Samsung Galaxy S24 Ultra | सॅमसंगने आपला प्रीमियम फ्लॅगशिप फोन Galaxy S24 Ultra 5G विक्रीसाठी उपलब्ध करून दिला असून, सध्या या डिव्हाइसवर Amazon वर मोठी सूट दिली जात आहे. जर तुम्ही 90,000 रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये एक शक्तिशाली आणि फीचर्सने भरलेला अँड्रॉइड फोन खरेदी करायचा विचार करत असाल, तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम ठरू शकते.
Galaxy S24 Ultra 5G भारतात सुमारे 1,29,900 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. परंतु, Amazon वर हा फोन सध्या फक्त 91,000 रुपयांना विकला जात आहे. म्हणजेच 33% इतकी सूट मिळत आहे आणि ग्राहकांना या डिव्हाइसवर एकूण 43,880 रुपयांची बचत होऊ शकते. यासोबतच 2,730 रुपयांपर्यंत कॅशबॅक आणि 27,350 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर सुद्धा उपलब्ध आहे. EMI चा पर्यायही आहे, जो 4,097 रुपयांपासून सुरू होतो.

फोनमधील फीचर्स-
या फोनमध्ये 6.8-इंचाचा QHD+ AMOLED डिस्प्ले आहे जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 2,600 nits ब्राइटनेस सपोर्ट करतो. यामध्ये Qualcomm चा Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर आणि 12GB LPDDR5X RAM मिळते. डिव्हाइसची 5,000mAh बॅटरी 45W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, जी दीर्घकाळ टिकणारी बॅटरी परफॉर्मन्स देते.
कॅमेरा सेगमेंटमध्ये सुद्धा Galaxy S24 Ultra 5G अव्वल आहे. यामध्ये 200MPचा प्रायमरी सेन्सर, 50MPचा टेलिफोटो लेन्स (5x ऑप्टिकल झूम), 10MPचा टेलिफोटो सेन्सर (3x ऑप्टिकल झूम), आणि 12MPचा अल्ट्रावाइड युनिट समाविष्ट आहे. सेल्फीसाठी 12MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
Android 15 अपडेट मिळणार-
या फोनमध्ये सर्कल टू सर्च, नोट असिस्ट यासारखी AI-आधारित वैशिष्ट्ये आधीच आहेत. 7 एप्रिलपासून One UI 7 आणि Android 15 अपडेट मिळणार असल्यामुळे, आणखी सुधारित AI फीचर्सही येणार आहेत.
जर तुम्ही तुमचं जुने डिव्हाइस अपग्रेड करायच्या विचारात असाल, तर ही वेळ Samsung Galaxy S24 Ultra 5G खरेदीसाठी सर्वोत्तम असू शकते. इतक्या कमी किंमतीत हे प्रीमियम स्पेसिफिकेशन्स मिळणे दुर्मीळ आहे.