गारपीट आणि अवकाळी पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान, अद्याप पंचनामे न झाल्यामुळे शेतकरी प्रशासनाविरोधात आक्रमक

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सोनई परिसरात रविवारी (४ मे २०२५) सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदा, ऊस यांसारख्या पिकांसह घरांचे आणि विद्युत यंत्रणेचेही नुकसान झाले. पाच दिवस उलटूनही महसूल विभागाने नुकसानीचे पंचनामे न केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. स्थानिक आमदार विठ्ठलराव लंघे यांनी पंचनाम्याचे आदेश दिल्याचा … Read more

निळवंडे कालव्यातील पाईप जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी फोडले, पाईप फोडल्यामुळे शेतकरी आक्रमक

Ahilyanagar News: देवगाव- निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून सध्या उन्हाळी आवर्तन सुरू आहे. संगमनेर तालुक्यातील अनेक गावांतून हा कालवा जातो. शेतीसाठी पाणी मिळावं म्हणून शेतकऱ्यांनी कालव्यात पाइप टाकले होते. पण जलसंपदा विभागाकडून हे पाइप फोडले जात असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. संगमनेर तालुक्यातून कालवा डोळ्यांदेखत पुढे जात असताना, स्थानिक शेतकऱ्यांना मात्र पाण्यापासून वंचित ठेवलं जात … Read more

अहिल्यानगरमधील सिमेंट कारखान्याला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध, सुनावणी सुरू असतांना शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

Ahilyanagar News: काष्टी- परिसरातील भीमा-घोड नदीच्या काठावरील सुमारे ४९ गावांना पर्यावरणीय आणि कृषी नुकसान पोहोचवू शकणाऱ्या दालमिया भारत ग्रीन व्हिजन लिमिटेड सिमेंट कारखान्याविरोधात स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. मंगळवारी सांगवी फाट्यावरील मंगल कार्यालयात पाच तास चाललेल्या सुनावणीत शेतकऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर आपल्या हरकती नोंदवत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या सुनावणीत शेतकऱ्यांनी सिमेंट कारखान्यामुळे होणारे पर्यावरणीय नुकसान, … Read more

अहिल्यानगरमध्ये व्यापाऱ्यांनी कांद्याचे भाव पाडले! शेतकऱ्यांनी आक्रमक होत लिलाव पाडला बंद

श्रीरामपूर: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मेहनतीला न्याय मिळेल, अशी अपेक्षा असताना श्रीरामपूर बाजार समितीत कांद्याच्या लिलावात भाव पाडल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी (15 एप्रिल) सकाळी लिलाव काही काळ बंद पाडले. कांद्याचे भाव 900 ते 1100 रुपये प्रति क्विंटल इतके कमी असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. या वादामुळे बाजार … Read more

डिंभे-माणिकडोह बोगद्यासाठी जनआंदोलनाची घोषणा, खासदार नीलेश लंके आक्रमक

श्रीगोंदा- तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कुकडी प्रकल्पातील पाणीप्रश्न हा अत्यंत गंभीर आणि जटिल आहे. विशेषतः उन्हाळ्यात पाण्याची टंचाई ही शेतकऱ्यांसमोरील मोठी समस्या बनते. या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी डिंभे-माणिकडोह बोगदा प्रकल्प पूर्ण होणे आवश्यक आहे. या बोगद्याच्या पूर्ततेसाठी लवकरच व्यापक जनआंदोलन उभारण्याची तयारी खासदार नीलेश लंके यांनी जाहीर केली आहे. त्यांच्या या घोषणेने श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आशेचे … Read more

१४ एप्रिलपासून अहिल्यानगरमधील दूध-भाजीपाला पुरवठा होणार बंद! शेतकऱ्यांच्या सरकारला इशारा

श्रीरामपूर: विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने शेतकऱ्यांना सातबारा उताऱ्यावरील कर्ज पूर्णपणे माफ करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, हे आश्वासन पूर्ण न झाल्याने शेतकरी संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त करत त्वरित कर्जमाफीची मागणी केली आहे. यासंदर्भात सरकारने ठोस पावले न उचलल्यास 14 एप्रिलपासून शहरांना दूध आणि भाजीपाला यांचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय शेतकरी संघटनेने घेतला आहे. शेतकऱ्यांकडे सरकारचे … Read more

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर आश्वासने महायुती सरकारने पूर्ण करावेत, अन्यथा सरकार विरोधात राज्यव्यापी आंदोलन उभं राहणार!

अहिल्यानगर- राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, मोफत वीज आणि शेतमालाला भरघोस दर अशा आश्वासनांचा पाऊस पाडला होता. या घोषणांनी अनेक मतदार भारावले गेले. परंतु सत्तेत आल्यानंतर हे आश्वासन विसरले गेले. उलट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना ३१ मार्चपर्यंत पीककर्ज फेडण्याचे आदेश दिले असून, त्यानंतर वसुली सुरू केली जाईल असा इशाराही देण्यात … Read more