12 GB RAM, 50MP कॅमेरा आणि 5G स्पीड ! Poco M7 5G ला हरवणं अशक्य

Poco M7 5G हा कमी किमतीत दमदार फीचर्स असलेला 5G स्मार्टफोन आहे. 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 12GB रॅम, Sony कॅमेरा, मोठी बॅटरी आणि 120Hz डिस्प्ले मिळणे ही मोठी गोष्ट आहे. जर तुम्ही कमी किंमतीत उत्तम परफॉर्मन्स, फास्ट चार्जिंग आणि 5G कनेक्टिव्हिटी असलेला स्मार्टफोन शोधत असाल, तर Poco M7 5G हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

Published on -

भारतीय बाजारात स्वस्त आणि दमदार फीचर्स असलेल्या 5G स्मार्टफोन्सची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर Poco भारतात आपला नवीन Poco M7 5G स्मार्टफोन लाँच करत आहे, जो कमी किमतीत उत्तम वैशिष्ट्यांसह येणार आहे.

या स्मार्टफोनमध्ये 12GB रॅम, शक्तिशाली Qualcomm Snapdragon 4 Gen 2 चिपसेट, Sony कॅमेरा आणि मोठी 5,160mAh बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने याची किंमत ₹10,000 पेक्षा कमी ठेवली आहे, त्यामुळे हा भारतातील सर्वात परवडणाऱ्या 5G फोनपैकी एक ठरू शकतो.

Poco M7 5G लाँच

Poco M7 5G 3 मार्च रोजी दुपारी 12 वाजता भारतात लाँच होणार आहे. हा फोन Flipkart एक्सक्लुसिव्ह असेल, त्यामुळे इच्छुक ग्राहकांना तेथूनच तो खरेदी करता येईल. हा स्मार्टफोन मिंट ग्रीन, ओशन ब्लू आणि सॅटिन ब्लॅक या तीन रंगांमध्ये उपलब्ध असेल.

दमदार प्रोसेसर

Poco M7 5G मध्ये Qualcomm Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसर दिला आहे, जो उत्तम कार्यक्षमतेसाठी ओळखला जातो. हा चिपसेट गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी उपयुक्त ठरेल. फोनमध्ये 6.88-इंचाचा मोठा डिस्प्ले दिला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 600nits पीक ब्राइटनेस सह येतो.हा डिस्प्ले डोळ्यांसाठी सुरक्षित आहे.

Sony कॅमेरा आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग

Poco M7 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये 50MP Sony IMX852 प्रायमरी सेन्सर आणि LED फ्लॅश युनिट आहे. सेल्फीसाठी 8MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. हा स्मार्टफोन 1080p व्हिडिओ रेकॉर्डिंगला 30fps वर सपोर्ट करतो, त्यामुळे व्हिडिओ कॉलिंग आणि सोशल मीडिया साठी उत्तम ठरेल.

Poco M7 5G – मोठी बॅटरी आणि वेगवान चार्जिंग

हा स्मार्टफोन 5,160mAh क्षमतेच्या मोठ्या बॅटरीसह येतो, त्यामुळे तो एकदा चार्ज केल्यानंतर लांब वेळ टिकेल. कंपनीच्या मते, हा फोन एका चार्जवर 12 तासांपर्यंत व्हिडिओ स्ट्रीमिंग किंवा 56 तासांपर्यंत व्हॉइस कॉलिंग करू शकतो. फोन 18W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करतो, आणि बॉक्समध्ये 33W चार्जर दिला जातो, त्यामुळे कमी वेळात फोन चार्ज करता येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe