मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना फोन करून केले “हे’ आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो,त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावं,असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोनवर संपर्क साधून केले. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून माहिती देण्यात आलेली आहे. राज्यात दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग अधिकच … Read more

एकत्र येऊन कोरोनाविरुद्ध लढूया मुख्यमंत्र्यांचे उद्योग जगताला आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :- वाढता कोविड प्रादुर्भाव पहाता उद्योग जगताने काही कालावधीसाठी कारखान्यात आवश्यकते एवढेच कामगार बोलवावेत, प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उद्योगांना त्यांच्या कारखान्याच्या आवारातच कामगारांची राहण्याची व्यवस्था करणे शक्य आहे ती त्यांनी करावी, जिथे वर्क फ्रॉम होम करणे शक्य आहे तिथे ते केले जावे, जो कामगार कोविड बाधित होईल त्या कामगाराच्या भले … Read more

लॉकडाऊननच्या भीतीने मद्यप्रेमींची ‘स्टॉक’ची जमवाजमव

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-येत्या आठवड्यात लॉकडाऊनचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. शनिवारी मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यावसायिक, उद्योजक, पत्रकार आणि इतर तज्ज्ञांच्या भेटीगाठी घेतल्या. या सगळ्यानंतर लॉकडाऊन जवळपास निश्चित असल्याचे मानण्यात येत आहे. आगामी काही दिवसांत मद्याची रसद कमी पडायला नको, तसेच लॉकडाऊनमुळे गेल्यावेळसारखी गत होऊ नये म्हणून मद्यप्रेमींनी अगोदरच ‘स्टॉक’ खरेदीवर भर … Read more

तर महाराष्ट्रात पुर्ण लॉकडाऊन करावा लागेल ; मुख्यमंत्र्यांचा मोठा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काल (गुरुवारी) तब्बल 43 हजार कोरोना बाधितांची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. राज्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दररोज येणारे नव्या पॉझिटिव्ह रूग्णांचे आकडे धडकी भरवणार आहेत. राज्यातील काही ठिकाणी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत … Read more

राज्यात कडक निर्बंध लादण्यात येणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. तसेच, मृतांच्या आकड्यात देखील वाढ झाली असल्यामुळे राज्य सरकार आणि प्रशासनासाठी देखील ही चिंतेची बाब ठरली होती. याच अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्याच्या जनतेशी संवाद साधला. तसेच त्यांनी यावेळी अनेक महत्वपूर्ण सूचना देखील नागरिकांना दिल्या … Read more

‘मातोश्री’वर बसून लॉकडाऊन काळात सामान्यांना होणारा त्रास कसा कळणार?

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- कोरोनाच्या वाढत्या संख्येवर लॉकडाऊन हे उत्तर नाही. लॉकडाऊननंतर गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी सरकारने एक रुपयांचे पॅकेज जाहीर केले नाही. लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो, हे मातोश्रीमध्ये बसून कळणार नाही, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची आयुक्तालयात चंद्रकांत पाटील … Read more

ठाकरे सरकार क्रिमिनल, नवीन सरकार यावे : आंबेडकर

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- सरकार एखाद्या अधिकाऱ्याला कलेक्शन करायला सांगतात, ही परिस्थिती आहे. गृहमंत्री यांना कुणी सांगितले, पार्टीने सांगितले का? हा विषय कॅबिनेटमध्ये झाला होता का ? याची चौकशी व्हायला पाहिजे. ते म्हणाले की, मागील पाच वर्षातही उद्धव ठाकरे हे सत्तेत होते, उद्धव ठाकरे यांना माहिती नाही असे नाही. उद्धव ठाकरे यांना कणा … Read more

मोठी बातमी ! लॉकडाऊनबाबत नियोजन करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी भर पडत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स, व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र असून आज झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या. … Read more

…म्हणून मुख्यमंत्र्यांनी केले अहमदनगर जिल्हा प्रशासनाचे कौतुक!

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:- जिल्हयात कोरोना प्रतिबंधात्म उपाययोजनांची आता कडक अंमलबजावणी केली जात असून, त्यामुळे लॉकडाऊन करण्याची वेळ येणार नाही. असे मत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी व्यक्त केले. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही अहमदनगर जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्ह्यात कोरोना सध्याची … Read more

राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरु, देशाच्या ६० टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात !

