महेंद्रसिंग धोनी पुन्हा कर्णधार ! ऋतुराज IPL 2025 मधून बाहेर, आता CSK चं नशीब बदलणार ?

ऋतुराज गायकवाडच्या दुखापतीमुळे CSK ला मोठा धक्का बसला असला, तरी धोनीचं कर्णधार म्हणून पुनरागमन ही चाहत्यांसाठी आनंदाची आणि आशादायक बाब आहे. आयपीएल 2025 च्या उर्वरित हंगामात धोनीचं नेतृत्व आणि त्याची जादू पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. CSK ची पुनरागमनाची कहाणी कशी असेल, हे येणारा काळच ठरवेल, पण सध्या तरी धोनीच्या चाहत्यांसाठी हा उत्साहाचा क्षण आहे. … Read more

धर्मवीरगडावर नीलेश लंके प्रतिष्ठान स्वच्छता करणार रविवार दि. १३ एप्रिल रोजी मोहीम राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा सहभाग

अहिल्यानगर : एक दिवस शिवरायांच्या गड, किल्ले आणि दुर्गांसाठी या खा. नीलेश लंके यांच्या संकल्पनेतील मोहीमेअंतर्गत या महिन्यात १३ एप्रिल रोजी श्रीगोंदे तालुक्यातील पेडगांव येथील धर्मवीर गडावर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सहभागी होणार असल्याचे खा. नीलेश लंके यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांनी घडविलेल्या गड किल्ल्यांचे संवर्धन … Read more

संसदेतील आनंदॠषीजी हॉस्पिटलचा उल्लेख अभिमानास्पद ! जैन समाजबांधवांकडून खा. नीलेश लंके यांच्याप्रती कृतज्ञता

अहिल्यानगर : वक्फ बोर्डाच्या विधेयकावर चर्चा करताना खासदार नीलेश लंके यांनी संसदेमध्ये आनंदॠषी हॉस्पिटलमध्ये गोर-गरीब रूग्णांवर उपचार होत असल्याचे सांगत रूग्णालयाचा देशाच्या संसदेत गौरव केल्याबद्दल जैन बांधवांनी खा.लंके यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. महावीर जयंती निमित्त खा. नीलेश लंके यांनी अहिल्यानगरमधील आनंदधामला सदिच्छा भेट देत जैन बांधवांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जैन बांधवांनी आनंदॠषीजी हॉस्प्टिलच्या … Read more

जिल्हा रूग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज द्या खासदार नीलेश लंके यांचे जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र

अहिल्यानगर : जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या चार भिक्षेकऱ्यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचे सांगत खासदार नीलेश लंके यांनी रूग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तसेच उपचार केलेल्या आयपीडी पेपरची मागणी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. भिक्षेकरूंच्या मृत्यूनंतर खा.नीलेश लंके यांनी जिल्हा रूग्णालयात जात रूग्णालय प्रशासनाची झाडाझडती घेत संताप व्यक्त केला होता. जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या … Read more

रस्त्याच्या कामात अडथळा ठरणारी अतिक्रमणे महानगरपालिकेने हटवली महापालिकेचे रस्ते, मोकळ्या जागेतील अतिक्रमणे काढून घ्या

अहिल्यानगर शहरातील विकास योजनेत मंजूर असलेल्या रस्त्यांची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. काही ठिकाणी रस्त्याच्या कामात अतिक्रमणांचा अडथळा निर्माण झाला आहे. हसन शहा कब्रस्तान ते कोठी चौक व फरत हॉटेल ते कानडे मळा (जुना सोलापूर रोड) या दोन डीपी रस्त्याला जोडणाऱ्या लिंक रोडच्या कामात अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा … Read more

चोरट्यांच्या आयडियाची कमाल: भिंतीला शिडी लावून आत घुसले अन देवाचे दागिने अन दानपेटी घेऊन ठोकली धूम..!

