11GB Smartphone : “या” दिवशी भारतात लॉन्च होणार 11GB रॅम असलेला सर्वात स्वस्त फोन; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Ahmednagarlive24 office
Published:
11GB Smartphone

11GB Smartphone : TECNO पुन्हा एकदा भारतीय बाजारपेठेत एक धमाकेदार फोन लॉन्च करत आहे. अलीकडेच, कंपनीने Tecno Spark 8P स्मार्टफोन लॉन्च केला आहे. आता कंपनी लवकरच भारतात Tecno Spark 9 स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. कंपनीने एका ट्विटमध्ये हा स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्याची घोषणा केली आहे.

हा Tecno फोन भारतात 18 जुलै रोजी लॉन्च होईल. हा आगामी स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वर विक्रीसाठी उपल्बध असणार आहे. आता लॉन्च होणार फोन मागील वर्षी लाँच झालेल्या Tecno Spark 8 ची पुढची सिरीज असणार आहे. आता आपण जाणून घेऊया Tecno Spark 9 स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी माहिती.

Tecno Spark 9 स्मार्टफोन Amazon या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर प्रथम विक्रीसाठी उपल्बध असणार आहे. 11GB रॅम असलेला हा पहिला स्मार्टफोन ज्याची किंमत 10,000 रुपये आहे. Tecno Spark 9 स्मार्टफोनमध्ये सेल्फी कॅमेरासाठी वॉटरड्रॉप नॉचसह 6.6-इंचाचा HD डिस्प्ले आहे. या फोनच्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz आहे.

या Tecno स्मार्टफोनच्या बॅक पॅनलमध्ये जिओमेट्रिक पॅटर्न देण्यात आला आहे. यासोबतच फोनच्या बॅक पॅनलमध्ये स्क्वेअर कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे, ज्यामध्ये दोन कॅमेरा सेन्सर आणि एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे.

Tecno Spark 9 स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G37 प्रोसेसर दिला जाईल. या फोनमध्ये 6GB RAM आणि 5GB व्हर्च्युअल रॅम दिली जाईल. म्हणजेच या फोनमध्ये एकूण 11 जीबी रॅम सपोर्ट असेल. यासोबतच फोनमध्ये 128GB स्टोरेज दिले जाईल. टेक्नोच्या या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली जाईल. हा फोन Android 12 वर चालेल.

Tecno Spark 9 स्मार्टफोन दोन रंग पर्यायांमध्ये लॉन्च होईल. Infinity Black आणि Sky Mirror असे पर्याय देण्यात आले आहेत. Tecno चा हा फोन सोमवारी भारतात लाँच होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe