कोपरगावला पाणी टंचाईची झळ, गावतळे आणि शेततळे भरून देण्याची आमदार आशुतोष काळे यांची जलसंपदा मंत्र्यांकडे मागणी

Ahilyanagar News: कोपरगाव- तालुक्यातील पूर्व भागात सध्या तीव्र पाणी टंचाईने नागरिक आणि शेतकरी हैराण झाले आहेत. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी अहिल्यानगर येथे ११ मे २०२५ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या. त्यांनी नांदूर मध्यमेश्वर जलद कालवा आणि पालखेड कालव्यातून गावतळे आणि शेततळे भरून देण्याची मागणी केली, जेणेकरून पावसाळ्यापर्यंत … Read more

अकोले तालुक्यात जलजीवन योजनांचा उडाला बोजवारा, पाणी टंचाईवरून सरपंचाचा आरोप!

Ahilyanagar News: अकोले- तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांमध्ये मोठा गोंधळ असल्याचा आरोप तालुक्यातील गावोगावच्या सरपंचांनी केला आहे. या योजनांचे काम अपूर्ण राहिल्याने आणि नियोजनाच्या अभावामुळे तालुका तीव्र पाणीटंचाईच्या संकटात सापडला आहे. सोमवारी अकोले पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या पाणीटंचाई आढावा बैठकीत सरपंचांनी आपली खदखद मांडली. आमदार डॉ. किरण लहामटे यांनी यावेळी अपूर्ण योजनांवर … Read more

श्रीरामपूरच्या या ५२ गावांना मिळणार शुद्ध पाणी! ३०० कोटी रूपयांच्या योजनांची कामे सुरू!

Ahilyanagar News: श्रीरामपूर- तालुका टँकरमुक्त असला, तरी सध्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचे चटके बसताहेत. भविष्यात वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन प्रत्येकाला पुरेसे पाणी मिळावे, यासाठी शासनाच्या ‘हर घर जल’ योजनेअंतर्गत श्रीरामपूर तालुक्यात सुमारे ३०० कोटींची कामे हाती घेण्यात आली आहेत. यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या २४१ कोटी ७७ लाख आणि जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशन … Read more

अकोले तालुक्यात पाणीटंचाईचे संकट, देवठाणच्या सहा वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा सुरू

अकोले- पाणीटंचाईने अकोले तालुक्याला विळखा घातला असून, चैत्र महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात वैशाखाच्या तीव्र उष्म्याची चाहूल लागली आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी तालुक्यातील देवठाण गावातील सहा वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. याशिवाय, मुळा खोऱ्यातील अनेक गावांना टँकर मंजूर झाले असून, आणखी प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. पाण्याच्या या गंभीर समस्येमुळे ग्रामस्थांचे हाल होत असून, … Read more

अहिल्यानगरमध्ये जलजीवन मिशन योजनेत कोट्यावधींचा भ्रष्टाचार, केंद्रीय कमिटीच्या तपासणीत कामाचे पितळ उघडे

अहिल्यानगर- जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला दररोज 55 लिटर शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाइपलाइनचे जाळे विणण्यात आले आहे. या योजनेनुसार पाइपलाइन खणताना किमान एक मीटर खोलीची अपेक्षा आहे. मात्र, केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या पथकाने तीन दिवस जिल्ह्यात मुक्काम करून केलेल्या तपासणीत अनेक ठिकाणी पाइप केवळ एक फूट खोलीवर आढळले. या त्रुटींमुळे जलजीवन मिशन … Read more