DeepSeek च्या स्वस्त AI मुळे टेक कंपन्यांना हादरा! अलीबाबाने 97% कमी केल्या किमती

अलिबाबाने त्यांच्या AI मॉडेल Qwen2.5 Max ची नवीन आवृत्ती लाँच केली आहे, जी अत्याधुनिक AI मॉडेल्सच्या स्पर्धेत एक मोठे पाऊल मानले जात आहे. कंपनीच्या मते हे मॉडेल OpenAI च्या GPT-4o, Meta च्या Llama आणि DeepSeek च्या नवीन AI मॉडेल्सपेक्षा अधिक प्रभावी आणि कार्यक्षम आहे.

Ratnakar Ashok Patil
Published:

Alibaba AI Model:- अलिबाबाने त्यांच्या AI मॉडेल Qwen2.5 Max ची नवीन आवृत्ती लाँच केली आहे, जी अत्याधुनिक AI मॉडेल्सच्या स्पर्धेत एक मोठे पाऊल मानले जात आहे. कंपनीच्या मते हे मॉडेल OpenAI च्या GPT-4o, Meta च्या Llama आणि DeepSeek च्या नवीन AI मॉडेल्सपेक्षा अधिक प्रभावी आणि कार्यक्षम आहे.

अलिबाबाच्या क्लाउड डिव्हिजनने दिलेल्या माहितीनुसार, हे मॉडेल आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात नवीन मानक प्रस्थापित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

सध्या असलेली AI क्षेत्रातील मोठी चुरस

अलिकडेच DeepSeek-V3 हे नवीन AI मॉडेल जागतिक स्तरावर सादर करण्यात आले, ज्याने तंत्रज्ञानाच्या दुनियेत खळबळ माजवली. विशेषतः 10 जानेवारी रोजी DeepSeek AI असिस्टंट लाँच केल्यानंतर आणि 20 जानेवारीला त्याच्या R1 मॉडेलच्या प्रकाशनाने सिलिकॉन व्हॅलीत मोठे आर्थिक चढउतार दिसून आले.

ज्याचा परिणाम अनेक टेक कंपन्यांच्या स्टॉक्सवर झाला. DeepSeek-V3 हे OpenAI च्या GPT-4o इतकेच सक्षम आहे.पण त्याच्या तुलनेत अधिक स्वस्त आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारे सल्याचा असा दावा कंपनीने केला आहे.

अलिबाबाची DeepSeek सोबत थेट स्पर्धा

Qwen2.5 Max च्या लाँचमुळे अलिबाबा आणि DeepSeek यांच्यात थेट स्पर्धा निर्माण झाली आहे. DeepSeek ने अलिकडेच त्यांचे नवीन R1 मॉडेल सादर केले असून अलिबाबाच्या नव्या मॉडेलमुळे या स्पर्धेला आणखी वेग येणार आहे.

कमी किमतीत उच्च-कार्यक्षमता देण्याच्या उद्देशाने हे AI मॉडेल्स विकसित केली जात असल्यामुळे मोठ्या कंपन्यांना त्यांच्या AI सेवांच्या किंमतीत मोठी कपात करावी लागत आहे.

कमी किमतीत उच्च कार्यक्षमतेचा फॉर्म्युला

DeepSeek हे 20 महिन्यांपूर्वी चीनच्या हांग्झो शहरात सुरू करण्यात आलेले स्टार्टअप आहे. जे अल्पावधीतच AI क्षेत्रातील एक प्रमुख बनले आहे. याच्या कमी किमतीच्या आणि उच्च-कार्यक्षमतेच्या मॉडेल्समुळे OpenAI, Meta, Tencent आणि Baidu सारख्या कंपन्यांवर दबाव वाढला आहे.

DeepSeek ने गेल्या वर्षी V2 मॉडेल लाँच केले व ज्यामुळे चीनमधील AI सेवा देणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी कराव्या लागल्या.

विशेष म्हणजे या मॉडेलची किंमत अवघी 1 युआन (सुमारे 11 रुपये) प्रति 1 मिलियन टोकन्स इतकी स्वस्त होती.जी इतर कंपन्यांच्या तुलनेत खूपच कमी होती. परिणामी, अलिबाबाच्या क्लाउड डिव्हिजनलाही त्यांच्या AI मॉडेल्सच्या किमती 97% पर्यंत कमी कराव्या लागल्या.

AI बाजारातील भविष्यातील दिशा आणि प्रभाव

AI तंत्रज्ञानातील वेगाने वाढणाऱ्या या स्पर्धेमुळे, उद्योगातील सर्वात मोठ्या कंपन्यांना त्यांची धोरणे पुन्हा तपासावी लागत आहेत. कमी किंमतीत उच्च-कार्यक्षमता देण्याच्या दिशेने झपाट्याने होत असलेले हे बदल ग्राहकांसाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहेत. AI बाजारपेठेत भविष्यातील स्पर्धा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.या स्पर्धेत कोण टिकून राहील? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe