Amazon Sale : तुम्हालाही नवा स्मार्टफोन खरेदी करायचा आहे का मग तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. ज्यांना 7000 रुपयांपेक्षा कमी किमतीत फोन खरेदी करायचा असेल त्यांच्यासाठी अमेझॉन या लोकप्रिय ऑनलाइन शॉपिंग साइटवर एक संधी उपलब्ध झाली आहे. खरंतर केला काही दिवसांपासून फ्लिपकार्ट तसेच अमेझॉन वर सेल सुरू आहे.
फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डे सेलमध्ये ग्राहकांना हजारो रुपयांची सवलत दिली जात आहे त्याचवेळी अमेझॉनच्या सेलवर देखील ग्राहक स्मार्टफोन टीव्ही फ्री अशा असंख्य वस्तूंवर हजारो रुपयांची बचत करू शकतात. अमेझॉन वर सध्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल सुरू आहे.

दरवर्षी या लोकप्रिय शॉपिंग साइटवर सेल असतो. यंदाही सणासुदीच्या हंगामात अमेझॉन वर सेल सुरू झाला असून या सेलमध्ये 12 जीबी रॅम चा फोन 6000 रुपयांच्या किमतीत ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.
यामुळे जर तुम्हाला कमी किमतीत जबरदस्त फीचर्स व दमदार परफॉर्मन्स असणारा फोन घ्यायचा असेल तर तुम्ही अमेझॉन वर एकदा नक्कीच भेट द्यायला पाहिजे. सात हजाराच्या आत स्मार्टफोन घेणाऱ्यांसाठी ही डील फारच कमालीची राहणार आहे.
खरे तर अमेझॉन वर itel Zono 10 स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध आहे. आता या साइटवर सेल सुरू असल्याने हा स्मार्टफोन आपल्या मूळ किमतीपेक्षा कमी पैशांमध्ये खरेदी करण्याची सुवर्णसंधी चालून आलीये.
हा फोन अॅमेझॉनवर सेल सुरू असल्याने फक्त 6,399 रुपयांना मिळतोय. तुम्ही जर सेल संपण्याच्या आधी हा फोन खरेदी केला तर तुम्हाला या फोनवर 639.90 रुपयांपर्यंतचा बँक डिस्काउंट व 319 चा कॅशबॅक सुद्धा मिळू शकतो. तसेच या डिवाइस वर एक्सचेंज ऑफर सुद्धा सुरू आहे.
अर्थात तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करून चांगली बचत करू शकणार आहात. पण जुन्या फोनची किंमत त्याच्या कंडिशनवर अवलंबून राहणार आहे. आयटेल Zono 10 ला 6.6 इंचाचा HD डिस्प्ले देण्यात आलाय. त्याचे रिझोल्यूशन 1612×720 पिक्सल आहे.
यामध्ये 60Hz रिफ्रेश रेट सपोर्ट दिला गेला आहे. फोनमध्ये 4GB LPDDR4x रॅम आणि 64GB eMMC 5.1 स्टोरेज उपलब्ध आहे. पण यामध्ये 8GB मेमरी फ्यूजन फीचर दिले आहे. अर्थात या फोनची रॅम 12 जीबी पर्यंत वाढवता येते. फोनमध्ये मायक्रोएसडी कार्डचा सुद्धा सपोर्ट आहे.
या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. यामुळे परफॉर्मन्स चांगला आहे. याला 8 MP चा रियर कॅमेरा तसेच 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. तसेच 5000mAh बॅटरी देण्यात आलीये.