मुख्यमंत्री काही जिल्ह्यांमधील निर्बंध शिथील करण्याची शक्यता…

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :-राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत १ जूननंतर टाळेबंदी निर्बंध सरसकट उठविण्याबाबत चर्चा झाली. मात्र अजूनही २१ जिल्ह्यात रूग्ण सापडण्याचे प्रमाण १० टक्क्यापेक्षा कमी झाले नसल्याने तूर्तास याबाबत निर्णय घेण्यात आला नसल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. याबाबत येत्या दोन दिवसांत टास्क फोर्सच्या सदस्यांशी चर्चा करून मुख्यमंत्री उद्धव … Read more

राज्यात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता ! आता मुख्यमंत्रीच म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :-  राज्यात लॉकडाऊन केल्यानंतर रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे दिसले आहे दररोज 70 हजारांनी वाढणार संख्या आता 30 हजारांवर गेली आहे. यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी तर झालाच आहे. पण दिलासा देखील मिळाला आहे. पण धोका अजून टळलेला नाही. लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्येत घट झाली आहे. त्यामुळे 1 जूननंतर पुन्हा … Read more

तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनापासून कसं रोखायचं ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा धोका असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर लहान मुलं आणि बालकांमधील कोविड संसर्ग रोखण्यासाठी बाल रोगविषयक टास्क फोर्सची स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान या बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सचे राज्यातील बालरोग तज्ञांना मार्गदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील डॉक्टर्सशी … Read more

जिल्हाधिकाऱ्यांनी थेट पंतप्रधान मोदींसमोर मुख्यमंत्री ठाकरेंचे कौतुक केले आणि नंतर….

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल ११ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या राज्यातील ६० जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून संवाद साधला. महाराष्ट्रातून बोलण्याची संधी मिळालेले अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांनी घेतलेल्या विविध निर्णयांमुळे करोनाशी लढा देण्यात यश येत … Read more

‘दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात दोन ते तीन दिवसांत निर्णय’ ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- सिंधुदूर्गमध्ये ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मुंबई उच्च न्यायालयाने दहावीची परीक्षा रद्द केल्याप्रकरणी ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले आहेत. परीक्षा रद्द करून सरकारने शिक्षणाची थट्टा चालवली आहे अशा शब्दात उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे. दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णयच का रद्द करू नये, असा प्रश्न न्यायालयाने सरकारला विचारला. यावर बोलताना … Read more

राज्यातील लॉकडाऊन वाढणार ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- राज्यात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा आता सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. राज्यात रुग्णसंख्या आटोक्यात येत असली तरी काळ्या बुरशीचं संकट, लसींचा तुटवडा आणि तिसऱ्या लाटेला सामोरं जाण्यासाठी लागणारी तयारी यामुळे लॉकडाउन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनसंबंधी महत्वाचं विधान केलं आहे. ते रत्नागिरीत … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संकटग्रस्तांचे अश्रू पुसतात अर्थात स्क्रीनवरून…

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- देवेंद्र फडणवीस व प्रविण दरेकर बुधवारी कोकणात प्रत्यक्ष दाखल होत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र संकटग्रस्तांचे अश्रू पुसतात! ‘अर्थात स्क्रीनवरून, असे उपहासात्मक ट्विट करून भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. अरबी समुद्रातून गेलेल्या तौते चक्रीवादळाने कोकणाला तडाखा दिला. किनारपट्टी आणि खाडी किनाऱ्यावरील अनेक गावांना … Read more

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अहमदनगर जिल्ह्याने राबविलेल्या उपाययोजनांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दखल

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- कोरोना प्रतिबंधासाठी अहमदनगर जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. पंतप्रधान मोदी यांनी आज देशातील निवडक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्याशी दूरदृश्यप्रणालीद्वारे थेट संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी, जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, केंद्र आणि राज्य शासनाच्या आदेशाची यशस्वी अंमलबजावणी, माझे कुटुंब … Read more

मोठा निर्णय ! पदोन्नतीतील आरक्षणबाबत झाला हा महत्वाचा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- मागासवर्गीयांच्या पद्दोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. प दोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयामुळे बराच वाद झाला होता. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय स्थगित करण्यात आला. सरकारी सेवेत नोकरीला लागताना आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांना पदोन्नतीत लाभ घेता येणार नाही, … Read more

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाद्वारे साई संस्थानने साईबाबांची माणूसकीची शिकवण जपली – मुख्यमंत्री ठाकरे

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :-  कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासन करीत असलेल्या प्रयत्नांना श्री साईबाबा विश्वस्त संस्थानच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आणि आरटीपीसीआर प्रयोगशाळेमुळे बळकटी येणार आहे. श्री साईबाबांनी दिलेली मानवतेची आणि गोरगरीबांना अडचणीच्या काळात मदतीची शिकवण संस्थानने हा प्रकल्प उभारुन जपली असल्याचे कौतुकोद्गार मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काढले. तसेच, सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजनसाठी … Read more

टास्क फोर्सचा राज्यातील सर्व डॉक्टर्ससमवेत रविवारी संवाद, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील करणार मार्गदर्शन !

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :-कोरोनाविरुद्धचा लढा अधिक तीव्र करतांना सर्वात महत्वाचा घटक असलेल्या डॉक्टर्सना यात अधिकाधिक सहभागी करून घेण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी मुंबईतील सुमारे एक हजार डॉक्टर्सशी संवाद साधला होता. उद्या रविवार १६ मे रोजी दुपारी १२ वाजता राज्यातील वैद्यकीय चिकित्सकांसाठी सोशल मिडीयावर एका विशेष कार्यक्रमाचे … Read more

पत्रकार व शिक्षकांना फ्रन्टलाइन वर्कर्सचा दर्जा द्या! ‘या’ संघटनेची मुख्यमंत्र्यांना मागणी

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 : – कोरोना महामारीत जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणारे पत्रकार व शिक्षकांना फ्रन्टलाइन वर्कर्सचा दर्जा द्यावा. त्यांना विमा संरक्षण, लसीकरण व अन्य वैद्यकीय सुविधा देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अध्यक्ष उल्हास वडोदकर, कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिले असल्याची … Read more

महाराष्ट्राच्या कोरोनाविरोधात लढाईविषयी पंतप्रधानानी केले कौतुक

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :-कोरोनाविरुद्ध लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दूरध्वनीद्वारे माहिती घेतली तसेच दुसऱ्या लाटेशी मुकाबला करताना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे असे सांगितले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील विशेषत: महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक बळ मिळावे अशी विनंती केली व विविध उपाययोजनांची … Read more

खुर्ची कशाला उबवताय मुख्यमंत्री महोदय? तोंड काळे करा…

अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :- प्रत्येक गोष्ट पंतप्रधान मोदींवर ढकलायची असेल तर तुम्ही घरी बसून खुर्ची कशाला उबवताय मुख्यमंत्री महोदय? तोंड काळे करा आणि बसा घरी निवांत, कडी लावून, अशी टीका भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ट्विटरवर ट््विट करून केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याच्या निर्णयाचे तीव्र … Read more

लॉकडाऊन दूध उत्पादकांच्या मुळावर

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :- मागील वर्षी लॉकडाउनच्या पूर्वी शेतकऱ्यांना ३४ ते ३५ रुपये दुधाला प्रति लिटर भाव मिळत होता. परंतु लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर दूध उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा नुकसान झाले. त्यामध्ये १७ रुपये लिटर पर्यंत भाव खाली आले. त्या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अनेक मोर्चे आंदोलन केले व जमावबंदीचे गुन्हे अंगावर घेतले, आता … Read more

मुख्यमंत्री म्हणतात, रेमडेसिविरचा अनावश्यक,अनाठायी वापर करू नका

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-आपण पैसे देऊन रेमडेसिवीर हे इंजेक्शन घेतो आहोत. मात्र ही इंजेक्शन पुरवत असताना, एक गोष्ट मी राज्यातील सर्व कोविड केअर सेंटर व रूग्णालयांमधील कार्यरत डॉक्टर्स आहेत. त्यांना मी सांगतोय, रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सांगतो आहे की, नीट लक्षात घ्या डब्यूएचओ व आपल्या टास्क फोर्स, केंद्रातील तज्ज्ञ डॉक्टरांनी देखील एक … Read more

१५ दिवस कायम राहणार, अधिकृत घोषणा मुख्यमंत्री करणार !

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-राज्यात सध्या लागू असलेला जमावबंदीसह कडक निर्बंध ३० एप्रिल नंतरही पुढेही कायम राहणार आहे. १ मे नंतर पुढील १५ दिवस हेच निर्बंध कायम राहण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात आला आहे. या माहितीनुसार १५ मे पर्यंत राज्यात लॉकडाऊन कायम ठेवण्याची मागणी अनेक मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

राज्यात लॉकडाऊन अटळ; पण किती दिवसांचे हे शुक्रवारी समजेल

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-लॉकडाऊनसंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा झाली. लॉकडाऊन वाढवावाच लागणार असल्याची परिस्थिती सध्या राज्यात आहे. लॉकडाऊन १५ दिवस वाढवायचे किंवा किती वाढवायचे यावर शुक्रवारी (३० एप्रिल) निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. असल्याचं राजेश टोपे म्हणाले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी लॉकडाऊनच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण … Read more