अहिल्यानगर : सध्या चोरटे देवळातील देवाला देखील सोडत नसल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे अवघ्या जगाचा पालनकर्ता देखील सुरक्षित नसल्याने इतरांचे काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. शहरातील महाजन गल्ली येथील १००८ महावीर स्वामी दिगंबर जैन मंदिरामध्ये ९ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास मंदिराच्या पाठीमागील बाजूने शिडीच्या सहाय्याने वर चढून चोट्याने मंदिराच्या पाठीमागील दरवाज्याची कडी कोयंडा … Read more

जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी घरात घुसला इथेनॉलचा टँकर: घराला धडक देताच टँकरने घेताच झाला मोठा स्फोट

अहिल्यानगर : इथेनॉलची वाहतूक करणाऱ्या भरधाव वेगात असलेल्या टँकरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा टँकर एका घरावर जाऊन धडकला. घराला धडक बसताच या टॅंंकरने पेट घेतला. या आगीत टँकरचे व घराचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना कर्जत तालुक्यातील कर्जत – राशीन रस्त्याजवळ कानगुडवाडी फाट्याजवळ घडली. या घटनेत नारायण साळवे यांच्या घराची पडझड झाली आहे. दरम्यान, … Read more

अहिल्यानगर शहरातील अद्ययावत ग्रंथालयाच्या इमारतीचे काम सुरू ग्रंथालयासह अँपी थिएटर, विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण केंद्राची सुविधा उपलब्ध होणार

अहिल्यानगर – सावेडी उपनगर परिसरात प्रस्तावित असलेल्या ग्रंथालयाच्या इमारतीचे काम सुरू झाले आहे. या ग्रंथालयासाठी पालकमंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन मंडळामार्फत निधी उपलब्ध झाला आहे. सद्यस्थितीत प्लिंथ लेव्हलपर्यंत काम पूर्ण झाले आहे. येत्या दीड वर्षात काम पूर्ण होऊन ग्रंथालय कार्यान्वित होणार असल्याची आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी … Read more

टंचाई निवारण विभागाच्या कर्मचाऱ्यांनाच बसतोय पाणीटंचाईचा फटका …! कर्मचाऱ्यांसह नागरिकांना पिण्यासाठी मिळत नाही पाणी

अहिल्यानगर : सध्या उन्हाच्या झळा प्रचंड तीव्र झाल्या आहेत त्यामुळे माणसांसह प्राणी, पशु पक्षी देखील पाण्यासाठी व्याकुळ झाले आहेत. उन्हाळ्यात ग्रामीण भागातील नागरिकांना पाणी टंचाई निर्माण झाली असल्यास त्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्ह्यासह तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयात टंचाई शाखा कार्यान्वित करण्यात आलेली आहे .त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना थेट जिल्ह्याच्या ठिकाणी येण्याची गरज भासत नाही. शेवगाव … Read more

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांना केला आहे ‘हा’ लोकोपयोगी संकल्प

अहिल्यानगर : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना पर्याय नाही.या दृष्टीनेच जलयुक्त आणि गाळमुक्त-तलाव गाळयुक्त शिवार या महत्त्वाकांक्षी योजनांची अंमलबजावणी होत आहे.जलयुक्त टप्पा दोनची कामे पूर्णत्वाला जात असताना जिल्ह्यातील गाळमुक्त तलाव योजनेतील कामे देखील निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी निर्देश दिले आहेत.जिल्हा पाणीदार होण्यासाठी जलसंधारणाच्या कामी लोकसहभागाचे एकजुटीचे पाठबळ मिळावे,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी केले आहे. … Read more

श्रीरामनवमीच्या मिरवणुकीत डीजेचा दणदणाट करणे भोवले ४ मंडळांच्या अध्यक्षांसह डीजे मालकांवर गुन्हे दाखल

अहिल्यानगर : नुकतीच शहरात रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी श्रीराम नवमी मिरवणुकीत मोठ्या आवाजात डीजे सिस्टीम लावून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या दोन मंडळांचे अध्यक्ष व डीजे मालकांवर कोतवाली पोलिसांनी तर दोन मंडळांच्या अध्यक्ष व डीजे मालकांवर तोफखाना पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. श्रीराम नवमी जयंती मंडळांनी डीजेचा आवाज मर्यादित ठेवावा, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन करून … Read more

Ahilyanagar Politics : अहिल्यानगरमध्ये राजकीय भूकंप ! रात्री सभापती राम शिंदेंची गोपनीय बैठक, सकाळी आ.रोहित पवारांच्या अस्तित्वालाच मोठा धक्का

आ. प्रा. राम शिंदे हे विधानपरिषदेवर सभापती झाले आणि त्यांनी राजकीय ताकद वाढली. त्यानंतर त्यांनी आता राजकीय अस्तित्व प्रबळ करण्यास सुरवात केली आहे. त्यांनी आ. रोहित पवार यांच्या अस्तित्वालाच आता धक्के देण्यास सुरवात केलीये. कर्जतमधील राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसच्या नगरसेवकांना सोबत घेण्यात अखेर विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांना यश आले आहे. तेरा … Read more

Ahilyanagar News : अभिमानास्पद ! शाळेतील गुरुजींच काम भारी, पालकांनी भेट दिली सव्वा लाखांची पल्सर गाडी

Ahilyanagar News : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सौंदाळा ही शाळा नाविन्यपूर्ण उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या यशामुळे नेहमीच चर्चेत असते. या शाळेतील इयत्ता पाचवीच्या वर्गशिक्षक रवींद्र पागिरे यांनी आपल्या समर्पित आणि मेहनती कार्याने विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयासारख्या प्रतिष्ठित संस्थेत स्थान मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा तब्बल पाच विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे, तर … Read more

मालमत्ताधारकांनी एप्रिल महिन्यात कर भरून संकलित करावरील १० टक्के सवलतीचा लाभ घ्यावा

अहिल्यानगर – नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे मागील आर्थिक वर्षात महानगरपालिकेने विक्रमी कर वसुली केली आहे. आता नवीन वर्षात १०० कोटी वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून कर भरणा सुरू झाला आहे. सावेडी प्रभाग समिती कार्यालयात आगाऊ कर भरणाऱ्या पाच नागरिकांचा सत्कार करण्यात आला आहे. मालमत्ताधारकांनी नियमित कराचा भरणा करावा व एप्रिल महिन्यात देण्यात येणाऱ्या संकलित करावरील १० … Read more

Ahilyanagar Breaking : अहिल्यानगर जिल्ह्यातील ह्या गावात हनुमान मूर्तीची विटंबना, मूर्तीवर हिरवा गुलाल ? संतप्त नागरिक रस्त्यावर

अहिल्यानगर : अहिल्यानगर तालुक्यातील सारोळा बद्दी येथील अचानकवाडी भागातील हनुमान मंदिरातील मूर्तीची विटंबना करण्यात आली. ही घटना काल (दि.७ एप्रिल) दुपारनंतर उघडकीस आली. त्यानंतर गावात तणाव निर्माण झाला होता. तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर वातावरण शांत झाले. दरम्यान त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले. अधिक माहिती अशी : सारोळा बद्दी येथील … Read more

नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक गडचिरोलीच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार

अहिल्यानगर – माता मृत्यू व नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी महानगरपालिका उपाययोजना करत आहे. गडचिरोली येथे नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण घटवण्यासाठी डॉ. अभय बंग यांनी निर्माण प्रकल्प राबवून प्रभावी उपाययोजना केल्या आहेत. त्यांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती घेऊन, अहिल्यानगर शहरातही अधिक प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक दर तीन महिन्यांनी गडचिरोली येथील अभ्यास दौर्यावर जाईल, … Read more

दहावीचा निकाल यंदा लवकर लागणार पालकांसाठी महत्त्वाची बातमी

महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दहावीच्या (SSC) परीक्षा २०२५ चा निकाल यंदा नेहमीपेक्षा लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदाच्या परीक्षा लवकर आयोजित केल्या आणि आता निकालही जलदगतीने जाहीर करण्याच्या तयारीत आहे. ही बातमी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची आहे, कारण निकाल लवकर लागल्याने त्यांना … Read more

रामनवमी निमित्त साईबाबांच्या शिर्डीत तब्बल १००पेक्षा अधिक पालख्या झाल्यात दाखल : ‘हे’ आहे शिर्डीच्या रामनवमीचे खास वैशिष्ट्य

अहिल्यानगर: श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या शिर्डीत श्री साईबाबांच्या हयातीपासून सुरू झालेल्या तीन दिवसीय श्री रामनवमी उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. उत्सवाच्या पहिल्याच दिवशी राज्यभरातून ५० हजारांहून अधिक पदयात्री आणि शंभराहून अधिक पालख्या शिर्डीत दाखल झाल्या. ”तुला खांद्यावर घेईन, पालखीत मिरवीन” या भक्तिभावपूर्ण साई पालखी भजनाने आणि फटाक्यांच्या आतषबाजीने पालख्यांचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आले. … Read more