MSRTC News : महाराष्ट्रात येणार एसटीच्या स्मार्ट बसेस ! Pratap Sarnaik यांनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आपल्या प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि वक्तशीर प्रवासाचा अनुभव देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज ‘स्मार्ट बसेस’ लवकरच रस्त्यावर आणणार आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती जाहीर करताना, प्रवाशांच्या सोयी आणि सुरक्षेला प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. या नव्या उपक्रमामुळे प्रवासाचा अनुभवच बदलणार आहे. परिवहन मंत्री … Read more

MSRTC News : महाराष्ट्रातील एसटी डेपो होणार चकाचक

MSRTC News

MSRTC News : १४ जून २०२३ रोजी एसटीच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनी प्रवाशांचा एसटी प्रवास सुखकर होण्यासाठी तसेच प्रवाशांना खड्डे, धुळीचा त्रास टाळण्यासाठी एसटी आगार, स्थानक ठिकाणी तत्काळ काँक्रीटीकरण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाला दिल्या. मात्र पावसाळ्याचे दिवस असल्याने कामाच्या सुरुवातीलाच ब्रेक लागला. मात्र पावसाळा सरताच गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील १९३ आगारांतील … Read more

MSRTC News : एसटीच्या सरासरी फेऱ्यांची संख्या निम्म्याने घटली ! सोसेना प्रवाशांचा भार

MSRTC News

MSRTC News : भविष्यात येणाऱ्या नव्या गाड्यांची स्वप्ने रंगवत असताना सर्वसामान्यांना वर्तमानातील एसटी प्रवास त्रासदायक ठरत आहे. एसटीच्या सरासरी फेऱ्यांची संख्या निम्म्याने घटली आहे. मार्गातील बिघाडाचा टक्का वाढल्याने पैसे देऊन रस्त्यावर ताटकळत बसण्याची नामुष्की प्रवाशांवर ओढावत आहे. ज्युन्या गाड्यांची देखभाल व दुरुस्ती रखडणे, नव्या गाड्यांची कमतरता आणि आयुर्मान पूर्ण झालेल्या गाड्यांतून सुरु असलेली प्रवासी वाहतूक, … Read more

MSRTC News : एसटी महामंडळाने आणलेली ‘ती’मोफत सेवा गुंडाळली ! वाचा नक्की काय झालं ?

MSRTC News

एसटीपासून दुरावत चाललेल्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाने बसेसमध्ये वायफाय सेवा सुरु केली होती. मात्र अवघ्या काही वर्षातच ही सेवा गुंडाळण्याची नामुष्की महामंडळावर ओढवली आहे. वायफायकडे प्रवाशांनी पाठ फिरवल्याने तोटा वाढत चालला असल्याची कारण देत ही सेवा बंद करत असल्याचे वायफाय सेवा पुरवणाऱ्या कंपनीने महामंडळाला सांगितले. एसटीचे तोट्यातील चाक अधिकच गाळात रुतू लागले असून, तोटा … Read more

MSRTC News : ई-बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल ! देशातील सर्वात मोठी ई-बसेसची निविदा…

MSRTC News

MSRTC News : एसटीला नवसंजीवनी देण्यासाठी शासन दरबारी विविध प्रयत्न सुरू आहेत. अशातच एसटीच्या ताफ्यात नवीन २० ई-बसेस दाखल झाल्या आहेत. मार्च महिन्यात एसटी महामंडळाने देशातील सर्वात मोठी ई-बसेसची निविदा काढली होती. या निविदा अंतर्गत एसटी महामंडळ ५१५० ई-बस भाडेतत्त्वावर घेणार आहे. त्याअंतर्गत २३५० मिडी बसेस व २८०० मोठ्या आकाराच्या ई-बसेस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. … Read more

MSRTC News : दोन दिवसांत १०० बसेसची तोडफोड तर ४ बसेस जाळल्या एसटीला ४ कोटींचा फटका

MSRTC News

MSRTC News : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाला सोमवारपासून पुन्हा हिंसक वळण लागले आहे. एकट्या बीडमध्ये ७० बसेसची तोडफोड जमावाकडून करण्यात आली असून राज्यभरात गेल्या दोन दिवसांत १०० बसेसची तोडफोड करण्यात आली आहे, तर ४ बसेसची जाळपोळ करण्यात आली आहे. यामध्ये गेल्या दोन दिवसांत एसटी महामंडळाचे तब्बल ४ कोटींचे नुकसान झाले असून अनेक … Read more

MSRTC News : वर्षभरात एकही नवी एसटी बस महाराष्ट्रात येणार नाही !

