Apple Iphone 14 Price Drop : एप्पलचा आयफोन खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट आहे. खरंतर सप्टेंबर महिन्यात अँपल आयफोन सिक्सटीन सिरीज लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळे सध्या आयफोन प्रेमींमध्ये या फोन संदर्भात माहिती जाणून घेण्याची मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.
एकीकडे ॲपल आयफोन ची पुढील सिरीज लॉन्च करण्याची तयारी करत आहे तर दुसरीकडे 2022 मध्ये लॉन्च झालेला आयफोनच्या गेल्या काही महिन्यांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. जेव्हापासून बाजारात आयफोन 15 ची सिरीज दाखल झाली आहे तेव्हापासूनच 14 च्या किमतीत घसरण होत असल्याचे दिसत आहे.
Iphone 14 ची 2022 मध्ये म्हणजे लॉन्चिंगच्या वेळी जेवढी किंमत होती त्यापेक्षा कमी प्राईस मध्ये सध्या हा हँडसेट ग्राहकांना खरेदी करता येतोय. iPhone 14 चा 128GB व्हेरिएंट भारतात लॉन्च झाला त्यावेळी अर्थातच 2022 मध्ये या हँडसेटची किंमत जवळपास 80 हजार रुपये होती.
सध्या स्थितीला हा मोबाईल ॲपलच्या अधिकृत साइटवर फक्त 70 हजार रुपयांना म्हणजेच 69 हजार 900 रुपयांना लिस्ट आहे. मात्र यावर सध्या एक मोठी डिस्काउंट ऑफर सुरू आहे.
या ऑफरचा लाभ घेऊन ग्राहकांना हा फोन अवघ्या 35 हजार रुपयांच्या किमतीत खरेदी करता येणार आहे. दरम्यान आता आपण ही ऑफर नेमकी कुठे सुरू आहे? आणि ऑफर नेमकी काय आहे हे थोडक्यात पाहणार आहोत.
कुठं सुरू आहे ही ऑफर ?
मिळालेल्या माहितीनुसार, Apple रीसेलर Imagine या प्लॅटफॉर्मवर iPhone 14 128GB आतापर्यंतच्या सगळ्यात कमी किमतीत उपलब्ध आहे. या प्लॅटफॉर्मवर सध्या Monsoon Fest सेल सुरु आहे. या सेलमध्ये 128 जीबी चा आयफोन 14 अवघ्या 34, 900 रुपयांना मिळणार आहे.
या सेलमध्ये iPhone 14 128GB च्या खरेदीवर 6000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट, तीन हजार रुपये कॅश बॅक ऑफर, वीस हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर आणि 6,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस असे मिळून कमाल 35 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळवता येणार आहे.
जर एखाद्याला या कमाल ऑफरचा लाभ मिळाला तर त्याला फक्त 34 हजार 900 रुपयांच्या किमतीत हा आयफोन खरेदी करता येणार आहे.
मात्र, जर तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज केला नाही तर तुम्हाला फक्त 9000 रुपयांच्या ऑफरचा फायदा मिळणार आहे. 9000 रुपयांचा डिस्काउंट मिळाल्यानंतर तुम्हाला हा फोन 60 हजार रुपयांच्या किमतीत खरेदी करता येणार आहे.