Airtel Recharge Plan : ग्राहकांना धक्का! एअरटेलने पुन्हा वाढवल्या रिचार्जच्या किमती, मोजावे लागणार ‘इतके’ पैसे

Ahmednagarlive24 office
Updated:

Airtel Recharge Plan : भारतात एअरटेल, रिलायन्स जिओ आणि वोडाफोन-आयडिया या खाजगी टेलिकॉम कंपन्या आहेत. तसेच बीएसएनएल ही सरकारी टेलिकॉम कंपनी आहे. या टेलिकॉम कंपन्यांकडे अनेक प्रीपेड रिचार्ज प्लॅन आणि पोस्टपेड रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सर्वच कंपन्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वेगवेगळ्या आहेत. या रिचार्ज प्लॅनमध्ये फायदे देखील वेगवेगळे आहेत.

ज्या कंपनीच्या रिचार्ज प्लॅनची किंमत कमी असेल ग्राहक त्या कंपनीचा रिचार्ज करतात. त्यामुळे सतत या कंपन्यांमध्ये टक्कर पाहायला मिळते. एअरटेल ही देशातील लोकप्रिय कंपनी आहे. कंपनीने आपली 5G सेवा देखील सुरु केली आहे.

जर तुम्ही एअरटेलचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. कारण कंपनीने आपल्या रिचार्ज प्लॅनची किंमत पुन्हा एकदा वाढवली आहे. त्यामुळे तुम्हाला आता या कंपनीचा रिचार्ज करताना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. कोणते आहेत कंपनीचे हे रिचार्ज प्लॅन? जाणून घेऊयात सविस्तर.

एअरटेलचा 201 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

सर्वात लोकप्रिय कंपनी एअरटेल आपल्या ग्राहकांसाठी अल्प मुदतीसाठी अनेक रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. ज्याचा कंपनीच्या ग्राहकांना खूप फायदा होतो परंतु, कंपनीने आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत. ग्राहकांना आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. या यादीतील कंपनीचा पहिला रिचार्ज प्लॅन 201 रुपयांचा आहे, जो 1GB दैनिक डेटासह येत आहे. तर या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 21 दिवसांची वैधता मिळत आहे. तर ग्राहकांनाअनलिमिटेड कॉल्स आणि दररोज 100 एसएमएसचा लाभ घेता येईल.

एअरटेलचा 239 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

तर यादीतील कंपनीचा दुसरा, 239 रुपयांच्या रिचार्ज प्लॅन आहे. या रिचार्ज प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये ग्राहकांना दिवसाला 1GB डेटा मिळतो. तसेच वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये अधिक वैधता मिळत आहे. यामध्ये ग्राहकांना एकूण 24 दिवसांची वैधता देण्यात येत आहे. यासोबतच या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 100 एसएमएस आणि अमर्यादित मोफत कॉलिंग सुविधेचा देखील लाभ घेता येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe