Airtel Recharge Plan : जर तुम्ही एअरटेल वापरकर्ते असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी कामाची आहे. एअरटेल आपल्या ग्राहकांसाठी नवीन रिचार्ज योजना आणत आहे. जेणेकरून यूजर्सचा अनुभव आणखी चांगला करता येईल. अलीकडेच एअरटेलने नवीन प्रीपेड प्लॅन लॉन्च केला आहे, ज्याचा ग्राहकांना खूप फायदा होणार आहे.
एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन लॉन्च केला आहे. यामध्ये ग्राहकांना अनेक लाभ मिळणार आहे. कोणते लाभ मिळणार आहेत पाहूया…

एअरटेलचे हे नवीन प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन डिस्ने हॉटस्टारच्या मोफत सबस्क्रिप्शनसह मिळू शकतात. तुमच्या माहितीसाठी, कंपनीने हे नवीन प्लान ICC T20 वर्ल्ड कप 2024 ला लक्षात घेऊन लॉन्च केले आहेत. याशिवाय एअरटेल कंपनीने आपल्या काही ब्रॉडबँड प्लॅनमध्ये ओटीटीचाही समावेश केला आहे.
एअरटेलच्या 499 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 3 जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलचाही समावेश आहे. याशिवाय कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड लोकल किंवा एसटीडी कॉल्सची सुविधा उपलब्ध आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये डिस्ने हॉटस्टार सबस्क्रिप्शन ३ महिन्यांसाठी मोफत उपलब्ध आहे. तसेच, या रिचार्ज प्लॅनमध्ये Airtel Xstream ची मोफत सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय, SonyLiv सारख्या 20 हून अधिक OTT सेवा मोफत उपलब्ध आहेत. या प्लॅनची एकूण वैधता 28 दिवसांची आहे.
तर एअरटेलच्या 899 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये, वापरकर्त्यांना 2 जीबी डेटासह अमर्यादित लोकल आणि एसटीडी कॉलचा लाभ मिळतो. या प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे. एअरटेलच्या या नवीन प्लानमध्ये यूजर्सना डिस्ने हॉटस्टारचे ३ महिन्यांसाठी फ्री सब्सक्रिप्शनही मिळते. एअरटेल एक्स्ट्रीम देखील विनामूल्य उपलब्ध असेल.
एअरटेलच्या 3,359 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 2.5 जीबी डेटासह अमर्यादित लोकल आणि एसटीडी कॉलचा लाभ मिळतो. दररोज 100 एसएमएसची सुविधा उपलब्ध आहे. या वार्षिक रिचार्ज पॅकमध्ये, डिस्ने हॉटस्टार सदस्यता 1 वर्षासाठी विनामूल्य उपलब्ध आहे. एअरटेल एक्स्ट्रीम देखील विनामूल्य आहे. या प्लॅनची वैधता 365 दिवसांची आहे.
एअरटेलच्या 1499 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहक 4 ॲड-ऑन सिम कार्ड खरेदी करू शकतात. या प्लॅनमध्ये केवळ 200 GB डेटाच मिळत नाही, तर मोबाईल डिस्ने हॉटस्टारची सुविधाही 1 वर्षासाठी उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित Xstream Play ची सुविधा देखील आहे.
एअरटेलचा हा 1199 रुपयांचा प्लॅन 3 ॲड ऑन आणि 150 GB डेटासह येतो. 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये कंपनी 3 ॲड-ऑन सिम कार्ड आणि 100 GB डेटा ऑफर करते. या दोन्ही प्लॅनमध्ये ग्राहकांना Xstream Play ची अमर्यादित सेवा मिळते.
599 रुपयांच्या प्लॅनमध्ये 1 ॲड-ऑन सिम कार्डसह 75 GB डेटा मिळतो. Xstream Play या प्लॅनमध्ये 3 महिन्यांसाठी उपलब्ध आहे. 499 आणि 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सना अनुक्रमे 75 जीबी आणि 40 जीबी डेटा मिळतो. या दोन्ही प्लॅनमध्ये Xstream Play चा लाभ 3 महिन्यांसाठी उपलब्ध आहे. याशिवाय एअरटेल आपल्या ग्राहकांना अनेक रिचार्ज प्लॅन ऑफर करते.