7th Pay Commission : भारत सरकारने (Government of India) केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या (central employees) महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ केल्यानंतर आता पगारात (salary) पुन्हा एकदा मोठी वाढ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कर्मचाऱ्यांचा डीए ३१ वरून ३४ टक्क्यांपर्यंत वाढवल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकाच वेळी चार भत्त्यांमध्ये वाढीचा लाभ मिळू शकतो.
सातव्या वेतन आयोगानुसार ३४ टक्के महागाई भत्ता दिल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा प्रवास भत्ता आणि शहर भत्ताही वाढणार आहे. यासोबतच भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युइटीही आपोआप वाढतील. वास्तविक, केंद्रीय कर्मचार्यांचा मासिक पीएफ आणि ग्रॅच्युइटी मूळ वेतन आणि डीएमधून मोजली जाते.
अशा परिस्थितीत डीए वाढल्याने पीएफ आणि ग्रॅच्युइटीही वाढण्याची खात्री आहे. इतकेच नाही तर डीए वाढल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता (HRA)ही वाढणार आहे. ही वाढ ३ टक्क्यांपर्यंत असू शकते, असे सांगण्यात येत आहे.
३० मार्च २०२२ रोजी केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) ३ टक्क्यांनी वाढवला होता. त्यामुळे नऊ महिन्यांत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए दुपटीने वाढला आहे.
केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आता ३४ टक्के दराने DA आणि DR मिळत आहे. केंद्र सरकारच्या या घोषणेचा थेट फायदा ५० लाख कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारकांना झाला आहे. मात्र, यामुळे सरकारवर वार्षिक ९५४४.५० कोटी रुपयांचा बोजा वाढला आहे.
दरम्यान, जुलैमध्ये पुन्हा एकदा केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या डीएमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये ४ टक्क्यांपर्यंत मोठी वाढ होऊ शकते.