विहीरी पडल्या कोरड्या, कुकडीचं पाणी बंद; श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांच्या फळबागा पाण्याअभावी चालल्या जळून

Ahilyanagar News: श्रीगोंदा- तालुक्यातील शेतकरी सध्या गंभीर संकटाचा सामना करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून कुकडी प्रकल्पातून मिळणाऱ्या पाण्यावर अवलंबून असलेल्या या भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फळबागांची लागवड केली होती. मात्र, यंदा पाण्याच्या कमतरतेमुळे फळबागा जळून खाक होत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. कुकडीचे पाणी वेळेवर न मिळाल्याने … Read more

अकोले तालुक्यात जलजीवन योजनांचा उडाला बोजवारा, पाणी टंचाईवरून सरपंचाचा आरोप!

Ahilyanagar News: अकोले- तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांमध्ये मोठा गोंधळ असल्याचा आरोप तालुक्यातील गावोगावच्या सरपंचांनी केला आहे. या योजनांचे काम अपूर्ण राहिल्याने आणि नियोजनाच्या अभावामुळे तालुका तीव्र पाणीटंचाईच्या संकटात सापडला आहे. सोमवारी अकोले पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या पाणीटंचाई आढावा बैठकीत सरपंचांनी आपली खदखद मांडली. आमदार डॉ. किरण लहामटे यांनी यावेळी अपूर्ण योजनांवर … Read more

अहिल्यानगरमधील ‘या’ तालुक्यात भीषण पाणीटंचाई; धरणे पडली कोरडे, विहीरींनी गाठला तळ, ४६ वाड्या-वस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा

Ahilyanagar News: कर्जत- तालुका सध्या भीषण पाणीटंचाईच्या झळा सोसत आहे. तालुक्यातील २२ गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, यापैकी ९ गावे आणि त्यांना लागून असलेल्या ४६ वाड्या-वस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने पाण्याची पातळी खालावली असून, विहिरी आणि कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. पंचायत समितीच्या टंचाई विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १० टँकरद्वारे १६ हजार … Read more

अहिल्यानगरमध्ये भीषण पाणी टंचाई! तलाव कोरडे, विहिरी आटल्या; ११ गावे आणि ३३ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू

Ahilyanagar News: केडगाव : अहिल्यानगर तालुक्यात कडक उन्हाचे चटके आणि पाण्यासाठी वणवण भटकंती यामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. माळराने ओसाड पडली, तलाव कोरडे झाले, तर विहिरी आणि कूपनलिकांनी तळ गाठला आहे. या विदारक चित्रामुळे तालुक्यातील ११ गावे आणि ३३ वाड्या-वस्त्यांची तहान भागवण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. प्रशासन सतर्क असल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळत आहे. यंदा … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरची तहान भागवणारा पिंपळगाव तलाव नेमका कोणाच्या मालकीचा?; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे अतिक्रमणांचा सुळसुळाट!

Ahilyanagar News: अहिल्यानगर- शहरापासून अवघ्या १६ किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंपळगाव माळवी तलावाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. एकेकाळी संपूर्ण शहराची तहान भागवणाऱ्या या तलावाकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्याने अतिक्रमण, बेसुमार पाणी उपसा आणि वृक्षतोड यामुळे तलावाला उतरती कळा लागली आहे. मागील आठवड्यात तलावात खोदलेल्या अनधिकृत विहिरीचा ताबा मिळवण्यासाठी जेऊर ग्रामपंचायतीने महापालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे. … Read more

अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांवर काद्यांमुळे रडण्याची वेळ, बाजारभाव नसल्यामुळे शेतीतील खर्चही निघेना

अहिल्यानगर- कडाक्याच्या उन्हात शेतात कांदा काढणीचं काम जोरात सुरू आहे. मजूर आणि शेतकरी रात्रंदिवस राबताहेत, पण बाजारात कांद्याचे भाव इतके घसरलेत की, शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडतेय. कांदा लागवडीसाठी केलेला खर्चही वसूल होईल की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. ज्या कांद्यावर वर्षभराच्या खर्चाची गणितं बांधली होती, त्याच कांद्याने आता शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरवलंय. कांदा उत्पादनात … Read more

अकोले तालुक्यात पाणीटंचाईचे संकट, देवठाणच्या सहा वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा सुरू

