50 inch Smart TV : सर्वोत्तम ऑफर! 18 हजारांपेक्षा स्वस्तात खरेदी करा 50 इंचाचा टीव्ही, पहा संपूर्ण ऑफर

Ahmednagarlive24 office
Published:
50 inch Smart TV

50 inch Smart TV : सध्या स्मार्टटीव्ही खरेदी करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आता बाजारात अनेक कंपन्या आपले शानदार फीचर्ससह येणारे स्मार्टटीव्ही लाँच करत आहेत. साहजिकच मागणी जास्त आहे, त्यामुळे किमतीही जास्त आहेत.

असे असले तरी आता तुम्ही 50 इंच स्मार्टटीव्ही अवघ्या 17,499 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या स्मार्टटीव्हीची मूळ किंमत 82,990 रुपये इतकी आहे. जो तुम्ही Amazon वर मिळणाऱ्या सर्वोत्तम ऑफरमुळे कमी किमतीत खरेदी करू शकता.

83 हजार रुपयांचा स्मार्टटीव्ही 17499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल

हे लक्षात घ्या की अशी शानदार संधी Foxsky (50 इंच) 4K UHD स्मार्ट एलईडी टीव्ही 50FS-VS (ब्लॅक) मॉडेलवर मिळत आहे. जर तुम्ही हा टीव्ही Amazon वरून खरेदी केला तर तुम्हाला फक्त 21,999 रुपये खर्च करावे लागतील. तर या स्मार्टटीव्हीची मूळ किंमत 82,990 रुपये इतकी आहे म्हणजे तुम्हाला 60,991 रुपयांची जबरदस्त सवलत मिळत आहे. परंतु ही भन्नाट ऑफर इथेच संपत नाही.

तर आता Amazon कडून तुम्हाला या स्मार्टटीव्हीवर बँक आणि एक्सचेंज ऑफर देखील देण्यात येत आहे. जर तुम्ही बँकेच्या ऑफरचा लाभ घेतला तर तुम्ही एकूण 2000 रुपयांपर्यंत सवलत मिळवू शकता. तसेच एक्सचेंज बोनसचा लाभ घेतला तर तुम्हाला 2500 रुपयांपर्यंत सवलत मिळेल. समजा, जर तुम्ही दोन्ही ऑफरचा पुरेपूर फायदा घेतला तर या स्मार्टटीव्हीची किंमत केवळ 17,499 रुपये इतकी असणार आहे.

जाणून घ्या खासियत

कंपनीच्या या स्मार्टटीव्हीमध्ये 50-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 4K अल्ट्रा HD रिझोल्यूशन (3840×2160 पिक्सेल) सह येईल. या डिस्प्लेला 60 Hz पर्यंत रिफ्रेश दर मिळत असून या टीव्हीमध्ये 30W चा ध्वनी आउटपुट उपलब्ध आहे. यामध्ये डॉल्बी ऑडिओ सिस्टम, डॉल्बी अॅटमॉस आणि डीटीएस सपोर्टसह ड्युअल स्पीकर देण्यात आले आहेत.

तसेच यात कनेक्टिव्हिटीसाठी दोन HDMI आणि दोन USB पोर्ट दिले आहेत. टीव्ही Android 9.0 OS वर काम करत असून यामध्ये गुगल व्हॉइस असिस्टंट, बिल्ट इन वाय-फाय, बिल्ट इन मिराकास्ट, यूट्यूब/नेटफ्लिक्स/प्राइम व्हिडिओ समाविष्ट आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe