- PAN Card Rules :  पॅन कार्डधारकांनो ‘हे’ काम तात्काळ पूर्ण करा, नाहीत 6 महिने तुरुंगात जावे लागणार

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe