Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये नाकाबंदी, वाहनांची तपासणी ! दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा अलर्ट

जम्मू – काश्मीर मधील पहलगाम मध्ये २२ एप्रिलला दुपारी पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २८ जण मृत्युमुखी पडले. त्यात महाराष्ट्रातील ६ जणांचा समावेश असून या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलिस यंत्रणा अलर्ट झाली आहे. नगर शहरातही पोलिस यंत्रणेने दक्षता घेत शहरातून जाणाऱ्या महामार्गांवर चौकाचौकात सायंकाळी अचानक नाकाबंदी करत वाहनांची तपासणी मोहीम राबविली. कोतवाली पोलिसांनी इम्पेरियल … Read more

मोठी बातमी ! चौंडी मंत्रिमंडळ बैठकीच्या निविदा जाहिरातीतील गोंधळावर सार्वजनिक बांधकाम विभागाचा खुलासा

Ahilyanagar News : चौंडी येथे प्रस्तावित मंत्रिमंडळ बैठकीसाठी 150 कोटी रुपयांच्या निविदा मागवल्यासंदर्भात ‘लोकमत’ वृत्तपत्रात प्रकाशित झालेली जाहिरात चुकीची असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे. या जाहिरातीमुळे निर्माण झालेल्या गैरसमजुतींना पूर्णविराम देत विभागाने याबाबत सविस्तर खुलासा केला आहे. View this post on Instagram काय आहे प्रकरण? सार्वजनिक बांधकाम विभागाने 21 एप्रिल 2025 रोजी चौंडी … Read more

Ahilyanagar News : विद्यार्थ्यांच्या खाद्यांवरील दप्तराचे ओझे पुन्हा वाढणार, प्रत्येक विषयाचे स्वतंत्र पुस्तके देण्याचा निर्णय

Ahilyanagar News : शालेय विद्यार्थ्यांचे दप्तर हलके करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून एकाच पुस्तकात सर्व विषय समाविष्ट करण्याचा प्रयोग सुरू होता. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत फक्त एकच पुस्तक न्यावे लागत होते. मात्र, आता अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र पुस्तके देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन पुन्हा वाढणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षासाठी ही … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरकरांनो सावध व्हा ! दुष्काळाची चाहूल… तब्बल 643 गावं आणि 2415 वाड्यांमध्ये पाणी टंचाई

एप्रिल महिन्याची तीव्र उष्णता आता चांगलीच जाणवू लागली असून अकोले, शेवगाव आणि कर्जत तालुक्यांतील अनेक गावांवर पाणीटंचाईचे सावट पसरले आहे. परिणामी, या भागांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. सध्याच्या घडीला जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील 69 गावं आणि 362 वाड्यांमध्ये टंचाईची परिस्थिती उद्भवली आहे. एकूण 1 लाख 38 हजार नागरिकांसाठी 69 टँकर कार्यरत आहेत, त्यापैकी सर्वाधिक … Read more

Ahilyanagar : पारनेर तालुका ठरतोय सत्ता – कुस्त्यांचा हॉटस्पॉट ! सुजय विखे म्हणाले…

Ahilyanagar News : पारनेर तालुका केवळ ग्रामीण कुस्ती परंपरेसाठीच नव्हे, तर आता राजकीय कुस्त्यांसाठीही चर्चेचा विषय ठरतो आहे. नुकत्याच पार पडलेल्या गोरेगाव येथील अंबिका माता यात्रेच्या कुस्ती महोत्सवात हे प्रकर्षाने दिसून आलं. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी यावेळी उपस्थित राहून स्पष्ट केलं की, त्यांच्या कुटुंबाचा आणि पारनेर तालुक्याचा संबंध हा परस्पर प्रेमाचा आहे. … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात होणार्या ‘त्या’ मंत्रिमंडळ बैठकीतून जिल्ह्याच्या अनेक प्रश्नांवर तोडगा निघणार

Ahilyanagar News : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी, चौंडी (ता. जामखेड) येथे राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक लवकरच पार पडणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. या विशेष मंत्रिमंडळ बैठकीत अहिल्यादेवी होळकर सृष्टी, संत ज्ञानेश्वर सृष्टी, भुईकोट किल्ल्याचे राज्य सरकारकडे हस्तांतरण आणि संवर्धन, तसेच श्रीगोंद्याच्या पेडगाव किल्ल्यावर … Read more

अतिक्रमणमुक्त आणि हरित श्रीरामपूर शहरासाठी कटिबद्ध – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी, दि.२१ – येत्या काळात श्रीरामपूर शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी, शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी उपाययोजना करण्यासोबत शहर हरित करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. श्रीरामपूर येथे तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठा, जलजीवन मिशन व महावितरण विभागांच्या कामकाजाचा आढावा बैठकीत श्री. विखे पाटील बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, महाराष्ट्र जीवन … Read more

Ahilyanagar News : छत्रपती शिवरायांच्या ‘आग्रा’ मोहिमेपासून तर आग्र्यावरून सुटकेपर्यंत अहिल्यानगरमधील नेवाशाची होती महत्वपूर्ण भूमिका

नेवासे तालुक्यातील खेडले परमानंद गाव हरिश्चंद्रगडावरून उगम पावलेल्या मुळा नदीच्या काठावर वसलेले. या ठिकाणी असणाऱ्या शिवभारत ग्रंथाचे लेखक कवी परमानंद यांच्या ऐतिहासिक मठास पानिपत ग्रंथाचे लेखक विश्वास पाटील यांनी भेट दिली. त्यानंतर या ठिकाणचे महत्व आणखी अधोरेखित झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीच्या अगोदर उत्तर भारतातील स्थितीचा अभ्यास करण्यासाठी परमानंद यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी अगोदरच … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरच्या सुपुत्राची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अंडर १४ संघात निवड

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अंडर १४, १६, १९ वयोगटातील मुलांची सध्या संघनिवड सुरू आहे. चौदा वर्षाखालील मुलांची संघनिवड मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एसएससीए कल्याण ग्राउंड वर गेले चार दिवस ट्रायल घेऊन करण्यात आली. संघात मूळचा राहाता तालुक्यातील खडकेवाके येथील रहिवासी असलेले सध्या डोंबिवली येथे स्थायिक असलेल्या शार्दूल अनिल मुरादे याची निवड करण्यात आली. शार्दूल हा अष्टपैलू खेळाडू … Read more

अहिल्यानगरमधील पाण्याचा प्रश्न आता कायमचा मिटणार! गोदावरी खोऱ्यात चार नदीजोड प्रकल्प राबवले जाणार, राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

अहिल्यानगर- जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी पावलं उचलली आहेत. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून समुद्रात वाहून जाणारं पाणी तुटीच्या खोर्‍यात वळवण्यासाठी गोदावरी खोर्‍यात चार नदीजोड प्रकल्प राबवले जाणार आहेत, अशी माहिती जलसंपदा व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणात्मक निर्णयामुळे हे प्रकल्प गतीमान होणार असून, यामुळे पाणीटंचाईवर मात … Read more

गुड न्यूज ! अहिल्यानगरला मिळणार नवा रेल्वे मार्ग, ‘या’ शहरांमधून जाणार नवा Railway मार्ग, सरकारने दिली मंजुरी, कसा असेल रूट ? पहा…

Nagar Railway News

Nagar Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या दोन्ही विभागातील रोल प्रवाशांसाठी अधिक महत्त्वाची राहणार आहे. कारण की सरकारकडून राज्यात एक नवा रेल्वे मार्ग तयार केला जाणार असून या नव्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. हा नवा रेल्वे मार्ग मराठवाडा … Read more

पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू आणि प्रशिक्षकांचा सन्मान विजेत्या खेळाडूंमुळे जिल्ह्याचा नावलौकिक उंचावला

अहिल्यानगर दि.१९- विविध क्रीडा प्रकारात आपले नैपुण्य दाखून शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित झालेल्या खेळाडूमुळे क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचा नावलौकीक अधिकच उंचावला असल्याचे गौरवोद्गार जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले. जिल्हाधिकारी कार्यालयात शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू आणि प्रशिक्षकांचा सन्मान पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार काशिनाथ दाते, अमोल खताळ, विक्रम … Read more

अहिल्यानगर भाजपमध्ये जिल्हाध्यक्षपदासाठी चुरस, भाजप या तरूण चेहऱ्याला देणार संधी? माजी मंत्री रावल यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती

अहिल्यानगर- जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षात (भाजप) सध्या नेतृत्वाच्या निवडीसाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. महानगर अध्यक्षासह उत्तर आणि दक्षिण जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीसाठी माजी मंत्री जयकुमार रावल यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. या तिन्ही पदांसाठी पक्षात तीव्र रस्सीखेच पाहायला मिळत असून, येत्या २५ एप्रिलपर्यंत निवडी पूर्ण होण्याची शक्यता आहे. तालुका आणि मंडल अध्यक्षांच्या नियुक्त्या, तरुण नेतृत्वाला संधी … Read more

सरकार छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल संवेदनशील ; माजी मंत्री तनपुरे यांचे आत्मक्लेश आंदोलन

अहिल्यानगर : राहुरी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना होऊन २० दिवसांचा कालावधी उलटून गेला, तरी अद्याप आरोपींचा तपास लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. राहुरी पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तत्काळ आणि सखोल तपास करणे अपेक्षित होते. पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपींना त्वरित अटक करावी, या मागणीसाठी चार दिवसांपूर्वी पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. … Read more

‘या’ देवीच्या यात्रेत लाखोंची गर्दी : ‘गाडीवान’ देवाला नवसपूर्तीसाठी भाविकांनी दिला दोन हजार बोकडांचा बळी!

अहिल्यानगर : साध्य राज्यभरात विविध गावातील देवी देवतांच्या यात्रा महोत्सव सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर उभ्या महाराष्ट्रातील आदिवासी भिल्ल समाजाची प्रती पंढरी समजल्या जाणाऱ्या अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथील येडूआई देवीच्या वार्षिक यात्रेला यंदा विक्रमी गर्दी झाली. तीन ते चार लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले, तर गडाच्या पायथ्याशी असलेल्या ‘गाडीवान’ देवाला नवसपूर्तीसाठी सुमारे दोन हजार बोकडांचा बळी … Read more

गाव पुढाऱ्यांनो लागा कामाला : जिल्ह्यातील १ हजार २२३ सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर ; ६२५ महिला पाहणार गावचा कारभार!

अहिल्यानगर : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी जिल्ह्यातील १२२३ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षण संख्या प्रवर्गानिहाय अधिसूचित केली आहे.या अधिसूचित केलेल्या संख्येनुसार सरपंच पद आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी आशिया यांनी जाहीर केला आहे. दि.२३ एप्रिल २०२५ रोजी जिल्ह्यातील १४ ही तालुक्यातील सरपंच पद प्रवर्गनिहाय आरक्षणाची सोडत होणार आहे.यासाठी संबंधित तहसीलदार यांना प्राधिकृत करण्यात … Read more

ह्या कारणामुळे झालं माझं वाटोळे ! सुजय विखे पाटलांनी श्रीगोंद्यात संगळंच सांगितलं…

साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी पाणी राखीव ठेवण्यात आलं आहे, पण घोडच्या पाण्याला हात लावलेला नाही. या योजनेचा ४९५ कोटींचा प्रस्ताव राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडे पाठवण्यात आला असून, महिन्याभरात मान्यता मिळण्याची शक्यता आहे. येत्या तीन महिन्यांत निविदा प्रक्रिया पूर्ण करून भूमिपूजन करण्याची जबाबदारी माझी आहे, अशी हमी श्रीगोंदेकराना माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. कर्जत, … Read more

खडतर परिस्थितीवर मात करत अहिल्यानगरच्या कन्येची गगनभरारी, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारावर कोरले नाव

अहिल्यानगर- सारोळा कासार गावची कन्या संयुक्ता प्रसेन काळे हिने रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये घवघवीत यश मिळवत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. तिच्या या अप्रतिम कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र शासनाने २०२३-२४ साठी तिला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर केला आहे. तीन लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असा हा प्रतिष्ठित पुरस्कार आहे, जो राज्यातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान मानला … Read more