Android Phone : फोन पासवर्ड-पॅटर्न-पिन विसरलात? तर टेन्शन नाही ; ‘या’ पद्धतीने करा फोन अनलॉक

Ahmednagarlive24 office
Published:

Android Phone :  तुम्ही देखील Android Phone वापरात असला आणि त्याचा पासवर्ड विसरला असाल तर तो फोन लॉक होतो ज्यामुळे तुम्हाला काहीच करता येत नाही . यामुळे आज आम्ही तुम्हाला या लेखात एका भन्नाट ट्रिकबद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही अगदी आरामात कुठेही न जाता अँड्रॉईड स्मार्टफोन अनलॉक करू शकतात. चला मग जाणून घेऊया या भन्नाट ट्रिकबद्दल संपूर्ण माहिती.

फोन बंद करा

लॉक केलेला फोन बंद करा. त्यानंतर फोन चालू करण्यासाठी, तुम्हाला व्हॉल्यूम डाउन बटणासह पॉवर बटण दाबून धरून ठेवावे लागेल. ते काही सेकंदांनंतर रीस्टार्ट होईल. हे फोन रिकव्हरी मोडमध्ये ठेवेल. काही फोनवर पॉवर बटण व्हॉल्यूम अप बटणाच्या संयोगाने कार्य करेल.

Forgot phone pattern? So sit at home and unlock the phone in a few minutes

रिकवरी मोड उघडेल

आता तुम्हाला काही पर्याय मिळतील ज्यात reboot system now , wipe data/factory reset, wipe cache partition समाविष्ट असेल. याशिवाय यामध्ये अनेक पर्याय असतील. तुम्हाला यामधून वाइप डेटा/फॅक्टरी रीसेट निवडावा लागेल.

हा पर्याय निवडा

आता तुम्हाला विचारले जाईल की तुम्हाला सर्वकाही हटवायचे असेल तर तुम्हाला फॅक्टरी डेटा रीसेट निवडावा लागेल. यामुळे फोनचा सर्व डेटा डिलीट होईल आणि तुमचा फोन लॉकशिवाय नवीन होईल. कोणताही पर्याय निवडण्यासाठी तुम्हाला व्हॉल्यूम अप-डाउन बटण वापरावे लागेल.

3_Reasons_to_Never_Use_Fingerprint_Locks_on_Phones-Thumb

लक्षात ठेवा एक गोष्ट तुम्ही काळजी घेतली पाहिजे की अशा प्रकारे तुमच्या फोनचा सर्व डेटा डिलीट होईल. जर तुमच्याकडे तुमच्या फोनच्या डेटाचा बॅकअप नसेल, तर तुम्ही डेटाचा बॅकअप घेऊ शकणार नाही. दुसरे म्हणजे, प्रत्येक फोनसाठी रिकवरी   मोडमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग भिन्न आहे.

हे पण वाचा :-   5G Phone Discount : तब्बल 25 हजारांच्या डिस्काउंटसह खरेदी करा ‘हा’ दमदार स्मार्टफोन ; फीचर्स पाहून व्हाल थक्क

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe