अहिल्यानगरमध्ये रात्री अवैध लाकूड वाहतूक! वनविभाग मात्र झोपेतच, लाकूड टोळ्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जवळा परिसरात अवैध लाकूड वाहतूक आणि वृक्षतोड पुन्हा एकदा वन विभागाच्या कारवाईला आव्हान देत आहे. वन विभागाने अवैध वृक्षतोडीविरुद्ध पाहणी मोहीम सुरू केली असताना, १० मे २०२५ रोजी रात्री जवळा परिसरात एका ट्रॅक्टरद्वारे अवैध लाकूड वाहतूक होत असल्याचे उघड झाले. ही घटना तस्करांच्या वाढत्या धाडसाचे द्योतक आहे आणि वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह … Read more

अहिल्यानगरमधील सिमेंट कारखान्याला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध, सुनावणी सुरू असतांना शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

Ahilyanagar News: काष्टी- परिसरातील भीमा-घोड नदीच्या काठावरील सुमारे ४९ गावांना पर्यावरणीय आणि कृषी नुकसान पोहोचवू शकणाऱ्या दालमिया भारत ग्रीन व्हिजन लिमिटेड सिमेंट कारखान्याविरोधात स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. मंगळवारी सांगवी फाट्यावरील मंगल कार्यालयात पाच तास चाललेल्या सुनावणीत शेतकऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर आपल्या हरकती नोंदवत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या सुनावणीत शेतकऱ्यांनी सिमेंट कारखान्यामुळे होणारे पर्यावरणीय नुकसान, … Read more

अहिल्यानगमध्ये होणारा सिमेंटचा प्रकल्प होऊ देणार नाही, नाहीतर रस्त्यावर उतरू; खासदार निलेश लंकेचा इशारा

Ahiklyanagar News: श्रीगोंदा- निमगाव खलू (ता. श्रीगोंदा) येथे दालमिया (भारत) ग्रीन व्हिजन लिमिटेड कंपनीने वार्षिक ६० लाख मेट्रिक टन सिमेंट निर्मितीचा प्रकल्प प्रस्तावित केला आहे. परंतु, या परिसरातील निमगाव खलूसह आसपासची गावे शेतीप्रधान आणि बागायती आहेत. हा प्रकल्प येथे न उभारता दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. या प्रकल्पामुळे शेती आणि लोकांचे आरोग्य … Read more

अहिल्यानगरमध्ये होणाऱ्या सिमेंट प्रकल्पाला शेतकऱ्यांचा तिव्र विरोध, आंदोलनाचा दिला इशारा

अहिल्यानगर- घोड आणि भीमा नदीच्या बागायती पट्ट्यातील निमगाव खलू परिसरात प्रस्तावित दालमिया (भारत) ग्रीन व्हिजन लिमिटेड सिमेंट प्रकल्पाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. या प्रकल्पामुळे शेती, जनावरांचे आरोग्य आणि पर्यावरणाला गंभीर धोका बसेल, अशी भीती व्यक्त करत १० ते १५ गावांतील ग्रामस्थांनी आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. शेतीला धोका प्रकल्प क्षेत्रातील निमगाव खलू, कौठा, गार, … Read more