Recharge Plans : Airtel आणि Vi (Vodafone-idea) या भारतातील प्रमुख दूरसंचार कंपन्या आहेत. दोन्ही कंपन्यांकडे विविध श्रेणींचे अनेक प्रीपेड योजना आहेत. यामुळेच आता योग्य रिचार्ज प्लॅन निवडणे कठीण झाले आहे. जर तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल, तर आम्ही तुमच्यासाठी Airtel आणि Viचे काही प्रीपेड प्लॅन आणले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंग, डिस्ने प्लस हॉटस्टार सबस्क्रिप्शन मोफत मिळेल आणि दररोज 2.5GB डेटा मिळेल.
एअरटेलचा 399 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 2.5GB डेटा आणि 100SMS मिळतात. यात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे. याशिवाय डिस्ने प्लस हॉटस्टार तसेच विंक म्युझिक आणि फ्री-हॅलो ट्यूनचे सबस्क्रिप्शन प्लॅनसोबत उपलब्ध आहेत. या प्रीपेड प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे.
एअरटेलचा 499 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
हा रिचार्ज पॅक 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये दररोज 2GB डेटा आणि 100SMS दिला जातो. इतकेच नाही तर रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह डिस्ने प्लस हॉटस्टार, विंक म्युझिक आणि हॅलो ट्यूनचे सबस्क्रिप्शनही मोफत दिले जात आहे.
Airtel Rs 599 प्रीपेड पॅक
एअरटेलचा रिचार्ज पॅक डिस्ने प्लस हॉटस्टार सबस्क्रिप्शन मोफत देतो. यामध्ये 100SMS, 3GB डेटा प्रतिदिन अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. त्याच वेळी, या प्रीपेड पॅकची वैधता 28 दिवस आहे
Vi चा Rs 399 प्रीपेड पॅक
या प्लॅनमध्ये कंपनी 3 महिन्यांसाठी Disney Plus Hotstar सबस्क्रिप्शन देत आहे. तसेच, प्लानमध्ये दररोज 100SMS आणि 2.5GB डेटा मिळत आहे. इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर प्लॅनसोबत अमर्यादित कॉलिंग, बिन्ज ऑल नाइट आणि वीकेंड डेटा रोलओव्हर दिला जात आहे. या डेटा पॅकची वैधता 28 दिवसांची आहे.
Vi चा 499 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
Vi च्या या रिचार्ज प्लॅनची कालमर्यादा २८ दिवसांची आहे. यामध्ये दररोज 100SMS सह 2GB डेटा मिळतो. यामध्ये Hotstar सबस्क्रिप्शन, Binge All Night आणि Weekend Data Rollover सारखे फायदे अनलिमिटेड कॉलिंगसह दिले जात आहेत.