Airtel Recharge Plan : देशातील सर्वच टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या किमतीही वेगवगेळ्या असतात. या कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी पोस्टपेड तसेच प्रीपेड रिचार्ज प्लॅन सादर करतात.
देशातील सर्वात आघाडीची टेलिकॉम कंपनी एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी असाच एक रिचार्ज प्लॅन ऑफर केला आहे. ज्यात ग्राहकांना अनलिमिटेड डेटा दिला जात आहे. कंपनीच्या या प्लॅनची किंमत 99 रुपये इतकी आहे. जाणून घ्या या प्लॅनबद्दल सविस्तर माहिती.

एअरटेलचा 99 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
समजा तुम्ही Airtel वापरकर्ते असाल तर तुम्हाला या प्लॅनचा खूप फायदा होईल. कंपनीने हा प्लॅन अवघ्या 99 रुपयांमध्ये सादर केला आहे. एअरटेलचा हा प्लॅनचा रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला 1 दिवसाच्या वैधतेसाठी अनलिमिटेड डेटाचा लाभ मिळेल. परंतु यात अडचण अशी आहे की फक्त प्रीपेड नंबर असणारे ग्राहकच या प्लॅनचा लाभ घेऊ शकतात. पोस्टपेड नंबर असणाऱ्या ग्राहकांसाठी हा रिचार्ज प्लॅन वैध नाही. आनंदाची बाब म्हणजे या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड डेटाची सुविधा मिळत असून कंपनीकडून यावर कोणतीही मर्यादा निश्चित करण्यात आली नाही.
मर्यादा
कंपनीच्या या प्लॅनबाबत तुम्हाला अनलिमिटेड डेटा मिळत असेल. परंतु तरीही एक ट्विस्ट आहे. या प्लॅनमध्ये रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला अनलिमिटेड डेटाची सुविधा मिळत आहे . परंतु, जेव्हा तुम्ही वापरादरम्यान 30 GB डेटा वापरता, त्यानंतर ग्राहकांसाठी एक निर्बंध आहे.
जर तुम्ही कंपनीचे ग्राहक असाल तर तुम्हाला माहिती असेल की कंपनीच्या या प्लॅनचा फायदा घेण्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत की ज्या नंबरवर हा प्लॅन सुरू आहे त्या नंबरवर बेस रिचार्ज प्लॅन देखील असावा. हे लक्षात ठेवा की ज्या प्रीपेड नंबरवर कंपनीचा कोणताही प्लॅन सक्रिय नसेल, त्या नंबरवर हा अनलिमिटेड डेटा प्लॅनचा वापर करता येणार नाही. अशा परिस्थितीत, या प्लॅनवर रिचार्ज करण्यापूर्वी, हे लक्षात घ्या की तुमच्या नंबरवर आधीपासूनच एक बेस प्लॅन आहे, त्याशिवाय हा प्लॅन निरुपयोगी होऊ शकतो.