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- राज्यातील कोरोनाची स्थिती गंभीर असून देशाच्या ६० टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात सापडत आहेत. यामुळे केंद्र सरकारनेदेखील तातडीने कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ अधिकारी आणि काही मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरु झाली आहे. बुधवारी एका दिवसात कोरोनाचे … Read more

ठाकरे सरकारला आणखी एक धक्का !

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- उद्धव ठाकरे सरकारला लवकरच मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण आता याप्रकरणाचा तपासही राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून काढून राष्ट्रीय तपास यंत्रणेला दिला जाण्याची शक्यता आहे. सध्या एनआयए केवळ अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणाचा तपास करत आहे. तर राज्य दहशतवादविरोधी पथक मनसुख हिरेन हत्याप्रकरण आणि स्कॉर्पिओ गाडीच्या चोरी प्रकरणाचा तपास … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली कोरोनावरची लस

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी जेजे रुग्णालय येथे जाऊन कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लस घेतली. याचवेळी रश्मी ठाकरे, श्रीमती मीनाताई पाटणकर तसेच शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी देखील लस घेतली. यावेळी मंत्री आदित्य ठाकरे, डॉ तात्याराव लहाने , आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास, टास्क फोर्सचे डॉ शशांक जोशी उपस्थित … Read more

कोरोनाच्या आव्हानात्मक काळात अर्थसंकल्पाद्वारे राज्यातील 13 कोटी जनतेला दिलासा !

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:-कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्याच्या विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी कमी असला तरी या आव्हानात्मक परिस्थितीत महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही याला जागून 13 कोटी जनतेला दिलासा देणारा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. या अधिवेशनात दोन्ही सभागृहामध्ये सहा विधेयके संमत करण्यात आली, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय … Read more

अहमदनगरमधील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री ठाकरे यांची जिल्हा प्रशासनासह बैठक !

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- अहमदनगर शहरात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना रोखण्यासाठी प्रशासकीय स्तरावर मास्क न वापरणाऱ्यांवर, तसेच गर्दी करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मनपाने आता नटराज कोविड सेंटरही पुन्हा सुरू केले आहे. अहमदनगरमध्ये वाढत्या कोरोनाबाधितांच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सायंकाळी महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांसह जिल्हा … Read more

मुख्यमंत्री म्हणतात शेतकऱ्यांच्या ‘या’ गोष्टीला सरकारचे प्राधान्य राहील!

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- शेतकरी बांधवांना दिवसा आणि पुरेशी वीज देणे शासनाची प्राथमिकता असून, महाकृषी ऊर्जा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी. असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. महा कृषी ऊर्जा अभियानांतर्गत कृषी ऊर्जा पर्वाचा शुभारंभ मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते विधानभवनात करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त … Read more

वर्क फ्रॉम होमची परिणामकारक यंत्रणा निर्माण करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- कोविडच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील कार्यालयीन वेळा दोन शिफ्ट्समध्ये कशारीतीने बसवता येतील तसेच वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून किती विभागांना पूर्ण क्षमतेने काम करता येतील याचे तात्काळ नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना आज दिल्या. राजपत्रित अधिकारी महासंघाचे पदाधिकारी आज वर्षा येथे मुख्यमंत्र्यांना भेटले त्यावेळी ते बोलत होते. कार्यालयीन … Read more

पोहरादेवी येथील गर्दीबाबत प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी कोविडसंदर्भात आरोग्याचे नियम सर्वाना सारखेच – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:-वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आज सकाळपासून झालेल्या गर्दीबाबत माध्यमांत येत असलेल्या बातम्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून कोविडच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा व पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी असे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच वाशीम जिल्हाधिकारी व जिल्हा … Read more

Corona Live Updates : उद्यापासून सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांना राज्यात बंदी !

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:- महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर आज सांयकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद  साधला आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का, काय बंद होणार याबाबत मुख्यमंत्री काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते. फेसबुक Live च्या माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरे जनतेशी संवाद साधला आहे.  आपल्या राज्यात … Read more