श्रीगोंदा तालुक्यात शेलारांच्या प्रवेशाने राजकीय समीकरण बदलणार! राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली

श्रीगोंदा- तालुक्यातील राजकीय वातावरण सध्या तापलं आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, बेलवंडीचे सरपंच ऋषिकेश शेलार, हज कमिटीचे माजी सदस्य लियाकत तांबोळी आणि मुकुंद सोनटक्के यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जामखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशाने श्रीगोंद्यातील राजकीय आखाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली आहे. आगामी जिल्हा परिषद आणि श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुकीच्या … Read more

अहिल्यानगरमधील या नगरपंचायतीत राजकीय भूकंप ! ११ नगरसेवकांनी बदलला पक्ष, शरद पवार गटाला मोठा धक्का

कर्जत नगरपंचायतीत मोठ्या राजकीय उलथापालथीची तयारी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ८ नगरसेवक आणि काँग्रेसचे ३ नगरसेवक यांनी भाजप नेते व आमदार प्रा. राम शिंदे यांच्यासोबत गुप्त बैठक घेतल्याने सत्ताबदलाच्या चर्चांना उधाण आले आहे. रविवारी रात्री झालेल्या या बैठकीने स्थानिक राजकारणात खळबळ उडवली असून आमदार रोहित पवार यांच्यासाठी मोठी धक्का मानला जात आहे. … Read more