या मुद्द्यावर गोपीचंद पडळकर एकाकी

Maharashtra Politics : अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगरी करावे, अशी मागणी करणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर एकाकी पडल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या पक्षाकडूनही कोणीही त्यांना पाठिंबा दिली नाही. उलट विरोधातच मते व्यक्त केली आहेत. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीही यासंबंधी प्रतिकूल मत व्यक्त केले आहे. तर हिंदुत्तवादी संघटनांची दुसऱ्या नावाची मागणी आहे. सामान्य नागरिकांना मात्र या … Read more

तुम्ही मला मंत द्या, मी तुम्हाला TATA Safari गाडी देतो, राज्यसभेसाठी इच्छुक अपक्षाची ऑफर

Maharashtra Politics : राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात उतरले असल्याने आधीच घोडेबाजाराची चर्चा सुरू झाली आहे. अशात आणखी एका उमेदवाराने अपक्ष निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. मते मिळावीत यासाठी त्यांनी आमदारांना जाहीरपणे ऑफरही दिली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आधीच यामुळे ते चर्चेत आले आहेत. अर्थात त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक असलेले अनुमोदन तरी … Read more

राज्यसभेत घोडेबाजार? ‘तिसऱ्या’साठी भाजपला हवीत १३ मते

Maharashtra Politics : भारतीय जनता पार्टीने राजकीय खेळी करीत राज्यसभेसाठी आपला तिसरा उमेदवार रिंगणात उतरविला आहे. शिवसेनेची कोंडी करण्यासाठी कोल्हापूरमधील माजी खासदार धनंजय महाडिकांना उमेदवारी देण्यात आली आहे. संख्याबळानुसार तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपला १३ मतांची अवश्यकता आहे. त्यामुळे यासाठी घोडेबाजार रंगण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडे १६९ आमदार आहेत. शिवसेना ५५, राष्ट्रवादी काँग्रेस ५४, काँग्रेस … Read more

काँग्रेसची ती बैठकच रद्द, तक्रार करायला गेलेल्या नेत्यांचा हिरमोड

Maharashtra Politics : राज्यातील महाविकास आघाडीत मुस्कटदाबी होत असल्याची तक्रार घेऊन दिल्लीत गेलेल्या राज्यातील काँग्रेस नेत्यांचा दुहेरी हिरमोड झाला आहे. एक तर दिल्लीत होणारी अशी बैठकच रद्द करण्यात आली आहे. तर दुसरीकडे खुद्द काँग्रेस नेतृत्वानेत राज्यातील काँग्रेसची मुस्कटदाबी केली आहे, त्यामुळे तक्रार तरी कशी करायची? असा प्रश्न राज्यातील काँग्रेसपुढे पडला आहे. राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने दिल्लीत … Read more

या मोठ्या नेत्याने सोडली काँग्रेस, ‘स.प.’कडून लढविणार राज्यसभा

Maharashtra Politics : काँग्रेसच्या G-23 या बंडखोर गटाचा प्रमुख भाग असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून समाजवादी पक्षाच्या मदतीने राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी आज लखनऊमध्ये जाऊन राज्यसभा निवडणुकीसाठीचा अर्ज भरला. आपण १६ मे रोजीच काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याचे त्यांनी उमेदवारी अर्ज … Read more

शिवसेनेकडून संभाजीराजेंची कोंडी, आता पुढे काय?

Maharashtra Politics : इतरांच्या पाठींब्यावर राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढविण्याच्या तयारीत असलेले कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांची शिवसेनेने चांगलीच कोंडी केली आहे. काल संभाजीराजे व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यात बैठक झाली. मात्र, त्यामध्ये पाठिंबा देण्यावर अंतिम निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात येत.आज शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी या विषयावर बोलताना संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याशिवाय त्यांना पाठिंबा … Read more

आघाडी सरकारविरोधात अण्णा पुन्हा मैदानात, मुख्यमंत्र्यावर केला आरोप

Maharashtra Politics : राज्यातील राजकीय वातावरण पेटलेले असताना आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही आघाडी सरकारच्या विरोधात मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. लोकायुक्य कायद्यासाठी राज्यभर आंदोलन पुकारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. “सुरवातीला यासंबंधी लेखी आश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कोणी तरी जादू केली असावी, त्यामुळे ते आता यावर बोलतही नाहीत,” असा आरोपही हजारे यांनी … Read more

मदरशांत राष्ट्रगीत तर मग संघाच्या शाखेतही…. काँग्रेसची मागणी

Maharashtra Politics :- उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने तेथील सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत सक्तीचे केले आहे. या निर्णयाचे देशभर पडसाद उमटत आहे. ठिकठिकाणी या निर्णयाचे स्वागतही होत आहे. मात्र महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी यावरून भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. योगी सरकारच्या या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सावंत यांनी म्हटले आहे, ‘तर मग … Read more

आता आठवलेही म्हणाले, राज ठाकरे यांनी माफी मागावी

Maharashtra Politics : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातून विरोध सुरू आहे. तेथील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध केला आहे. राज ठाकरे यांनी प्रथम उत्तर भारतीयांची माफी मागावी, अशी मागणी सिंह यांनी केली आहे. आता अशीच मागणी केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. विशेष … Read more

राज ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी, मुस्लिम संघटनांवर संशय

Maharashtra Politics : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि नेते बाळा नांदगावकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यासंबंधीचे एक पत्र नांदगावकर यांच्या कार्यालयात आले आहे नांदगावकर यांनी हे पत्र गृहमंत्र्यांकडे दिले आहे.यासंबंधी नांदगावकर यांनी सांगितले की, ‘मशिदीवरील भोंग्यांना विरोध केल्यामुळे मनसेच्या नेत्यांना मुस्लीम संघटनांकडून धमक्या दिल्या जात आहेत. माझ्या कार्यालयात नुकतंच एक पत्र आलं … Read more

राणा दाम्पत्याला कोर्टाची नोटीस, केली ही विचारणा

मुंबईत दाखल गुन्ह्यात जामिनावर सुटका झालेले अमरावतीचे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुंबई सत्र न्यायालयाने नोटीस पाठविली आहे. जामीन मंजूर करताना घालून दिलेल्या अटींचा भंग केल्याने तुमचा जामीन रद्द का करू नये? अशी नोटीस जारी करण्याचा आदेश मुंबई सत्र न्यायालयाने दिला आहेमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या खासगी निवासास्थानासमोर हनुमान चालीसाचे वाचन … Read more

राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदी विद्या चव्हाण, रुपाली ठोंबरेंना संधी नाहीच

अहमदनगर Live24 टीम, 05 मे 2022 Maharashtra Politics :- राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदी विद्या चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या या जागेवर चव्हाण यांची नियुक्ती केल्याची घोषणा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष खासदार फौजिया खान यांनी केली. मनसेमधून अलीकडेच राष्ट्रवादीत आलेल्या आणि आल्यापासून पक्षाच्यावतीने भाजप तसेच मनसेवरही जोरदार टीका करणाऱ्या रुपाली … Read more

बिग ब्रेकिंग : राज ठाकरेंकडून ‘कार्यक्रम’ जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 03 मे 2022 Maharashtra Politics :- गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मशीदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून राजकारणाचे भोंगे जोरात वाजत आहेत. राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या सभेपासून या मुद्द्यावरून राजकारण तापवलं आहे. त्यानंतर रविवारी औरंगाबादेत झालेल्या सभेतही राज ठाकरेंनी पुन्हा इशारा देत ईदपर्यंतचा अल्टिमेटम दिला. तसेच मनसेकडून महाआरतीचा इशाराही दिला होता मात्र नंतर ईदचा विचार … Read more

चहा-पाण्यासाठी बोलावून अटक केली, संगमनेरात मनसेचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 03 मे 2022 Maharashtra Politics : महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांविरूद्ध राज्यभर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे. संगमनेरमध्येही अशीच कारवाई करण्यात आली. मात्र येथे पोलिसांनी आम्हाला चहा-पाण्यासाठी बोलावून चर्चा करण्याचा बनाव करीत अचानक अटक केली. काहीही संधी न देता लगेच न्यायालयात नेले, असा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला असून याबद्दल पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख … Read more

राज ठाकरेंविरूद्ध अजामीनपात्र वॉरंट, पण या जुन्या प्रकरणात

अहमदनगर Live24 टीम, 03 मे 2022 Maharashtra Politics : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत. भोंगाप्रकरणावरून ठाकरे यांना घेरण्याच्या प्रयत्नात असलेल्या राज्य सरकारच्या हाती ठाकरे यांच्याविरूद्धचे अजामीनपात्र अटक वॉरंट पडले आहे. औरंगाबादमधील सभेत अटी शर्तींचा भंग केल्याप्रकरणी ठाकरे यांच्या विरोधात आताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या वॉरंटची पोलिस अंमलबजावणी करणार … Read more

बिग ब्रेकिंग : अखेर राज ठाकरे यांच्याविरूदध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 03 मे 2022 Maharashtra Politics : सभेला परवानगी देताना घालून दिलेल्या अटींचे पालन न केल्याचा ठपठा ठेवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरूध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. औरंगाबादच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. औरंगाबादेतील सिटी चौक पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. दुपारी एक वाजता पोलिस महासंचालकांनी पत्रकार परिषद … Read more

औरंगाबादमधील भाषणासंबंधी राज ठाकरेंवर आजच होणार कारवाई, पोलिस महासंचालकांचे संकेत

अहमदनगर Live24 टीम, 03 मे 2022 Maharashtra Politics : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील भाषणावरून त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. राज ठाकरेंच्या भाषणावर कारवाई करण्यास औरंगाबाद पोलीस आयुक्त सक्षम आहेत, अशा शब्दांत पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. जी काही कारवाई व्हायची, ती आजच होणार असल्याचेही … Read more

मनसेने राज्यभर सुरू केली ही तयारी, पोलिसही सज्ज

अहमदनगर Live24 टीम, 03 मे 2022 Maharashtra Politics : धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा मुद्दा चांगला पेटताना दिसत असून महाराष्ट्र नव निर्माण सेनेने यासाठी राज्यभर वेगळीच तयारी सुरू केली आहे. पोलिसांकडून होणारी संभाव्य कारवाई लक्षात घेता मनसेतर्फे राज्यभरात वकिलांची फौज तयार करण्यात येत आहे. अड, किशोर शिंदेच्या नेतृत्वाखाली राज्यभरात वकिलांच्या याद्या तयार केल्या जात आहेत. कार्यकर्त्यांवर कारवाई … Read more