अकोले- पाणीटंचाईने अकोले तालुक्याला विळखा घातला असून, चैत्र महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात वैशाखाच्या तीव्र उष्म्याची चाहूल लागली आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी तालुक्यातील देवठाण गावातील सहा वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. याशिवाय, मुळा खोऱ्यातील अनेक गावांना टँकर मंजूर झाले असून, आणखी प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. पाण्याच्या या गंभीर समस्येमुळे ग्रामस्थांचे हाल होत असून, … Read more

मळगंगा देवीच्या यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या पाण्याची चिंता मिटली, कपिलेश्वर बंधाऱ्यात पाणी सोडण्याचा जलसंपदा मंत्र्यांचा निर्णय

पारनेर- निघोज येथील मळगंगा देवी यात्रेसाठी पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी आमदार काशिनाथ दाते यांनी केलेल्या मागणीला यश आले आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी २० तारखेपासून पुष्पावती नदीपात्रात पाणी सोडून कपिलेश्वर बंधारा भरून देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे यात्रेदरम्यान पाण्याचा प्रश्न सुटणार असून, लाखो भाविकांना दिलासा मिळणार आहे. पाण्याची टंचाई निघोजच्या मळगंगा … Read more

अहिल्यानगरमधील ‘या’ गावातील पाणी पुरवठा योजनेसाठी १० कोटींचा निधी मंजूर, पाणीटंचाईचा प्रश्न कायमचा मिटणार!

कोपरगाव- तालुक्यातील जेऊर कुंभारी गावाला नियमित आणि पुरेसे पाणी मिळावे, यासाठी सुरू असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेला मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेसाठी अपुरा पडणारा निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. 10 कोटी रूपयांचा निधी महायुती सरकारने जेऊर कुंभारी नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 10 कोटी 91 लाख रुपयांच्या … Read more

डिंभे-माणिकडोह बोगद्यासाठी जनआंदोलनाची घोषणा, खासदार नीलेश लंके आक्रमक

श्रीगोंदा- तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कुकडी प्रकल्पातील पाणीप्रश्न हा अत्यंत गंभीर आणि जटिल आहे. विशेषतः उन्हाळ्यात पाण्याची टंचाई ही शेतकऱ्यांसमोरील मोठी समस्या बनते. या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी डिंभे-माणिकडोह बोगदा प्रकल्प पूर्ण होणे आवश्यक आहे. या बोगद्याच्या पूर्ततेसाठी लवकरच व्यापक जनआंदोलन उभारण्याची तयारी खासदार नीलेश लंके यांनी जाहीर केली आहे. त्यांच्या या घोषणेने श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आशेचे … Read more

अहिल्यानगरमधील धरणांनी गाठला तळ, शेतकरी आणि नागरिक पाणी टंचाईच्या संकटात!

श्रीगोंदा- जिल्ह्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्यामुळे भूजल पातळी मोठ्या प्रमाणावर खालावली आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना पाणी मिळेनासं झालं असून, आता कुकडी आणि घोड प्रकल्पातील धरणांनीही तळ गाठल्याने उन्हाळी आवर्तनावरच मोठं संकट कोसळलं आहे. कुकडी प्रकल्पात १८ टक्के पाणीसाठा सध्या कुकडी प्रकल्पात ५४०० एमसीएफटी इतका म्हणजे फक्त १८ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे, जो गेल्या … Read more

Water Scarcity : अहमदनगर जिल्ह्यातील ह्या तालुक्यात भीषण पाणी टंचाई ! लोकांवर स्थलांतराची वेळ

Water Scarcity

Water Scarcity : निवडणुकीचे वारे शांत झाल्यानंतर पाणीटंचाईची तीव्रता अधिक तीव्रतेने पुढे आली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी लोकांवर स्थलांतराची वेळ आली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक टँकर पाथर्डी तालुक्‍यात सुरू असून, टॅंकरने तालुक्‍यात शंभरी गाठली आहे. टँकर पुरवठा ठेकेदाराच्या मनमानी कारभारापुढे प्रशासनाने हात टेकले असून, जिल्हाधिकार्‍यांनी ठेकेदाराविरुद्ध कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे. तालुक्‍यात यापूर्वी एवढी भीषण पाणी टंचाई … Read more