MSRTC News

MSRTC News : शहरापासून खेडोपाड्यापर्यंत असलेल्या सर्वसाधारण प्रवाशांची आणि एसटी बस वाहतुकीची नाळ अधिक घट्ट करण्यासाठी एसटी महामंडळाने आपली कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वीच इलेक्ट्रिक बससाठी हिरवा झेंडा दाखवत पुणे ते अहमदनगर मार्गावर महामंडळाकडून बससेवा सुरू करण्यात आली. यानंतर डिझेलवरील जास्तीचा खर्च कमी करण्यासाठी काही बसेस सीएनजीमध्ये परावर्तित करण्यात येत असताना इलेक्ट्रिक बसेस आणि नव्या … Read more

MSRTC News : गणेशोत्सव काळात प्रवाशांसाठी जादा बसेस

MSRTC News

MSRTC News : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशी आपल्या नातेवाईकांकडे, मित्रमंडळींकडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतात. या काळात त्यांना खाजगी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागते. त्याचे प्रवास भाडे अधिक असल्याने अनेकांना ते परवडत नाही. तसेच काही मार्गावर इतर प्राधिकरणाच्या बससेवाही सुरू नाहीत. परिणामी, प्रवाशांची मोठी गैरसोय होते. ती टाळण्यासाठी अशा मार्गांचा शोध घेऊन तिथे अधिकच्या बस सोडण्याचा टीएमटी … Read more

MSRTC News : एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळणार महागाई भत्ता

MSRTC News

MSRTC News : शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना ३८ टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी घेतला. गणेशोत्सवाच्या तोंडावर चार टक्क्यांनी भत्ता वाढल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे बाप्पा पावल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचारी सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता मिळावा, अशी मागणी करत होते. ती पूर्ण करत महागाई भत्त्यामध्ये आता … Read more

MSRTC News : वाहक जाणार संपावर ! प्रवाशांना होणार त्रास

MSRTC News

MSRTC News : पगारवाढीबरोबरच इतर मागण्यांसाठी ठाणे परिवहन सेवेच्या धर्मवीर आनंद दिघे आगारात कार्यरत असलेले कंत्राटी पुरुष व महिला वाहक हे येत्या २१ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. त्यामुळे या संपाचा फटका ठाणेकर परिवहनच्या प्रवाशांना सहन करावा लागण्याची चिन्हे आहेत. बेस्टमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी ज्या पद्धतीने काही दिवसांपूर्वी विविध मागण्यांसाठी संपाचे हत्यार पुकारले होते, त्याच धर्तीवर … Read more

MSRTC News : कोकणात एसटीच्या ३१०० बसेस धावणार ! जेष्ठ नागरिकांना १०० टक्के,महिलांना ५० टक्‍के तिकीट दरात सवलत

MSRTC News :- १९ सप्टेबर रोजी साजरा करण्यात येणारा गणेशोत्सव अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपला आहे. सर्वत्र हा उत्सव दरवर्षी मोठ्या थाटात साजरी करण्यात येत असल्याने गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेसह एसटी महामंडळाकडून देखील जादा बसेसची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याच्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा १४ … Read more

MSRTC News : आता एसटीचा प्रवास झोपून ! मिळणार झोपण्यासाठी गादी आणि उशी,ताफ्यात ५० जबरदस्त बसेस दाखल होणार दाखल !

MSRTC News

MSRTC News : एसटीच्या ताफ्यात येत्या २ महिन्यांत म्हणजेच ऑक्टोबरपर्यंत ५० विनावातानुकूलित २.१ शयनयान बसेस दाखल होणार आहेत. यापैकी एक बस पुणे आगारात आली असून, इतर बसेसची बांधणी सुरू असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे. एसटी महामंडळाने काही वर्षांपूर्वी शिवशाही वातानुकूलित शयनयान बसगाड्या घेतल्या. मुंबई – कोल्हापूर, मुंबई-अहमदनगर, मुंबई – धुळे या मार्गावर वातानुकूलित … Read more

MSRTC News : सरकार एसटी महामंडळाला देणार ३३४.५२ कोटी

MSRTC News

MSRTC News : एसटी महामंडळाच्या माध्यमातून प्रवास करण्यासाठी विविध सवलती सरकार देत आहे. जून महिन्यातील या सवलतींच्या परिपूर्तीसाठी राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला ३३४.५२ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. राज्य गृहविभागाने यासंदर्भातील शासन निर्णय मंगळवारी जारी केला आहे. राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर येताच एसटी प्रवाशांना अनेक सवलती देण्यात आल्या. एसटी बसमधून महिलांना तिकीट ५० टक्के … Read more

MSRTC News : यंदा गणेशोत्सवासाठी १५०० गाड्या ! महिलांसह ज्येष्ठ नागरिकांना सवलत मिळणार का नाही ? वाचा सविस्तर

MSRTC News

MSRTC News : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यंदाही गणेशोत्सवासाठी सज्ज झाले आहे. यावर्षीही या महामंडळाच्या ठाणे विभागाने कोकणात गतवर्षापेक्षा ५०० जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये ग्रुप आरक्षणावर विशेष भर दिला आहे. सलग तिसऱ्या वर्षी ठाणे विभागातून गणेशोत्सवात कोकणवासीयांसाठी बसगाड्यांची संख्या वाढल्याची दिसत आहे. २०२२ साली एक हजार ८ गाड्यांचे नियोजन केले होते. मात्र … Read more

MSRTC News : तब्बल ११ लाख विद्यार्थ्यांकडून एसटीचा प्रवास

MSRTC News

MSRTC News : १५ जूनपासून शालेय-महाविद्यालयीन वर्ष सुरू होते. आजही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत महाविद्यालयात ये-जा करण्यासाठी एसटी बसेसचा सर्वात मोठा आधार आहे. याच पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाद्वारे विविध योजनांद्वारे राज्यभरात १२ हजार ६४६ एसटी बसेसच्या फेऱ्या धावतात. चालूवर्षाचा विचार करता या फेऱ्यांमधून तब्बल ११ लाख विद्यार्थ्यांनी एसटी प्रवास केला आहे. ग्रामीण भागातील टोकापासून शहरापर्यंत शाळा-महाविद्यालयात … Read more

MSRTC News : एसटीच्या ताफ्यात १३५० नव्या बसगाड्या

MSRTC News

MSRTC News : शहरापासून खेडोपाड्यांपर्यंत असलेल्या सर्वसाधारण प्रवाशांची आणि एसटी बस वाहतुकीची नाळ अधिक घट्ट करण्यासाठी एसटी महामंडळाने आपली कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वीच इलेक्ट्रिक बससाठी हिरवा झेंडा दाखवत पुणे ते अहमदनगर मार्गावर महामंडळाकडून बससेवा सुरू करण्यात आली. यानंतर डिझेलवरील जास्तीचा खर्च कमी करण्यासाठी काही बसेस सीएनजीमध्ये परावर्तित करण्यात येत असताना चालू वर्षात डिसेंबरपर्यंत एसटी … Read more

MSRTC News : ह्या बसने केली एका महिन्यात २ कोटींची कमाई ; प्रवाशांचा उदंड प्रतिसाद

MSRTC News

MSRTC News : एसटी महामंडळाच्या ताफ्यात डिझेलवर धावणाऱ्या १४ हजार बसेस आहेत. डिझेल गाड्यांच्या वाढत्या खर्चामुळे व पर्यावरण संवर्धनाला हातभार लावण्याकरता मुंबई, ठाणे, पुणे मार्गावर इलेक्ट्रिक बसेस चालवण्याचा निर्णय एसटी महामंडळाकडून घेण्यात आला. त्यानुसार १ मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे-पुणे मार्गावर चालवण्यात येणाऱ्या पहिल्या ई शिवनेरी बसचे उद्घाटन केले. सद्यस्थितीत ठाणे-पुणे आणि मुंबई-पुणे … Read more

MSRTC News : एसटी प्रवासासाठी ज्येष्ठ व महिलांना मोठी सवलत दिल्याने नक्की कोणाचे होत आहेत हाल ? वाचा

MSRTC News

MSRTC News :एसटीचा प्रवास म्हणजे सुखाचा प्रवास’ असे म्हटले जाते, म्हणून प्रवासासाठी एसटी बसलाच प्राधान्य दिले जाते. त्यात आता एसटी महामंडळाने महिलांना प्रवासात ५० टक्के सवलत दिल्यापासून एसटी बस नेहमी भरून जात आहे. त्यात दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या जागांवरही अन्य प्रवासी बसतात. त्यामुळे दिव्यांगांना जागाच मिळत नसल्याचे सध्याचे चित्र आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या प्रत्येक एसटी बसमध्ये … Read more